कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

साकूर येथील बनाची देवी (मुक्ताई) यात्रेचे आयोजन

    ‌ 


शेख युनुस/.. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील ग्राम दैवत बनाची देवी ( मुक्ताई ) यात्रा हि परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षापासुन नियोजनबद्ध व उत्साहात संपन्न करण्यात येते.                              ‌‌     

 साकूर पंचक्रोशीतील बन परिसरातील आराध्य जागृत ग्राम दैवत मुक्ताई म्हणजे च बनाची देवी यात्रा ही दिनांक 9 मार्च व 10 मार्च रोजी होणार आहे. संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती व साकूरचे आदर्श सरपंच शंकरराव पाटील खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनबद्ध  यात्रा कमिटी च्या वतीने जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती यात्रा कमिटी चे अध्यक्ष अनिलशेठ नानाभाऊ खेमनर पाटील यांनी दिली.                              ‌    

 हरिश्चंद्र येथून उगम पावणाऱ्या मुळा नदीच्या निसर्गाच्या सुंदर नदीच्या तिरावर  बनपरिसरात मुक्ताई आई बनाची आई ओळखले जाणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील भक्त भाविक लाखोच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवून बनाच्या आईचे दर्शन घेतात.                     ‌    

कोरोनाच्या काळात दोन वर्ष भक्तांना दर्शनाला व्यत्यय आला असल्याने या वर्षी लाखो संख्येने   भक्त दर्शनासाठी आतूर झालेले आहे. यात्रेला 9 एप्रिल रोजी सुरूवात होणार असून सकाळी 9 वाजता देवीचे चोळी पातळ,मुखवटा मिरवणूक होणार असून दुपारी 4 वाजेच्या सुमारास साकूर ते बन परिसर मुक्ताई मंदिर पर्यंत भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे.               ‌     रात्री 9 वाजता भक्त भाविकांसाठी रसिकांच्या मनोरंजनासाठी मनिषा सिध्दटेककर सह रेश्मा नारायणगांवकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.मुक्ताई देवस्थान येथे मंदिरासमोर शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.                  ‌‌‌    10 एप्रिल रोजी मुख्य यात्रा उत्सव संपन्न होणार असून दुपारी ठीक 3 च्या सुमारास भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून या कुस्ती हगाम्याला अहमदनगर, पुणे,नाशिक, धुळे,सोलापूर आदी जिल्ह्यातील नावाजलेले पैलवान आखाड्यात उतरणार आहे.                                          ‌‌‌    बन देवी च्या( मुक्ताई देवीच्या ) यात्रेनिमित्त येणाऱ्या भक्त भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी यात्रा कमिटी सज्ज असून योग्य नियोजनबद्ध सुरक्षित आयोजन करण्यात आले आहे. यात्रा उत्सव निमित्त कायदा सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी घारगांव येथील पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे

         ‌    बनाच्या आईचे (मुक्ताई देवीच्या ) यात्रेला जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन यात्रा कमिटी चे उपाध्यक्ष मन्सुर पटेल,सचिव भास्कर खेमनर,सदस्य अकबर चौगुले, नामदेव खेमनर चेअरमन, विठोबा खेमनर,शशिकांत केदारी,सचिन सोनवणे सरपंच, मल्हारी सोडनर अभिषेक रोपवाटिका, अल्लीभाई मोमीन भाई भाई रोपवाटिका साकूर,चांगदेव खेमनर,शरीफ पठाण युवक कार्यकर्ते साकूर पठार,फिरोदिया योगेशशेठ,विठूराज मैड साहेब मुळाखोरे संस्थापक अध्यक्ष  आदी मान्यवरांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु