कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

शेख युनुस अहमदनगर
राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील जागृत देवस्थान असलेले सर्वधर्मीय समाजाचे चांदशहावली बाबा यात्रा मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आली .
चिखलठाण गावामध्ये सुमारे 40 वर्षापासून चांदशहावली बाबा यात्रा ही अखंडपणे सुरू असून तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्वभक्त भाविकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येते तसेच महिला बंधू भगिनी मुले मोठ्या संख्येने यात्रेत सहभाग नोंदवितात. चांदशहावली बाबा यात्रेनिमित्त शनिवारी रात्री चिराख्याची आरती करण्यात आली. चिखलठाण गावातून ते चांदशहावली बाबा दर्गाह पर्यंत ढोल ताशेच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.चिराख्याच्या मिरवणूकीत महिलांनी विशेष सहभाग घेतला हजारो चिराख्यांच्या दिपप्रज्वलनामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता तसेच भव्य दिव्य मिरवणूक शांततेत पार पाडण्यात आली. रविवारी संध्याकाळी चांदशहावली बाबा दर्गाहवर फुलाची चादर घेऊन (छबीना) घेऊन भव्य मिरवणूक काढत फुलांची भव्य चादर चांदशहावली बाबा दर्गाहावर अर्पण करण्यात आली. यात्रेनिमित्त मनोरंजनासाठी जगनकुमार आणि हौशाअक्का तमाशा आयोजित करण्यात आला होता. सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जंगी हगामा कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.101 रुपयांपासून ते 51 हजारांपर्यंत कुस्ती लावण्यात आली.पुणे,नाशिक, सोलापूर, धुळे जिल्ह्यातील पहिलवानांनी आपली उपस्थिती दर्शवली व कुस्ती हगाम्याला शोभा वाढवून जंगी कुस्त्यांनी परिसर दुमदुमून टाकला. चांदशहावली बाबा यात्रेनिमित्त हजारो संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला तसेच यात्रा कमिटी ने विशेष सहकार्य करत कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता शांततेत व नियोजनबद्ध यात्रा संपन्न केली.
यावेळी प्रमुख उपस्थिती भक्त भाविक, राहुरी तालुका पोलीस कर्मचारी, व चिखलठाण येथील संतोष शेठ काळनर (भाऊ उद्योग समूहाचे संस्थापक),बबलू काळनर( भाऊ हाडवेअर),दगडू खेमनर,मुनीर सय्यद,सिकंदर सैय्यद, चेतन काळनर,जमीर सय्यद, धिरज टेमकर ,शरद बागुल आदी भक्त भाविकांनी,तरूण मंडळाने सहभाग नोंदवला.
Comments
Post a Comment