कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून मदत करावी - सुरेशराव लांबे पाटील

 



युनुस शेख अहमदनगर


राहुरी नगर पाथर्डी विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आठवड्यामध्ये पाऊस झाल्याने कांदा व इतर भुसार मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शासन व प्रशासन यांनी तातडीने पंचनामे करून अतिवृष्टीचे पहिले अधिक चालू असे एकरी 50 हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करावी अन्यथा सरकार मध्ये सहभागी असून सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाला आंदोलन करावे लागेल असा इशारा राहुरीचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिला.


लांबे पाटील हे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने वरवंडी येथे मतदाराच्या गाठीभेती घेत असताना वरवंडी येथील मतदार भाऊसाहेब सिद्धू काळे यांच्या घरी गेले असता त्यांचे कुटुंब चिंताग्रस्त अवस्थेमध्ये बसलेले असताना त्यांनी त्यांच्या चार एकर कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली त्यावेळी त्यांच्या शेतात समक्ष जाऊन पाहणी करून तुमच्या भावना शासनापर्यंत पोहोचून तुम्हाला तुमच्या पिकाचे पंचनामे करून शासनाकडून तातडीने मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही देऊन त्यांना दिलासा दिला लांबे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बद्दलच्या भावना मांडत असताना सरकारवर नाराजी व्यक्त केली.


 गेले दोन-तीन वर्षापासून अतिवृष्टी कोरोना या कारणाने शेतकऱ्यांवर मोठे संकट येत आहे अजूनही अवकाळी थांबायला तयार नाही गेल्यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्याचे अनेक वेळा पंचनामे झाले परंतु शासनाची अतिवृष्टी ची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही त्यातच चालू आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे तरी शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून पहिली अधिक आत्ताची मदत शेतकऱ्यांना तातडीने देऊन सहकार्य करावे.

 शेतकरी व सर्वसामान्यांचे नेते माजी मंत्री आमदार बच्चुभाऊ कडू साहेब यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर आवाज उठवलेला आहे शिंदे फडणवीस सरकारने काही प्रमाणात त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या असून कष्टकरी शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य न केल्यास प्रहार जनशक्ती पक्ष सत्तेत सहभागी असून सुद्धा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही मागेपुढे पाहणार नाही असा सुचक इशारा राहुरी नगर पाथर्डी व राहुरी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष श्री सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु