Posts

Showing posts from January, 2023

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

बोरबन येथे पार पडणार त्रिदिनात्मक मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा

Image
  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोरबन येथे १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी रोजी त्रिदिनात्मक गणपती, ग्रामदैवत मारुती व साईनाथ महाराज या देवांच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे . दरम्यान बुधवारी सकाळी घारगांव बसस्थानकापासून मुर्तींच्या मिरवणूकीला प्रारंभ झाला असून असंख्य महीलांनी डोक्यावर कलश घेऊन या मिरवणूक सोहळ्यात सहभागी झाल्या तर लेझीमच्या डावाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले तर महीलांनीही फुगडीचा आनंद घेतला. व ही मिरवणूक हळूहळू  बोरबन गावच्या दिशेने मार्गस्थ झाली.   तर आज सायंकाळी ७ वा ह.भ.प. दत्तात्रय महाराज भोर यांची किर्तन सेवा संपन्न होणार आहे. तद्नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गु रवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी प्रायश्चित्त विधी,मंडल देवता स्थापना,जलाधिवास, मुर्तीस्थापन विधी,हवन, मुर्तीशय्याधिवास आदि कार्यक्रम पार पडणार असून सायंकाळी ७ वाजता ह.भ.प.केशव महाराज हगवणे ( देहु) यांचे हरी किर्तन होणार आहे.व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पार पडणा...

बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

Image
    संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे भर दिवसा शेतात गवत कापत असताना महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. शकुंतला शंकर मैड (वय ५५) रा. दरेवाडी असे जखमी महिलेचे नाव आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रूग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दरेवाडी शिवारातील लांडगदरा येथे शकुंतला शंकर मैड या वास्तवास आहे. मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शकुंतला मैड घरापासून काही अंतरावरील शिवाजी देवराम शेजवळ यांच्या शेतावरील बांधाच्या कडेला गवत कापत होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शकुंतला मैड यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने शकुंतला यांच्या दोन्ही हाताला चावा घेत गंभीररीत्या जखमी केले आहे. यावेळी शकुंतला यांनी जोरजोरात आरडा ओरडा केल्याने आजुबाजुचे नागरिक धावत आले. त्यानंतर बिबट्याने तेथूनच धूम ठोकली. शकुंतला यांना तातडीने जखमी अवस्थेतच उपचारासाठी साकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यांवर उपचार करण्यात आले परंतू  त्यानंतर त्यांना पुढ...

विहीरीतील पाणबुडी मोटारीची चोरी

Image
  संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील खालची माहुली परीसरातून विहीरीतील पाणबुडी मोटार व स्टार्टरची चोरी झाल्याची घटना गुरुवार दिनांक २६ जानेवारी रोजी रात्री घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दत्तात्रय काशिनाथ गाडेकर हे शेतकरी माहुली येथील रहिवासी असून घरापासून काही अंतरावर त्यांची विहीर आहे.  गुरवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या विहीरीतील मोटारीचा पाईप कापून मोटार व खोक्यातील स्टार्टरची चोरी करून पोबारा केला आहे.  गाडेकर यांचा मुलगा चेतन हा पाणी भरण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याच्या ही गोष्ट लक्षात आली. दरम्यान गाडेकर यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी नवीन मोटार खरेदी केली होती.आणि त्यात आता शेतीचे चालू पाणी बंद झाल्यामुळे गाडेकर यांना डोक्याला  हात लावण्याची वेळ आली आहे.   दरम्यान आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही. त्यात शेतीही पडीक ठेवता येत नसल्याने अनेक शेतकरी कर्ज उचलून शेती करत असतात.  त्यात अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करता करता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात आणी अश्या प्रकारच्या चोऱ्या झाल्यानंतर मात्र शेतकरी हतबल होताना द...

काव्य वाचन स्पर्धेत मांडवेचा विशाल धुळगंड प्रथम

Image
   ( पठार वार्ता / नवनाथ गाडेकर ) निनाद फाऊंडेशन व बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या भव्य ऑनलाइन काव्य स्पर्धेत मांडवेच्या विशाल गिताराम धुळगंड याने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे.       विशाल धुळगंड हा मांडवे येथील रहिवासी असून तो साकुर येथील रमेश फिरोदिया महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. नुकतीच २०२२ ते २०२३ या वर्षांकरीता निनाद फाऊंडेशन व बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय बेलापूर यांच्या वतीने खुल्या काव्य वाचन ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तर त्याचा निकाल नुकताच  जाहीर झाला आहे. यात प्रथम क्रमांकाचे छत्रपती शिवाजराजे पारितोषीक विशाल गिताराम धुळगंड,याला तर द्वितीय क्रमांकाचे महात्मा फुले पारितोषिक ऐश्वर्या पोपट शिंगाडे, हिला तर तृतीय क्रमांकाचे सावित्रीबाई फुले पारितोषिक राखी बन्सीलाल सोंडेकर  हिला मिळाले आहे.   विजेत्यांना शनिवार दिनांक २८/०१/२०२३ रोजी कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय बेलापूर या ठिकाणी मान्यवर व प्रमुख अत...

पत्रकारास जीवे मारण्याची धमकी.

Image
  अहमदनगर राहुरी-ताहाराबाद रस्त्यावरील घटना ; पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शेख युनुस / राहूरी दै. सार्वमंथन वृत्तपत्राचे कार्यालयीन कामकाज पार पाडून घराच्या दिशेने जात असताना राहुरी-ताहाराबाद रस्त्यावर दोन अज्ञात व्यक्तीने पत्रकाराच्या गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली असल्याची घटना  २४ जानेवारी रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तीविरोधात राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सागर माधव दोंदे (वय ३१, रा. म्हैसगाव, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दोंदे कार्यालयीन कामकाज आवरुन स्वतःच्या दुचाकीवरून (एमएच १७, बी क्यु २९१९) राहुरीहून म्हैसगावकडे जात असताना सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास ताहाराबाद रस्त्यावरील सटुआई मंदीराजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकी आडवी लावून दोंदे याना म्हणाले की, कारे तु माजला का. तुझी लायकी काय, तु तुझ्या लायकीत राहा, असे म्हणुन त्यांची गचांडी पकडुन धक्काबुक्की केली आणि आमच्या नादाला लागु नकोस, नाहीतर तुला माझ्या हातात असल...

जेष्ठ निवृत्त शिक्षकांचा स्नेहमेळावा संपन्न

Image
  श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आणे या संस्थेतील‌ सेवानिवृत्त शिक्षकांचा २० जानेवारी रोजी एकत्र येत स्नेह मेळावा संपन्न झाला. तर यातील अनेक शिक्षक वयोवृद्ध झालेले दिसत होते. सर्वच शिक्षक सेवा निवृत्ती नंतर अनेक दिवसांनी एकत्र आल्याने शिक्षकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता अनेक ठिकाणी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाते असेच आयोजन संगमनेर तालुक्यातील घारगांव येथेही काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. तर त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य विश्वनाथ आहेर सर हे होते. तर त्याच वेळी त्यांना संकल्पना सुचली की, सेवानिवृत्त शिक्षकांचाही स्नेह मेळावा घेणे गरजेचे आहे. त्यांनी त्यानुसार शिक्षक पाराजी कडाळे, कमाल शेख यांच्याशी संपर्क साधून  सेवानिवृत्त शिक्षकांचा व्हॉट्स ॲप गृप बनवला व स्नेहमेळावा घेण्याचे ठरले .  त्या नंतर झालेल्या स्नेह मेळाव्यासाठी तब्बल १४० माजी शिक्षकांनी हजेरी लावली होती.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ आहेर हे होते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पेंढार या शाळेतील विद्यार्थीनींनी इशस्तवन व स्वागत गीत गाऊन कार्यक...

