कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

बागेश्वर वर कारवाई करा - विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रची मागणी

 सबका मालिक एक असे सांगून धार्मिक व सामाजिक ऐक्य घडवून माणूसपणाला महत्त्व देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबावर कारवाई करा - विद्रोही सांस्कृतिक चळवळ , महाराष्ट्र ची मागणी       



    शेख युनुस अहमदनगर  ( दि. ४ ) - शिर्डीचे साईबाबा हे हिंदू सुफी पंथातील होते. त्यांनी कधीही आपण भगवान असल्याचा दावा केलेला नाही. त्यांनी सब का मालिक एक असे सांगून एकेश्वर वादाचा प्रचार आणि प्रसर केला. त्यांनी जाती आणि धर्मापेक्षा माणूसपणाला जास्त महत्त्व दिले. त्यामुळे सुफी परंपरा आणि वारकरी परंपरेने जशी मनुस्मृती नाकारली. धर्मभेद , जातीभेद नाकारले तेच कार्य शिर्डीच्या साईबाबांनी केले. म्हणूनच महाराष्ट्राच्या जडणघडणीत जसे वारकरी संतांचे स्थान आहे. तसेच हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक ऐक्य याबाबत शिर्डीच्या साईबाबांचे महत्त्वाचे स्थान आहे. अशा शिर्डीच्या साईबाबांच्याबद्दल बाष्कळ वक्तव्य करून त्यांच्या कार्याचा अपमान करणाऱ्या तथाकथित बागेश्वर बाबाचा विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत आणि सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत आहोत असे निवेदन विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव , सरचिटणीस डॉ. जालिंदर घिगे ,  राष्ट्रीय प्रवक्ते कॉ अविनाश कदम , उपाध्यक्ष प्रा गौतम काटकर व प्रवक्ते आणि उपाध्यक्ष विजय मांडके यांनी प्रसिद्धीस दिले आहे       

  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव व सरचिटणीस डॉ जालिंदर घिगे यांनी असे म्हटले आहे की  अलीकडच्या काळात धर्मांध संघटना व त्यांचे स्वयंभू बाबा मंडळी हे साईबाबा यांनी नाकारलेल्या वृत्ती त्यांच्यावर लादून त्यांच्या ब्राह्मणीकरणाचा  प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या डोक्याला बांधलेले फडके हे पूर्वी हिरवे असायचे. त्यांच्या प्रत्येक फोटोच्या वर सब का मालिक एक असे त्यांचे प्रसिद्ध उच्चारण असायचे. त्यांचा प्रसाद म्हणून पूर्वी मलिदा वाटला जायचा. आता त्या सर्व गोष्टी नियोजनपूर्वक गायब केलेल्या आहेत. त्यांच्या बाबतीत काही चमत्कार रचून ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा पण आम्ही निषेध करतो.                        

बहुजनांचे देव हे ऐतिहासिक महामानव स्त्री-पुरुष आहेत. त्यांनीच समाज घडवला आहे. म्हणून त्यांच्याबद्दल बहुजन समाजात कृतज्ञता आहे. म्हणूनच वारकरी आजही शिर्डीला जातात. त्यांचा अपमान वारंवार केला जातो. काही दिवसापूर्वी एक तथाकथीत शंकराचार्य असेच बोलले होते. आता बागेश्वर नावाचा ग्रहस्थ असाच बोलला आहे. यामुळे बहुजनांची मने दुखावली आहेत. म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो.        दरम्यान महाराष्ट्राने देशाला समता , स्त्रियांचा सन्मान आणि बंधू भावाचा विचार दिला आहे हा विचार देणाऱ्या या महामानवांचा अवमान करण्याचे कारस्थान गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात माजी राज्यपालांपासून ते राजकारण्यांपर्यंत आणि ढोंगी बाबांकडून महामानवांचा जाणीवपूर्वक अवमान केल्याचा प्रयत्न केला जातोय. या अवमान करणाऱ्या सर्वांचा विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र निषेध करीत आहे असे उपाध्यक्ष प्रा गौतम काटकर यांनी म्हटले आहे.        दरम्यान सध्याच्या धार्मिक विद्वेषाच्या काळात साईबाबांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांचे ब्राह्मणीकरण व त्यांच्या भोवती रचल्या जाणाऱ्या अंधश्रद्धांचाही आम्ही विरोध करतो असेही विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांनी म्हटले आहे.               -  

महाराष्ट्र सरकारने या महामानवांचा अवमान करणाऱ्यांवर कायदेशीर मार्गाने कारवाई करावी अशी मागणी करून महाराष्ट्रातील जनतेने विवेकाचा विचार जोपासत महामानवांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना अजिबात थारा देऊ नये असे आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने जनतेला आवाहन करीत आहोत असे प्रवक्ते कॉ अविनाश कदम व विजय मांडके यांनी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु