कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी नूतनी करण कार्यक्रम जाहीर

 


शेख युनूस /. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सरपंच एकत्रित करून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सरपंच  सेवा संघाच्या माध्यमातून गावाचा विकासाचा ध्यास घेऊन गेली अनेक वर्ष राज्यभर कार्यरत असलेली सरपंच संघटना असून या संघटनेची प्रदेश कार्येकरणी ची घोषणा ही दिनांक 28 मे 2023 रोजी अहमदनगर मध्ये होणार आहे.

 कार्येकारणी नूतनीकरण कार्यक्रम दिमाखात होत असून या वेळी महाराष्ट्र राज्यातील सर्व तालूका अध्यक्ष राज्य कार्यकारनी सह सर्व पदाधिकारी मान्यवरांचे पदग्रहण समारंभ बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न  होणार आहे.

  नवीन सरपंच आणि जुने काही पदाधिकारी यांना या मध्ये समाविष्ट करून महाराष्ट्र राज्यात एक चांगल्या प्रकारचे सरपंच संघटन निर्माण करण्यासाठी दिनांक 13 मार्च 2023 ते 28 मे 2023 पर्येंत महाराष्ट्र राज्यात दौरे नियमित सुरु राहणार  आहे.

 या वेळी महाराष्ट्र राज्यातील सर्व सरपंचाना विश्वासात घेऊन पदाधिकारी यांची निवड  केली जाणार आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसदस्य, माजी सरपंच तसेच ग्रामीण तालूका अध्यक्ष, तालूका उपाध्यक्ष, महिला  उपाध्यक्ष, सरचिटणीस व संघटक, संपर्क प्रमुख समन्वक निरीक्षक यांच्या अनेक पदाच्या निवडी तालूका पातळीवर होणार आहे, तरी इच्छुक सरपंच यांनी सहभागी राहावे असे आव्हान युवा नेते रोहित संजय  पवार,अमोल शेवाळे, जनार्धन चांदणे, रवींद्र पवार यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

 ग्रामीण भागाचा  विकास करण्यासाठी सरपंच अहोरात्र गावात कार्ये करत असतात याची  दखल घेऊन मागील काळात अनेक सरपंच यांना सन्मानीत करण्यात आले  आहे.ग्रामीण विकासासाठी चळवळीत सहभागी व्हावे असे आव्हान स्वराज सरपंच सेवा सघाच्या वतीने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु