Posts

Showing posts from April, 2023

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

अहमदनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचा चौकार

Image
  शेख युनूस अहमदनगर  /. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे नेते तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या मार्गदर्शना खाली नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर सर्व 18 जागांवर दणदणीत  विजय मिळाला.   अहमदनगर बाजार समितीच्या निवडणुकीत सलग चौथ्यादा महाविकास आघाडीचे नेते जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांना अहमदनगर तालुक्यातील जनतेने नाकारले आणि कर्डीले व कोतकर गटाला 18 पैकी 18 जागा मिळवून दिल्या.   माजी खासदार कै. दादापाटील शेळके अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागासाठी निवडणूक पार पडली.व्यापारी मतदार संघातील 2 जागा अगोदर बिनविरोध झाल्या होत्या.सुप्रिया ताई कोतकर, राजेंद्र बोथरा हे विजयी झाले. शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली असून यात 99% मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.कर्डीले व कोतकर गटाचे निलेश  सातपुते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. सेवा संस्था, ग्रामपंचायत आणि सर्वसाधारण मतदान संघातील मतमोजणी होऊन सोसायटी आदी संस्था यात भाजपचे उमेदवार आघाडीवरच होते. अहमदनगर तालूका कृषी बाजार समितीवर...

फक्त मुलींच्या कुस्त्यांचा जंगी आखाडा

Image
  जखणगांव ता नगर येथे  गेल्या पाच वर्षापासून गोदडशावली बाबांच्या यात्रेनिमित्त फक्त मुलींचा कुस्तीचा जंगी आखाडा भरविण्यात येतो. राज्यातील विविध भागातून खेळाडू कुस्ती खेळणाऱ्या मुली या हंगाम्यात येत असतात फक्त मुलींच्या कुस्तीचा आखाडा भरविणारे जखणगाव हे राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव गाव आहे.यंदाही यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मुलींच्या कुस्तीचा जंगी आखाडा भरवण्यात आला यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील ५० मल्लिंकांच्या निकाली कुस्त्या झाल्या एका एका कुस्तीला २ हजारांपासुन ६००० रूपयांपर्यंत  ईनाम वाटण्यात आले.गावकर्यांनी उत्स्फूर्तपणे बक्षिसे दीली प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत हलगीच्या तालावर या कुस्त्या अविस्मरणीय ठरल्या. महिलांच्या स्वयंसुरक्षततेसाठी खेळाला प्राधान्य द्यावे या उद्देशाने आपण दरवर्षी अशा विविध स्पर्धा आयोजित करत असल्याचे सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी सांगितले या आखाड्याचे आयोजनासाठी समस्त ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला जखणगांव चे सरपंच डॉ. सुनिल गंधे, उपसरपंच शाबिया शेख, जिल्हा तालीम संघाचे पै नाना डोंगरे, जागतिक पंच  डाँ. रविंद्र कवडे, छ...

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

Image
  शेख युनूस अहमदनगर /.. पारनेर बाजार समितीवर महाविकास आघाडीला यश आले असून कृषी  उत्पन्न बाजार समिती ताब्यात ठेवण्यात आमदार निलेश लंके यांनी बाजी मारली. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनल आणि भाजप च्या जनसेवा पॅनलमध्ये सरळ काटे की टक्कर  ची  लढत होऊन 18 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवत दणदणीत यश संपादन केले.  पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती प्रशांत गायकवाड यांना सर्वाधिक मते (814) मिळाली. भाजप कडून विद्येमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेतृत्व केले होते. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागा च्या निवडणुकीसाठी 98% मतदान झाले. विजयी उमेदवार. सोसायटी मतदारसंघ.  प्रशांत गायकवाड (814), अशोकराव सावंत (694), आबासाहेब खोडदे (757), बाबासाहेब तरटे (738,),संदीप सालके (733), रामदास भोसले (738), किसन सुपेकर (679). महिला राखीव..पंकजा पठारे (923), मेघा रोकडे (784). इतर मागास प्रवर्ग. गंगाराम बेळकर (829), बाबासाहेब नऱ्हे (789). ग...

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीची सरशी

Image
  * शेख युनूस अहमदनगर* /.. संगमनेर तालुक्यातील आणि  अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच फार मोठ्या प्रमाणावर अटीटतीची होऊन महाविकास आघाडीची सरशी विरोधकांना खात उघडणं मुश्किल.   संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीसाठी भाजपच्या बलाढ्य नेत्यांनी आपली पूर्ण ताकत लावत निवडणुकीत उतरले होते, परंतु त्यांना यश प्राप्त झाले नाही आणि  महाविकास आघाडी ने बाजी मारत एक हाती सत्ता घेत समितीत  आपला  ठसा उमटवत विजय संपादन केले.  संगमनेर कृषी  उत्पन्न बाजार समिती चे  विजयी उमेदवार व्यापारी मतदार संघातून निसार शेख हे 339 मतांनी तर मन्सूख भंडारी 336 मतांनी विजयी झाले. संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत मतदार संघातून निलेश कडलग.936, संजय  खरात  930, अरुण वाघ  841, सखाराम शेरमाळे  834 ने विजयी झाले. हमाल मापाडी गुंजाळ 52, कर्पे 90 अपक्ष. सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघातून. सुधाकर ताजने 1176. महिला. दीपाली वर्पे 1181. रुख्मिणी साकु...

राहुरी कृषी उत्त्पन्न बाजार समितीत माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांचा करिष्मा कायम

Image
    शेख युनूस अहमदनगर /.. जिल्ह्यात गाजलेल्या राहुरी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राहुरीकरानी राष्ट्रवादी चे माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे, अरुण साहेब तनपुरे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली यामध्ये राष्ट्रवादी चा  दणदणीत विजय झाला.   राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची  निवडणूक ही मोठया प्रमाणावर रंगली व जोरदार लढत होऊन राष्ट्रवादी च्या जनसेवा मंडळाला ला 18 जागा पैकी  16 जागा मिळवत  दणदणीत  विजय मिळवला आणि भाजप   ला म्हणजे विकास मंडळाला फक्त 2 जागेवर समाधान  वक्त करावे  लागले.   सोसायटी मतदार संघातून सभापती अरुण साहेब तनपुरे हे सर्वाधिक  मते  मिळवत (814) मतांनी विजयी झाले. दत्तात्रय कवाने (684) मतांनी विजयी झाले.बाळासाहेब खुळे (724), रखमाजी जाधव 696, महेश  पानसरे 714,नारायण सोनवणे 663. तर महिला गटातून सुनीता रावसाहेब खेवरे 808, शोभा सुभाष डुकरे 709.   सहकारी संस्था विशेष मागास प्रवर्गातून रामदास बाचकर 763,शेतकरी प्रतिनिधी सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गातून दत्तात्रय शेळके 697,ग्राम...

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी नूतनी करण कार्यक्रम जाहीर

Image
  शेख युनूस / . संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सरपंच एकत्रित करून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सरपंच  सेवा संघाच्या माध्यमातून गावाचा विकासाचा ध्यास घेऊन गेली अनेक वर्ष राज्यभर कार्यरत असलेली सरपंच संघटना असून या संघटनेची प्रदेश कार्येकरणी ची घोषणा ही दिनांक 28 मे 2023 रोजी अहमदनगर मध्ये होणार आहे.   कार्येकारणी नूतनीकरण कार्यक्रम दिमाखात होत असून या वेळी महाराष्ट्र राज्यातील सर्व तालूका अध्यक्ष राज्य कार्यकारनी सह सर्व पदाधिकारी मान्यवरांचे पदग्रहण समारंभ बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न  होणार आहे.   नवीन सरपंच आणि जुने काही पदाधिकारी यांना या मध्ये समाविष्ट करून महाराष्ट्र राज्यात एक चांगल्या प्रकारचे सरपंच संघटन निर्माण करण्यासाठी दिनांक 13 मार्च 2023 ते 28 मे 2023 पर्येंत महाराष्ट्र राज्यात दौरे नियमित सुरु राहणार  आहे.  या वेळी महाराष्ट्र राज्यातील सर्व सरपंचाना विश्वासात घेऊन पदाधिकारी यांची निवड  केली जाणार आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसदस्य, माजी सरपंच तसेच ग्रामीण तालूका अध्यक्ष, तालूका उपाध्यक्ष, महिला  उपाध्यक्ष, सरचि...

राहुरी तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले! तालुक्यातील असंख्य नागरिकांचे छत हरपले

Image
  प्रतिनिधी - शेख  युनूस अहमदनगर   राहुरी / तालुक्यासह अनेक पूर्व भागात मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाने नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.   सविस्तर वृत्त असे की सर्वत्र ऋतूंमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडून शेतकऱ्यांचे जगणे निसर्गाने मुश्किल केले आहे. शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करता करता नाकी नऊ आले आहे. अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडातला घास आज निसर्ग हिसकावून घेत आहे. काल झालेल्या राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विक्रमी वाऱ्या वादळासह रस्त्यांवरती वृक्ष कोलमडले आहेत. मोठ्या वाऱ्या वावधानासह शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या घरांची छते उडून गेली आहे.  अनेकांचा निवारा उडून अनेक जण बेघर झाले आहेत. असंख्य नागरिक निसर्गाच्या कोपामुळे हंबरडा फोडत आहे. दोन तासाच्या विक्रमी वादळ वाऱ्यासह नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकविलेले शेतीमाल या निसर्गाच्या कोपामुळे मातीहीन झाले आहे. शेतक...

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराचा शुभारंभ

Image
  * शेख  युनूस अहमदनगर*/. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते कोल्हार भगवतीपुर येथे राहता तालुक्यातील महाविकास आघाडीच्या शेतकरी परिवर्तन मंडळाचा प्रचार शुभारंभ संपन्न झाला. सत्ताधाऱ्यांच्या दबाव तंत्र आणि सत्तेच्या गैरवापराविरोधातील ही लढाई आहे, आता परिसरातील जनतेला गृहीत धरून, दादागिरी करून, दमदाटी करून, आजवर जे राजकारण केलं त्याचा बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे असे थोरात साहेबांनी यावेळी सांगितले. राहाता तालुक्यातील मतदार मोठ्या प्रमाणावर दहशत आणि दादागिरी झुगारून या सभेला उपस्थित होते.  राहाता तालुक्यातील परिवर्तनाची ही सुरुवात आहे असे बहुतांश वक्त्यांनी यावेळी सांगितले.  पारनेर तालुक्यातील लोकप्रिय आमदार निलेश लंके यावेळी आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मधील सहकारी संस्थांच्या कामाची पोचपावती दिली. राज्यात ज्या संस्था चांगल्या चालतात त्यात संगमनेरच्या संस्थांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल असेही त्यांनी सांगितले. शिवाय बाळासाहेब थोरात शांत दिसत असले, तरीही अंगावर येणाऱ्याला शिंगावर ...

राहुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बनली प्रतिष्ठेची

Image
  राहुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष प्रणित तालुका विकास मंडळामध्ये चुरस आहे*. * शेख  युनूस अहमदनगर*/..  * बाजार समितीच्या एकूण 18 जागांसाठी येत्या शुक्रवार दि. 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राहुरी बाजार समितीवर गेल्या 30 वर्षाहून अधिक काळापासून माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांची एक हाती सत्ता राहिलेली आहे.  *श्री अरुण साहेब तनपुरे यांनी बाजार समितीच्या माध्यमातून एक आदर्श बाजार समिती म्हणून नगर जिल्ह्यासह राज्यातील एक आदर्श मॉडेल उभे केलेले आहे. आज पर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये तनपुरे यांची सत्ता कायम राहिलेली आहे.  सभापती अरुण तनपुरे यांचे पुतणे माजीमंत्री लोकप्रिय आमदार प्राजक्त तनपुरे यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर राहुरीतील अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी तालुक्यातील राजकारणात लक्ष घातलेले आ...

राहुरी बस स्थानकाची दुर्दशा बिकट अवस्थेत पाच कोटी रुपयाचा निधी गेला कुठे*?

Image
  * शेख युनूस अहमदनगर */.. अहमदनगर  जिल्ह्यातील मद्यवर्ती महत्वाचे समजले जाणाऱ्या राहुरी बस स्थानकाची दुरावस्था मोठया प्रमाणावर बिकट असून  येणाऱ्या प्रवासासाठी धोकादायक  बनली  आहे.               अह मदनगर जिल्ह्यातील जागतिक कीर्तीचे देवस्थान शिर्डी चे साई बाबा व शनी शिंगनापूर या ठिकाणी हजारो भक्त भाविक हे राहुरी येथील बस स्थानकावरून बस ने प्रवास करतात. राहुरी येथील बस स्थानक हे पन्नास वर्षी पूर्वी बांधकाम झालेले असून सध्या हे बस स्थानक अखेरची घटका मोजत असून येणाऱ्या प्रवासी जनतेच्या प्रवासासाठी धोकादायक बनले आहे. येथील उपहार गृह हे सात ते आठ वर्ष्यापासून बंद झालेले आहे.उपहार गृह बंद असल्याने महामंडळाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे.बस स्थानकच्या आवारात मोठ मोठे खडे पडले असून प्रवाशी व शालेय विद्यार्थी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बस स्थानक इमारतीवरील भिंतीना मोठ मोठे तडे गेलेले आहे. राहूरी बस स्थानकाची दुरावस्था लक्षात घेताच जेष्ठ नेते व खासदार प्रसाद तनपुरे यांनी जानेवारी 2021ला आघाडी सरकारच्या काळात उपमुख्...

चिखलठाण येथे रमजान ईद (ईद उल फित्र)मोठ्या उत्साहात संपन्न

Image
        शेख  युनूस अहमदनगर /.. राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण  येथे  रमजान ईद मोठ्या थाटामाटात व शांततेत संपन्न करण्यात आली.   रमजान ईद ही मुस्लिम बांधवासाठी वर्षातील एक मोठा  सण  मनाला जातो. मुस्लिम बांधवासाठी वर्षाचे बारा महिने त्यातील नववा महिना म्हणजे रमजान ईद ईद  उल फित्र होय.    रमजान  ईद  सणाची  सुरुवात ही चंद्र  दर्शनानं होते. रोजा म्हणजे रमजान व्रत एक महिना उपवास ठेवण्यात येतात. मुस्लिम बांधव, लहान, मोठे, आबाल व्रद्ध हे रमजानचे  रोजे करतात. रोजे हे सूर्योदया पासून ते सूर्योस्ता पर्यंत मुस्लिम बांधव काहीच खात पीत नाही. निर्वेसनी राहून उपवास रोजे ठेवतात. रमजान महिन्यात रोजे ठेवले म्हणजे माणसाची सर्व पापे, गुन्हे जळून जातात असे मानले जाते.    रोजांची  सांगता रमजानच्या ईद  सणाच्या दिवशी होते. रोजामुळे आरोग्याचा विचार तर  आहेच शिवाय वर्षभर आपले  आचार  विचार, संयमीत पवित्र राहावेत यासाठी रोजे असतात. गोरगरीबाची  भूक  काय असते याची प...

राहुरीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार शेख फासीयोदिन व प्रांतधिकारी अनिल पवार यांचा निरोप समारंभ संपन्न

Image
                                                 शेख  युनूस अहमदनगर /.. राहुरी तालुक्यातील कर्तव्यदक्ष  व लोकप्रिय तहसीलदार फासीयोदिन शेख यांची  नुकतीच बदली झाली. गेल्या चार  वर्षात शेख  साहेबांची कामाची व सर्वसामान्य जनतेशी  असलेल्या आपुलकी असल्याने कामाला ऊर्जा मिळाल्यामुळे राहुरी तालुक्यातील जनतेने भरभरून  प्रेम आणि  सहकार्य केले असल्याने तो ठेवा  आयुष्यातला  एक लाख  मोलाचं असल्याने तो आयुष्यातला महत्वाचा ठेवा  जपेल असे मत व्यक्त केले.                                                          राहुरीतील जनतेच्या  आठवणी दाटून येतात व आपल्यावरील  जनतेचे  प्रेम यामुळे आपल्या नयन आश्रू  भरून  येतात अशी  भावनिक  साद तहसीलदार फासीयो...

बिरोबा मंदिरासाठी ५० लक्ष रुपये मंजूर

Image
  भाजप सरकारने बिरोबा मंदिराच्या सुशोभीकरणासाठी दिले तब्बल 50 लक्ष रुपये शेख युनूस अहमदनगर संगमनेर तालुक्यातील पठारभागासह साकूरचे ग्रामदैवत म्हणून श्री बिरोबा देवस्थानची ओळख आहे. तसेच राज्यातील भक्तगणांचे आराध्यदैवत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिरोबा देवस्थान मंदिर परिसराचा विकास खुंटला आहे. म्हणूनच सुशोभीकरणासाठी विद्यमान शिंदे - भाजप सरकारचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांनी तब्बल 50 लक्ष रुपये मंजूर केले आहे .  परंतु मंजूर निधीचे श्रेय घेण्यासाठी साकूरमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विधानपरिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून निधी मंजूर झाल्याचे सांगत फ्लेक्सबाजी करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. तसेच श्रेयावादाची चांगलीच चढाओढ लागली आहे. आमदार सत्यजित तांबेंनी नुकतीच बिरोबा मंदिर परिसरात सदिच्छा भेट देत हा निधी मीच मिळवून दिला असे छाती ठोक पणे सांगत आहेत. तसेच साकूर पठारभागातील भाजपचे विखे समर्थक हे देखील हा निधी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला असल्याचे जाहीर सांगत आहे. परं...

बिरोबा मंदिरासाठी 50 लक्ष रुपये मंजूर

Image
  शेख युनूस अहमदनगर प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील पठारभागासह साकूरचे ग्रामदैवत म्हणून श्री बिरोबा देवस्थानची ओळख आहे. तसेच राज्यातील भक्तगणांचे आराध्यदैवत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिरोबा देवस्थान मंदिर परिसराचा विकास खुंटला आहे. म्हणूनच सुशोभीकरणासाठी विद्यमान शिंदे - भाजप सरकारचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांनी तब्बल 50 लक्ष रुपये मंजूर केले आहे.  परंतु मंजूर निधीचे श्रेय घेण्यासाठी साकूरमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विधानपरिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून निधी मंजूर झाल्याचे सांगत फ्लेक्सबाजी करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. तसेच श्रेयावादाची चांगलीच चढाओढ लागली आहे. आमदार सत्यजित तांबेंनी नुकतीच बिरोबा मंदिर परिसरात सदिच्छा भेट देत हा निधी मीच मिळवून दिला असे छाती ठोक पणे सांगत आहेत. तसेच साकूर पठारभागातील भाजपचे विखे समर्थक हे देखील हा निधी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला असल्याचे जाहीर सांगत आहे. परंतु सत्यजित तांबे आमदार होऊन काही महिने झाले नाही तोच त्य...

चिखलठाण येथे ड्रॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती थाटामाटात संपन्न

Image
  अ.नगर प्रतिनिधी /शेख  युनूस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या चिखलठाण येथे  ड्रॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  जयंती  मोठया थाटामाटात साजरी करण्यात आली.              भीम  जयंती  साजरी करताना  सर्व प्रथम  ड्रॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  चिखलठाण येथील  हनुमान मंदिरामध्ये भीम जयंती चे  आयोजन  करण्यात आले  होते. भीम जयंती  साजरी  करताना भव्य  दिव्य मिरवणूक काढण्यात आली. भीम  गीते, शिव  गीतांच्या सुरु तालावर युवक, युवतींनी भीम जयंती  साजरी केली.                                             यावेळी उपस्थित शिवसेना  तालूका उपाअध्यक्ष सुभाष बाचकर, उपसरपंच आबासाहेब काळणर, शरद  बागुल, गणेश बागूल, आण्णा  बाचकर, चंदर  तमनर, दीपक  काळनर, महादू  काळनर, किरण बागुल, धीरज...

वरवंडी गावची व शिवसेनेची बुलंद तोफ कैलास पाटोळे यांचे दुःख द निधन

Image
                                  शेख  युनूस  अहमदनगर/.. संगमनेर / तालुक्यातील वरवंडी येथील  कैलास पाटोळे यांचे रविवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास दुःखद  असे निधन  झाले.            कैलास पाटोळे हे संगमनेर तालुक्यातील कट्टर शिव सैनिक  असून ते पिंपळगाव देपा गणा चे  गणप्रमुख  होते. कैलास पाटोळे यांच्या अचानक  जाण्याने वरवंडी तसेच संगमनेर तालुक्यातील जनतेवर  दुःखाचा डोंगर  कोसळला आहे.कैलास पाटोळे हे शिवसेनेची  बुलंद तोफ व एक निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याने शिवसेनेचा वाघ हरपला  असल्यामुळे नातेवाईक, मित्र परिवार, आणि  कुटुंबावर  फार मोठ्या प्रामानावर दुःखाचा  डोंगर  कोसळलेला आहे.                                    कैलास  पाटोळे यांच्या धाडसी व मोठया योगदाना मुळे संगमनेर तालुक्यात आगळी  वेगळी...

संगमनेर तालुका युवा तालुका प्रमुख पदी योगेश खेमनर यांची नियुक्ती

Image
  शेख  युनूस अहमदनगर /..   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांनी शिर्डी लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून संगमनेर पठार  भागातील  साकूर येथील युवक  कार्यकर्ते योगेश किसन  खेमनर यांची  संगमनेर पठार भागातील युवासेना पदी  निवड  करण्यात आली.                                                  योगेश  खेमनर  हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे खंबीर  व कट्टर  कार्येकर्ते असून त्यांची सर्व सामान्य जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर  समाजसेवा व न्याय हक्कासाठी नेहमी अग्रेसर असून ते आपल्या व आपल्या देशावरील  प्रेम जोपसात  आहे.           योगेश खेमनर  यांच्या संगमनेर  तालुकापदी  निवड  झाल्याने संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन व स्वागत होत आहे . युवा सेना प्रमुख आदित्य साहे...

शितल पानमंद हिची मुंबई पोलीस दलात निवड

Image
  पारनेर / तालुक्यातील वारणवाडी येथील शितल तुळशीराम पानमंद हीची नुकतीच मिरा भाईंदर ( मुंबई) पोलिस दलात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी तीची ढोल पथकाच्या गजरात मिरवणूक काढून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तर यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांनी कु. शितलचा सत्कार करून अभिनंदन केले .तर गावातील तरुणांनी लेझीम पथक व वाजंत्री लावून गावातून शितल पानमंद हिची मिरवणूक काढली होती.   यावेळी ग्रा.पं. सदस्य संजय काशिद, शाखा प्रमुख संदीप काशिद, युवा सेनाप्रमुख विशाल कोकाटे, उप शाखा प्रमुख गणेश काशिद, युवा सेना उपप्रमुख बाबासाहेब काशीद, संघटक अशोक बेलकर संतोष पानमंद,  पंडीत गायखे, सुदाम काशिद ,रविंद्र आहेर, अमोल पानमंद, संतोष कोकाटे पाटील, काशिद, तुळशीराम पानमंद, सुरेश काशिद, चेतन काशिद, अभिषक पानमंद कृष्णा काशिद, ग्रा.प क्लार्क सुरेश बेलकर, बायसा काशिद, अशोक  काशीद पोपट वाडेकर  आदि उपस्थित होते

भारत रत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

Image
  शेख  युनूस  अ.नगर /.. राहूरी तालुक्यातील पश्चिमला असलेल्या शेरी चिखलठाण  येथिल  जिल्हा प्राथमिक शाळा व शेरी अंगणवाडी  क्रमांक 60 या ठिकाणी  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती मोठया  थाटामाटात  संपन्न करण्यात आली.सर्व प्रथम बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. या वेळी शिक्षक व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आपले विचार व्यक्त केले त्यात त्या म्हणाल्या,भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे,सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले.देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारत...

प्रहार जनशक्ती पक्ष ज्या मंडळासोबत असेल त्यांचेच बहुमत- सुरेशराव लांबे पाटील

Image
  शेख  युनूस अहमदनगर : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष ज्या मंडळासोबत असेल त्या मंडळाचे बहुमत होईल असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले आहे. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक सन 2023 - 28 या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने स्वतंत्र पॅनल तयार केला असुन, अर्ज भरलेले अनेक उमेदवार प्रहारच्या संपर्कात आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा प्रचार दौरा चालु असुन शेतकरी वर्गातील मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा कार्यक्षेत्रात गेल्या हंगामात नोव्हेंबर 2022 ला शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच पुन्हा अवकाळी पावसाने थैमान सुरू केले. त्यात शेतक-यांचे कांदा, गहु, फळबाग, भाजीपाला, व ईतर पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर डिझेल, पेट्रोल, रासायनिक खते, कीटकनाशक औषध व मजूर मशागतीचा झालेला खर्च ही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य, अन्न, वस्त्र व निवारा हे अत्यावश्यक असणारे मुलभूत गरजा पुरविणेही ...

इंदिरा गांधी नर्सिंग स्कूलच्या उज्वल यशाची परंपरा कायम.

Image
  संपादक - शेख  युनूस       पारनेर येथील आनंद मेडिकल अँड एज्युकेशनल फाउंडेशन संचलित इंदिरा गांधी नर्सिंग स्कूलने (ANM) प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. प्रथम वर्ष ए.एन.एम च्या महाराष्ट्र राज्य पॅरावैद्यक व सुश्रुषा मंडळ यांचे मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ४ विद्यार्थिनी विशेष प्राविण्यसह तर ४ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. कु. कोमल सुनील भोर ही ८४.२% मिळवून प्रथम, कु. आकांक्षा संपत गवळी ८२.७% मिळवून द्वितीय, कु. दीक्षा दीपक देठे ८१.७% मिळवून तृतीय व कु. माया नानासाहेब लोखंडे ८०.२% मिळवून विशेष प्राविण्यास उत्तीर्ण झाल्या आहेत तर कु. अपेक्षा खोसे,कु. निकिता खोसे कु. प्रियंका कसबे व कु. श्रद्धा जगदाळे या प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाल्या आहेत.       नर्सिंग स्कूलच्या स्थापनेपासून निकाल १००% लागत आहे. ग्रामीण भागातील महिला व मुलींना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक जागृती करिता नर्सिंग कोर्सचा फार मोठा हातभार लागल्याची माहिती यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डाॅ. सादिक राजे यांनी दिली. येत्या शैक्षणिक व...

आश्रमशाळा ढवळपुरी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

Image
  संपादक - शेख युनूस       स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील आश्रमशाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आश्रमशाळेच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक संदीप महांडुळे, शिक्षक लतिफ राजे, वसंत काळे, राजाराम वाघ, संतोष पट्टेकर, श्रीमती मनीषा गर्जे, रशिदा तांबोळी आदी उपस्थित होते.          मुख्याध्यापक संदीप महांडुळे म्हणाले की महात्मा फुले यांनी मोठ्या कष्टाने समाजोद्धाराचे काम काम केले आहे. प्रत्येक मनुष्याला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी अंधश्रद्धा, कर्मकांड विरोधात लढा उभा करुन न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. स्त्री शिक्षण व बहुजनांच्या शिक्षणाचे जनक म्हणून त्यांच्या कार्याचे स्मरण आपण कायम ठेवले पाहिजे. समाजोन्नत्तीच्या कार्यातून त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीतून आचरणात आणले गेले पाहिजे. याप्रसंगी काही शिक्षक व विद्यार्थ्यांचीही भाषणे झाली. यावेळी विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले...

मधमाश्यांची काळजी का घ्यावी ! वाचा सविस्तर..

Image
    युनुस शेख अहमदनगर    फुलांना होनारा मधमाशी चा स्पर्श म्हणजेच लोखंडाला परिसाचा स्पर्श होण्यासारखाच असतो. फुलांना मधमाशी चा स्पर्श हा परिसस्पर्शा ईतकाच सामर्थशाली असतो.यासाठी शेतातून सतत सोने पिकवायचे असेल तर मधमाशांची काळजी घेणे गरजेचे आहे.       आपण सर्वच शेतकरी स्वता शेतीचे सर्वच कामे करत असतो. शेतीमंध्ये मेहनत करुन सोन्यासारखे पिके तयार करून त्यामधुन ऊत्पादने घेत असतो मात्र आपल्याला ऊत्पादने घेण्यासाठी व शेती करण्यासाठी मुंग्या, मधमाशा, मित्र किटक, गांडुळे, साप, पक्षी असे सर्वच जीवजंतू मदत करत असतात. परंतु ह्या सर्वांमध्ये मधमाशा आघाडीवर असतात.  मधमाशी नष्ठ झाली तर ०४ ते १० वर्षांपासून पुढे मानव जात ही नष्ठ होण्यास सुरुवात होईल.कारण मधमाशा विविध प्रकारच्या वनस्पतींचे परागीभवन (pollination)  करीत असतात. अनेक फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला पिके व धाण्यपिके यांचे परागीभवन फक्त मधमाशी च करु शकते. विशेष म्हणजे जे अण्ण् परागीभवन होऊन येत नाही ते अण्ण् खाण्यासाठीही पौष्टीक नसते.        आपण अलिकडे अनेक डाळिंब बागायतदार मधमाशांच्य...

शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून मदत करावी - सुरेशराव लांबे पाटील

Image
  युनुस शेख अहमदनगर राहुरी नगर पाथर्डी विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आठवड्यामध्ये पाऊस झाल्याने कांदा व इतर भुसार मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शासन व प्रशासन यांनी तातडीने पंचनामे करून अतिवृष्टीचे पहिले अधिक चालू असे एकरी 50 हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करावी अन्यथा सरकार मध्ये सहभागी असून सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाला आंदोलन करावे लागेल असा इशारा राहुरीचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिला. लांबे पाटील हे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने वरवंडी येथे मतदाराच्या गाठीभेती घेत असताना वरवंडी येथील मतदार भाऊसाहेब सिद्धू काळे यांच्या घरी गेले असता त्यांचे कुटुंब चिंताग्रस्त अवस्थेमध्ये बसलेले असताना त्यांनी त्यांच्या चार एकर कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली त्यावेळी त्यांच्या शेतात समक्ष जाऊन पाहणी करून तुमच्या भावना शासनापर्यंत पोहोचून तुम्हाला तुमच्या पिकाचे पंचनामे करून शासनाकडून तातडीने मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही देऊन त्यांना दिलासा दिला लांबे पाटील यां...

शेरी चिखलठाण येथे अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Image
‌  संग्रहित छायाचित्र    शेख युनुस अहमदनगर - राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत हाताशी आलेली पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  चिखलठाण हे बागायती क्षेत्र असून येथे मोठ्या प्रमाणात टोमॅटो टरबूज खरबूज,कांदा आणि गव्हाची पिके घेतली जातात.सध्या गव्हाची पिके सोंगण्याची तयारी जोरदार असून अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्थ झालेला आहे. टरबूज, खरबूज,टमाटे हि पिके सुध्दा या पावसामुळे व‌ सुसाट वाऱ्यामुळे फळे खराब होऊन झोडपलेली आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाखो रुपये खर्च करून पिके उभारलेली असून आता तो या अवकाळी पावसामुळे पुर्णपणे आर्थिक संकटात सापडलेला आहे.   संकटात सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार आबासाहेब काळनर (सामाजिक कार्यकर्ते ) शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव भाव नाही त्यात अवकाळी पावसामुळे मोठी हानी झाली आहे.ग्रामपंचायत मार्फत सर्व शेतकऱ्यांच्या मालाचा तपशील घेऊन झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करून ग्...

निघोज च्या माधुरीताई ढवळे यांचे देदीप्यमान यश

Image
  निघोज / पारनेर - जीवनातील संघर्ष हाच यशाचा मार्ग आहे. त्याचा सामना करणारा यशस्वी होतो. तर पराभवाचा विचार करून संघर्षाच्या मार्गापासून लांब जाणारा व्यक्ती जीवनात आपले ध्येय गाठू शकत नाही .   पारनेर तालुक्यातील निघोज येथील माधुरीताई सदानंद ढवळे यांनी पुण्यातील राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज या महाविद्यालयातून कायद्याचे पदवी (एलएलबी) परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून वकिली व्यवसायाची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचेकडील सनद प्राप्त केलेली आहे त्यांचे या यशामुळे निघोज परिसरातून त्यांचेवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.   निघोज येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ राजू भिकाजी ढवळे यांच्या या पत्नी असून श्री दत्तात्रय धोंडिबा देशमुख ( मंचर, ता. आंबेगाव, पुणे) यांच्या त्या कन्या आहे. विवाहा नंतर त्यांनी त्यांचे राहिलेले शिक्षण पूर्ण करून वकिलीची सनद मिळवत सर्व महिला भगिनींसाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे व ही बाब निघोज गावासाठी देखील अभिमानास्पद आहे . त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या माहेर कडील मंडळी, सासर कडील मंडळी तसेच इतर नातेवाईक यांचा देखील खूप मोठा वाटा आहे. घरातील सर्व जबाबदाऱ...

साकूर येथील बनाची देवी (मुक्ताई) यात्रेचे आयोजन

Image
    ‌  शेख युनुस /.. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील ग्राम दैवत बनाची देवी ( मुक्ताई ) यात्रा हि परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षापासुन नियोजनबद्ध व उत्साहात संपन्न करण्यात येते.                              ‌‌        साकूर पंचक्रोशीतील बन परिसरातील आराध्य जागृत ग्राम दैवत मुक्ताई म्हणजे च बनाची देवी यात्रा ही दिनांक 9 मार्च व 10 मार्च रोजी होणार आहे. संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती व साकूरचे आदर्श सरपंच शंकरराव पाटील खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनबद्ध  यात्रा कमिटी च्या वतीने जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती यात्रा कमिटी चे अध्यक्ष अनिलशेठ नानाभाऊ खेमनर पाटील यांनी दिली.                              ‌      हरिश्चंद्र येथून उगम पावणाऱ्या मुळा नदीच्या निसर्गाच्या सुंदर नदीच्या तिरावर  बनपरिसरात मुक्ताई आई बनाची आई ओळखले जाणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याती...

चांदशहावली बाबा (चिखलठाण) यात्रा उत्सव थाटामाटात संपन्न

Image
               ‌ शेख युनुस अहमदनगर   राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील जागृत देवस्थान असलेले सर्वधर्मीय समाजाचे चांदशहावली बाबा यात्रा मोठ्या थाटामाटात  आयोजित करण्यात आली .                          ‌     चिखलठाण गावामध्ये सुमारे 40 वर्षापासून चांदशहावली बाबा यात्रा ही अखंडपणे सुरू असून तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्वभक्त भाविकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येते तसेच  महिला बंधू भगिनी मुले मोठ्या संख्येने यात्रेत सहभाग नोंदवितात. चांदशहावली बाबा यात्रेनिमित्त शनिवारी रात्री चिराख्याची आरती करण्यात आली. चिखलठाण गावातून ते चांदशहावली बाबा  दर्गाह पर्यंत ढोल ताशेच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.चिराख्याच्या मिरवणूकीत महिलांनी विशेष सहभाग घेतला हजारो चिराख्यांच्या दिपप्रज्वलनामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता तसेच भव्य दिव्य मिरवणूक शांततेत पार पाडण्यात आली.               ...

सर्वसामान्यांसाठी वाळू स्वस्त! ६०० रुपये प्रती ब्रास दरात मिळणार वाळू!

Image
  शेख युनुस अहमदनगर  महसूलमंत्र्यांचा जनसामान्यांना दिलासा! घरांच्या किंमतीही आवाक्यात लिलाव बंद होणार आणि आता डेपोतूनच वाळू ६०० रुपयात मिळणार महसूल विभागाच्या निर्णयावर मंत्रीमंडळाचे शिक्कामोर्तब   राज्यातील सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या महसूल विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर मंत्रीमंडळाने आज शिक्कामोर्तब केल्याने ६०० रुपये प्रती ब्रास दरात वाळू उपलब्ध होणार आहे, तसेच यामुळे जनसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येतील. वाळू  लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच ६०० रुपयात वाळू उपलब्ध होईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली. मुंबई मंत्रालय येथील दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. राज्यातील वाळू लिलाव प्रक्रियेवरुन सातत्याने अनेक तक्रारी येण्याबरोबरच अनियमिततेला आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी घेत राज्यात थेट नवीन वाळू धोरण आणण्याचे निश्चित केले. याच वाळू धोरणावर मंत्रीमंडळाने आज शिक...

बागेश्वर वर कारवाई करा - विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रची मागणी

Image
  सबका मालिक एक असे सांगून धार्मिक व सामाजिक ऐक्य घडवून माणूसपणाला महत्त्व देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबावर कारवाई करा - विद्रोही सांस्कृतिक चळवळ , महाराष्ट्र ची मागणी            शेख युनुस अहमदनगर  ( दि. ४ ) - शिर्डीचे साईबाबा हे हिंदू सुफी पंथातील होते. त्यांनी कधीही आपण भगवान असल्याचा दावा केलेला नाही. त्यांनी सब का मालिक एक असे सांगून एकेश्वर वादाचा प्रचार आणि प्रसर केला. त्यांनी जाती आणि धर्मापेक्षा माणूसपणाला जास्त महत्त्व दिले. त्यामुळे सुफी परंपरा आणि वारकरी परंपरेने जशी मनुस्मृती नाकारली. धर्मभेद , जातीभेद नाकारले तेच कार्य शिर्डीच्या साईबाबांनी केले. म्हणूनच महाराष्ट्राच्या जडणघडणीत जसे वारकरी संतांचे स्थान आहे. तसेच हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक ऐक्य याबाबत शिर्डीच्या साईबाबांचे महत्त्वाचे स्थान आहे. अशा शिर्डीच्या साईबाबांच्याबद्दल बाष्कळ वक्तव्य करून त्यांच्या कार्याचा अपमान करणाऱ्या तथाकथित बागेश्वर बाबाचा विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत आणि सरकारने त्या...