कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

जखणगांव ता नगर येथे गेल्या पाच वर्षापासून गोदडशावली बाबांच्या यात्रेनिमित्त फक्त मुलींचा कुस्तीचा जंगी आखाडा भरविण्यात येतो.
राज्यातील विविध भागातून खेळाडू कुस्ती खेळणाऱ्या मुली या हंगाम्यात येत असतात फक्त मुलींच्या कुस्तीचा आखाडा भरविणारे जखणगाव हे राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव गाव आहे.यंदाही यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मुलींच्या कुस्तीचा जंगी आखाडा भरवण्यात आला यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील ५० मल्लिंकांच्या निकाली कुस्त्या झाल्या
एका एका कुस्तीला २ हजारांपासुन ६००० रूपयांपर्यंत ईनाम वाटण्यात आले.गावकर्यांनी उत्स्फूर्तपणे बक्षिसे दीली प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत हलगीच्या तालावर या कुस्त्या अविस्मरणीय ठरल्या.
महिलांच्या स्वयंसुरक्षततेसाठी खेळाला प्राधान्य द्यावे या उद्देशाने आपण दरवर्षी अशा विविध स्पर्धा आयोजित करत असल्याचे सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी सांगितले या आखाड्याचे आयोजनासाठी समस्त ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले
या कार्यक्रमाला जखणगांव चे सरपंच डॉ. सुनिल गंधे, उपसरपंच शाबिया शेख, जिल्हा तालीम संघाचे पै नाना डोंगरे, जागतिक पंच डाँ. रविंद्र कवडे, छत्रपती पुरस्कार प्राप्त पै अंजली देवकर वल्लाकट्टी,पै अकुंश गुंजाळ, सुवर्ण पदक प्राप्त प्रतिभा डोंगरे, मनोज शिंदे, बाकु भापकर,रमेश आंग्रे, प्रगती कर्डीले,बाळासाहेब शहाणे, सुभाष सौदागर, नवनाथ वाळके, गणेश वाळके, प्रवीण कर्डिले, मनोहर काळे, अल्ताफ शेख, अल्फिया शेख,लक्ष्मी कर्डिले, देवा गंधे ,बापु भीसे, संतोष जगताप, सॉलवीन सय्यद,रवि वैराळ ,अल्फिया शेख यांचे सह हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते.
Comments
Post a Comment