कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

आश्रमशाळा ढवळपुरी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

 


संपादक - शेख युनूस 


     स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील आश्रमशाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आश्रमशाळेच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक संदीप महांडुळे, शिक्षक लतिफ राजे, वसंत काळे, राजाराम वाघ, संतोष पट्टेकर, श्रीमती मनीषा गर्जे, रशिदा तांबोळी आदी उपस्थित होते. 

       मुख्याध्यापक संदीप महांडुळे म्हणाले की महात्मा फुले यांनी मोठ्या कष्टाने समाजोद्धाराचे काम काम केले आहे. प्रत्येक मनुष्याला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी अंधश्रद्धा, कर्मकांड विरोधात लढा उभा करुन न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. स्त्री शिक्षण व बहुजनांच्या शिक्षणाचे जनक म्हणून त्यांच्या कार्याचे स्मरण आपण कायम ठेवले पाहिजे. समाजोन्नत्तीच्या कार्यातून त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीतून आचरणात आणले गेले पाहिजे. याप्रसंगी काही शिक्षक व विद्यार्थ्यांचीही भाषणे झाली. यावेळी विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिक्षिका श्रीमती संगीता मोरे, भावना बेरड, सोनाली नारायणे, प्रशांत पादीर, देवका पायमोडे, कृष्णा धुमाळ, सुरजसिंग वाणी, अमोल बांगर, सनी काळे, समाधान भोसरी, संदीप जाटे, रभाजी भागवत, सुरेंद्र पाटील, आप्पासाहेब वाबळे, लाकूडझोडे सर, सुंबे सर तसेच विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आश्रमशाळेच्या प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहारांची सुंदर अशी सजावट करण्यात आली होती.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु