कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

*शेख युनूस अहमदनगर*/.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते कोल्हार भगवतीपुर येथे राहता तालुक्यातील महाविकास आघाडीच्या शेतकरी परिवर्तन मंडळाचा प्रचार शुभारंभ संपन्न झाला. सत्ताधाऱ्यांच्या दबाव तंत्र आणि सत्तेच्या गैरवापराविरोधातील ही लढाई आहे, आता परिसरातील जनतेला गृहीत धरून, दादागिरी करून, दमदाटी करून, आजवर जे राजकारण केलं त्याचा बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे असे थोरात साहेबांनी यावेळी सांगितले.
राहाता तालुक्यातील मतदार मोठ्या प्रमाणावर दहशत आणि दादागिरी झुगारून या सभेला उपस्थित होते.
राहाता तालुक्यातील परिवर्तनाची ही सुरुवात आहे असे बहुतांश वक्त्यांनी यावेळी सांगितले.
पारनेर तालुक्यातील लोकप्रिय आमदार निलेश लंके यावेळी आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मधील सहकारी संस्थांच्या कामाची पोचपावती दिली. राज्यात ज्या संस्था चांगल्या चालतात त्यात संगमनेरच्या संस्थांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल असेही त्यांनी सांगितले.
शिवाय बाळासाहेब थोरात शांत दिसत असले, तरीही अंगावर येणाऱ्याला शिंगावर कसं घ्यायचं हे त्यांना पक्क माहित आहे. थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन राहाता तालुक्यातील दहशतीचा करेक्ट कार्यक्रम करू असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलप यावेळी आवर्जून उपस्थित होते. विद्यमान पालकमंत्र्यांच्या रंग बदलण्याच्या प्रवृत्तीचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. याप्रसंगी माजी आमदार डाॅ.सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के, डाॅ. एकनाथ गोंदकर, सौ. प्रभावती घोगरे यांसह महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व राहाता तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment