कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावा अंतर्गत असणार्या येठेवाडी परीसरातील वांदरकडा येथे विजवाहक तारेचा जोरदार धक्का बसून चार चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक ८ ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की वांदरकडा परीसरात अजित व अरुन हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबासोबत राहत असून मोलमजुरी करतात त्यांचे दर्शन अजित बर्डे- वय ८ वर्ष,विराज अजित बर्डे-वय ६ वर्ष ,अनिकेत अरुन बर्डे-- वय १२ वर्ष,ओमकार अरुन बर्डे- वय १० वर्ष हे लहानगे चिमुरडी मुले शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर जवळच खेळण्यासाठी गेले होते . दरम्यान जवळच असलेल्या नाल्याच्या काठावर खेळत असताना विजवाहक तारेचा त्यांना जोरदार धक्का बसून ही चारही मुले जागीच ठार झाले. तर परीसरात शेळ्या चारत असलेली त्यांची आज्जी अलकाबाई हौशीराम बर्डे यांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी जोरजरात आरडाओरडा केला व आजुबाजुचया नागरीकांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली व ही माहिती घारगांव पोलिसांना देण्यात आली तर गेल्या तीन ते चार दिवसांपासून ही विजवाहक तार तुटलेली होती. परंतु महावितरणच्या दुर्लक्षाने व गलथान कारभाराने या चारही लहानग्यांच्या बळी गेला आहे.असे सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघ म्हणाले
दरम्यान घटनेची माहिती समजताच शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांना याबाबतची माहिती दिली आहे .
तर माहीती मिळताच वायरमन विजय भालेराव, पोलिस निरीक्षक सुनील पाटील,पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू खेडकर , राजेंद्र लांघे, प्रमोद चव्हाण,हरीचंद्र बांडे,तलाठी युवराजसिंग जारवाल आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले
Comments
Post a Comment