कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

 कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज 



अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.  

     अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत

त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।

चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥

     या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.

     शिर्के महाराज यांनी सांगितले की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्म महोत्सवाचे 750 वर्षे पूर्ण झालेत त्याचे अवचित्त साधुन हरिपाठ या सुत्रबध्द पण वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांची साधनेची संध्या हरिपाठ आहे असे मत व्यक्त केले. 

     यावेळी मृदंगाचार्य संगीतअलंकार संकेत महाराज आरोटे, गायनाचार्य संगीत विशारद अनिल महाराज रुपवते, प्रवीण महाराज पांडे, गणेश महाराज वाकचौरे, विणेकरी गंगाबाबा वाकचौरे, हार्मोनियम वादक डॉ. विकास वाकचौरे, सूर्यकांत ढगे, देवराम महाराज वाकचौरे, सिताराम वाकचौरे, संभाजी वाकचौरे,दिलीप ढगे, भाऊसाहेब वाकचौरे, सतीश वाकचौरे यांची संगीत साथ लाभली. सायंकाळी हभप संस्कृती वाकचौरे यांचे प्रवचन संपन्न झाले.

आज शनिवारी प्रवचन सेवा रोहिणीताई गडकरी सुलतानपूर तर किर्तनसेवा विनोदाचार्य पांडुरंग महाराज उगले, परभणी यांची होणार आहे.




Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु