कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

शेख युनूस अहमदनगर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील पठारभागासह साकूरचे ग्रामदैवत म्हणून श्री बिरोबा देवस्थानची ओळख आहे. तसेच राज्यातील भक्तगणांचे आराध्यदैवत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिरोबा देवस्थान मंदिर परिसराचा विकास खुंटला आहे. म्हणूनच सुशोभीकरणासाठी विद्यमान शिंदे - भाजप सरकारचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांनी तब्बल 50 लक्ष रुपये मंजूर केले आहे.
परंतु मंजूर निधीचे श्रेय घेण्यासाठी साकूरमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विधानपरिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून निधी मंजूर झाल्याचे सांगत फ्लेक्सबाजी करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. तसेच श्रेयावादाची चांगलीच चढाओढ लागली आहे. आमदार सत्यजित तांबेंनी नुकतीच बिरोबा मंदिर परिसरात सदिच्छा भेट देत हा निधी मीच मिळवून दिला असे छाती ठोक पणे सांगत आहेत. तसेच साकूर पठारभागातील भाजपचे विखे समर्थक हे देखील हा निधी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला असल्याचे जाहीर सांगत आहे. परंतु सत्यजित तांबे आमदार होऊन काही महिने झाले नाही तोच त्यांनी हा निधी साकूरसाठीच कसा पळवला हा संशोधनाचा विषय आहे. परंतु निधीवरून साकूरमधे श्रेयवादाची लढाई जोरात सुरु आहे. तसेच आ.सत्यजित तांबे यांनी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिलेल्या पत्राचा संदर्भ देत हा निधी मंजूर करून आणला असे सांगत आहे. असो हे मात्र मान्य आहे की मंत्री लोढा यांनी निधी मंजूर केला. याचाच अर्थ शिंदे फडणवीस सरकारने हा निधी मंजूर केला हे सिद्ध होते. तरीही फ्लेक्सबाजी करणे हा राजकीय स्टंट आहे.
साकूरचे बिरोबा मंदिर बांधकाम तसेच परिसर सुशोभीकरणाचे काम कित्येक वर्षापासून कासवगतीने सुरु आहे. कारण यावरूनच संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी कधीही निधी आणल्याचे दिसत नाही. खरे तर हा निधी आधीच या मंदिराला मिळणे अपेक्षित होते परंतु तसे काही घडले नाही. मोठी मोठी मंत्रीपदे, पक्षाचे प्रमुख नेतेपद असताना आपणास हा निधी मिळवता आला नाही. किंबहुना आपली तशी इच्छाशक्ती दिसली नाही. आज मात्र प्रत्येक विकासकामावर आपली मेहेरनजर दिसून येते.
कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते संबोधले जाणारे आ.बाळासाहेब थोरात यांचा तालुक्यात मोठा बडाजाव आहे. प्रत्येक गावात आपले स्वतःचे कार्यकर्ते उभे केले. व त्यांच्या प्रत्येक संविधानीक असंविधानीक कामात मदत केली. कार्यकर्ता आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवला. गावात त्याच कार्यकर्त्यांना नेतृत्व म्हणून पुढे आणले. आपल्या भाच्याला राजकारणातील बाळकडू पाजले आणि ठराविक वेळेला राजकीय धुरंदरांना धोबी पछाड देत आमदार केले. ही पण एक राजकीय खेळी आहे आणि यात सत्यजीत तांबे यशस्वी झाले.
आ.सत्यजित तांबे यांनी निधी साठी संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांकडून पाठपुरावा करत निधी मिळवला असे मत तांबे समर्थकांचे आहे. तर हा निधी भाजपनेच मंजूर केला असे मत भाजपा पदाधिकारी यांचे आहे. परंतु काहीही असो पण बिरोबा मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आलेला निधी कसा अंमलात आणला जातो हे बघणे औचित्याचे ठरणार आहे. कारण कित्येक वर्षापासूनचे रखडलेले मंदिराचे काम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आगामी काळात मार्गी लागेल का असा सवाल उपस्थित होत आहे.
Comments
Post a Comment