कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर / तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या खंडेरायवाडी (पिंपळगाव देपा ) येथील शालेय विद्यार्थीनी ९ जून रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान, शाळेत जाते म्हणून घरी सांगून गेली, ती अद्याप (१८ ऑगस्ट) पर्यंत घरी परतली नसून तीन महिन्यांपासून ती बेपत्ता आहे. अशा आशयाची फिर्याद मुलीच्या पालकांनी पोलिसांत दाखल केली आहे.
वैष्णवी सोपान तळेकर असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव असून याबाबत तिचे वडील सोपान दत्तू तळेकर (वय-४२, खंडेरायवाडी ) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
चंदनापुरी येथील चंद्नेश्वर माध्यमिक विद्यालयात शिकत असलेली विद्यार्थीनी ९ जून रोजी शाळेत जाते म्हणून घरून गेली. मात्र, तेव्हापासून ती घरी परतली नाही. यादरम्यान तीच्या कुटूंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. अखेर पालकांनी घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. सदर मुलीचे वर्णन वय १५ वर्षे ३ महिने,रंग गोरा,उंची-५.४ इंच,चेहरा-गोल,डोळे-काळे,नाक-सरळ,केस-लांब,काळे तांबूस,अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस,पायात सॅण्डल असे असून ही मुलगी कोठे आढळून आल्यास घारगाव पोलीस ठाण्यास (०२४२५-२७०५३३)या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन घारगांव पोलिसांनी केले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते हे करीत आहेत.
Comments
Post a Comment