चिखलठाण येथे शनीअमावस्येच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न

Image
  शेख युनुस    राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या डोंगराळ व दुर्गम भागातील शेरी चिखलठाण येथे शनी अमावस्येच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  भारत देशात शनी अमावस्येला विशेष महत्व समजले जात असून या  भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शनी शिंगणापूर येथे शनी देवाच्या दर्शनाला मोठ्या संख्येने जातात व शनी देवाचे दर्शन घेतात.                                चिखलठाण येथील काही युवक तरूण कार्यकर्त्यांनी शनी अमावस्येच्या निमित्ताने चिखलठाण येथे कबड्डी, खो खो खेळाचे आयोजन करून खेळाचे महत्व समजून देत स्वस्थ आरोग्य ,निरोगी राहण्यासाठी नेहमी व्यायाम व खेळाला महत्व देण्याचे आव्हान करत खेळाडूंचे आभार सामाजिक कार्यकर्ते  जमीर सय्यद यांनी मानले.            ‌    शनी अमावस्येच्या निमित्ताने  रुपेश  महाराज नाईकवाडी शिंदोडीकर यांची भव्य किर्तन सेवा संपन्न झाली . यावेळी उपस्थित रुपेश नाईकवाडी महाराज म्हणाले कि पशू पक्षा...

लोहार कारागीराची मुलगी महाराष्ट्रात पहीली

Image
  साकुरची तरुणी महाराष्ट्रात पहिली संगमनेर / तालुक्यातील साकूर येथील कु. मनिषा सिताई बबन भालके हिने गेल्या डिसेंबर महिन्यात लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पार पडलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवला होता तर या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मनिषा हीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.  लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डिसेंबर महिन्यात लोहार समाज - दशा आणि दिशा या विषयावर राज्य स्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या विजेत्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये संगमनेर तालुक्यातील साकूर येथील कु मनिषा सिताई बबन भालके हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सौ माधूरी गणेश थोरात यांनी द्वितीय व नगर जिल्ह्यातील राहुरी येथील सौ.अनुराधा ज्ञानेश्वर इघे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.  विजेत्यांना दि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी भोसरी येथील गोविंद गार्डन कार्यालयात होणाऱ्या विश्वकर्मा जयंती महोत्सवात ट्रॉफी व रोख रक्कम ,पारितोषीक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आ...

समाजमान्य आदर्श शिक्षक दाम्पत्य ; जिवनपट आढावा..

Image
            संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग काळे यांची ७५ वर्षपूर्ती,त्यांची पत्नी सौ.चंद्रकला काळे यांची ७० वर्षपूर्ती तसेच लग्नाचा ५० वा वाढदिवस अशा या तिहेरी अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता लक्ष्मी मंगल कार्यालय घारगाव येथे करण्याचे आयोजिले आहे.तरी या निमित्त ह.भ. प.परशुराम महाराज अनर्थे (कोपरगाव) यांचे कीर्तन रुपी सेवा संपन्न होणार आहे.अशी माहिती त्यांचे सुपुत्र सोमनाथ काळे व साईनाथ काळे यांनी दिली आहे.     अभिष्टचिंतन सोहळ्याचे निमित्ताने त्यांचे जिवणपटाचा घेतलेला आढावा. ..               उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दिसायला दोन्ही सारखेच दिसतात पण दोघांत फरक एवढाच आहे कि ,उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो या उक्तीप्रमाणे अनेकांच्या जीवनात आपल्या अनुभवाच्या जोरावर यशस्वी होण्यासाठी ज्ञानाची शिदोरी देऊन अनेक कुटुंबे ऊभी केली गेली.अगदी कोणताही गाजावाजा न करता असे आदर्श शिक्षक जोडपे म्हणजे पांडुरंग काळे गुरुजी व स...

म्हैसगांव येथील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

Image
    शेख युनुस राहुरी तालुका स्कूल असोसिएशन च्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत म्हैंसगांव येथील आरोही स्कूल च्या विद्यार्थ्यांनी  चांगले प्रदर्शन‌ करून घवघवीत यश संपादन करत बाजी मारली .                                     ‌  राहुरी तालुका स्कूल असोसिएशन ने ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल गुहा येथे घेतलेल्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी अतिशय नियोजन पूर्वक पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन राहुरी तालुका गटशिक्षणाधिकारी श्री. गोरक्षनाथ नजन यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. दोन दिवशीय आयोजित करण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धेत आरोही स्कूल च्या मुलांनी कबड्डी साठी मोठ्या गटात तालुक्यात प्रथम क्रमांक तर मुलींनी दुसऱ्या क्रमांकावर विजय मिळवून बाजी मारली.खो खो लहान गटात मुलांनी दुसरा क्रमांक तसेच रेले रेस मध्ये लहान व मोठा गट दोन्हीही दुसरा क्रमांक मिळवला तसेच वैयक्तिक स्पर्धेत मुलांनी वेगवेगळ्या खेळात पाच पदक आणि पाच ट्रॉफी मिळवल्या.                ...

कारच्या धडकेत पादचारी महीला ठार

Image
  संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खालची माहुली परीसरातील हॉटेल मिरच्यामॅटिक समोर कारच्या धडकेत पादचारी महीला ठार झाली आहे तर ही घटना बुधवार दिनांक १८ जानेवारी रोजी दुपारी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, माहुली येथील रहिवासी हिराबाई बाळशीराम दिघे या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून माहुलीकडून १९ मैल परीसराकडे पायी चालल्या होत्या. त्याच दरम्यान पूणेकडून संगमनेरच्या दिशेने चाललेली कार क्रमांक एम एच १२ एम आर ४३२० ही आली असता.तीने दिघे यांना जोरदार धडक दिली त्यात दिघे या जागीच ठार झाल्या. दरम्यान घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पंढरीनाथ पुजारी, नारायण ढोकरे,घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू लांघे आदिंनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. व पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

तीन आरोग्य केंद्रांना शासनाचा कायाकल्प पुरस्कार.

Image
  ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्र कायाकल्प पुरस्कारात जिल्ह्यात प्रथम. विठा ,म्हाळादेवी आरोग्य केंद्र प्रोत्साहनपर कायाकल्प पुरस्कार. ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक. अकोले / सतीश फापाळे          अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा, विठा , म्हाळादेवी या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी नागरिकांना स्वच्छ, संसर्ग नियंत्रण तसेच आरोग्यदायी वातावरनात आरोग्य सुविधा देत,आपल्या कामात सातत्य ठेवून सन २०२१_२२ या कालखंडात केलेल्या उत्तम कामगिरीतून ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राला जिल्ह्यात शासनाच्या कायाकल्प पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाचे नामांकन झाले .तर विठा,म्हाळादेवी आरोग्य केंद्राला प्रोत्साहनपर शासनाच्या कायाकल्प पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे.       शासनाकडून निर्धारित केलेली मानक पूर्ण करून ब्राम्हणवाडा,विठा ,म्हाळादेवी आरोग्य केंद्राने स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रित करत या कामात सातत्य ठेवून नागरीकांना स्वच्छ आरोग्यदायी वातावरनात उत्तम प्रतीच्या सुविधा दिल्या आहेत. येथील आरोग्य आधीकारी तसेच कर्मचारी ,आशा सेविका यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर...

पंचवीस वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Image
  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी गावच्या हद्दीतील वायळवाडी परीसरातील युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली आहे . याबाबतची अधिक माहिती अशी की, रविंद्र दिलिप दिघे ( वय २५ )हा कुरकुंडी गावा अंतर्गत असणार्या वायळवाडी परीसरात राहत होता. शनिवारी  सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान रविंद्र याने राहत्या घरात नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.तर त्याची आई सायंकाळच्या सुमारास घराकडे आली असता तीच्या निदर्शनास ही गोष्ट आली. तर तीने एकच हंबरडा फोडला .माहीती समजताच कुरकुंडी गावच्या सरपंच शाहीन चौगुले, सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौगुले,यांसह आजुबाजुच्या नागरीकांनीही धाव घेतली व मृतदेह खाली घेतला.परंतू तोपर्यंत रविंद्र यांची प्राणज्योत मालवली होती.     तर त्यास उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. पुनाजी सावळे राम वारे यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टारगटांचा त्रास; पोलिस निरीक्षकांची शाळेस भेट

Image
  पोलीस निरीक्षक डांगे यांची बारागांव नांदुर जिल्हा परिषद शाळेस सदिच्छा भेट                              ‌   शेख युनुस /अहमदन गर     राहुरी तालुका पोलीस निरीक्षक घनश्याम डांगे यांनी बारागांव नांदुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व येथे होणारा टारगेटांचा त्रास या आदी गोष्टी लक्षात घेता बारागांव नांदुर येथे जावून शाळेला सदिच्छा भेट दिली.            जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारागांव नांदुर येथे अनेक दिवसापासून टारगेट मुलांचा त्रास असल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्याच प्रमाणे शाळेची बिकट दुरवस्था झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन समितीने स्वखर्चातून,दुरुस्ती, रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेतले असून‌ प्रगतीपथावर आहे.दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी राहुरीचे पोलीस निरीक्षक डांगे घनश्याम यांनी शाळेला भेट देत पाहणी केली.शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.पोलीस निरीक्षक घनश्याम डांगे म्हणाले कि,जिल्हा प...

गावाची सुरक्षा आता ग्रामस्थांच्या हातात

Image
  ग्रामसुरक्षा यंत्रणा ही  सर्वोत्तम आपत्कालीन संपर्क यंत्रणा ठरली आहे. त्यामुळे मोबाईल वापरकर्त्या प्रत्येकाने तिचा प्रभावी वापर करावा. परिणामी, गावाची सुरक्षितता ग्रामस्थांच्या हातात राहणार असल्याचे प्रतिपादन ग्रामसुरक्षा यंत्रणेंचे वरीष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे यांनी केले. तर यावेळी पोलीस नाईक किशोर लाड, बाबुराव गोडे उपस्थित होते. ग्रामसुरक्षा यंत्रणेची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव ग्रामपंचायत सभागृहात शुक्रवार (दि. १३)  रोजी बैठक पार पडली. यावेळी सरपंच अर्चना आहेर  अध्यक्षस्थानी होत्या. तर लोकरे यांनी मोबाईल फोनवरुन ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरासंदर्भात सविस्तर माहिती देऊन या यंत्रणेच्या वापराचे प्रात्यक्षिकही करुन दाखवले. या यंत्रणेमुळे  गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवळून दुर्घटना टाळता आल्या आहे, त्यामुळे प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी या यंत्रणेचा वापर केल्यास गुन्हेगारीला आळा बसून आपत्कालीन परिस्थितीत गाव पातळीवर वेळीच प्रभावी मदत यंत्रणा उभी राहण्याची अपेक्षा लोकरे यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी सामा...

सोमी गाईचे पूजन व डोहाळे जेवण समारंभ संपन्न

Image
  म्हणतात ना हौशैला मोल नसतं माणूस आपल्या हौसेपोटी अनेक सुख सोहळे करत असतो.परंतू मुक्या जनावरांचे डोहाळे जेवण कधी ऐकलंय का ? नाही ना? असाच एक सोहळा पार पडला आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा गावा अंतर्गत असणार्या जोठेवाडी या ठिकाणी. सं गमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा गावा अंतर्गत असणार्या जोठेवाडी येथील पशूपालक शेतकऱ्यांने आपल्या गोठ्यात असणार्या व स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केलेल्या गोमातेचे पूजन व तीच्या डोहाळे जेवणाच्या समारंभाचे आयोजन गुरवार दिनांक १२ जानेवारी रोजी केले होते.याप्रसंगी ह. भ. प. श्रीकृष्णकृपांकीत गुरुवर्य डॉ. श्री .विकासानंदजी महाराज मिसाळ यांची किर्तन सेवाही संपन्न झाली.    शेतकरी हा आपली शेती करत असताना आपल्या गोठ्यात असणार्या गायी, म्हशी,बैल यांना पोटच्या पोराप्रमाने जिव लावत असतो. अनेक शेतकरी हे त्यांच्या गोठ्यात असणार्या या मुक्या जनावरांवर प्रेम करत असताना  त्यांचे वाढदिवस, किंवा ते मृत झाले तर त्यांच्या प्रती असणार्या कृतज्ञतेने त्यांचे दशक्रिया विधी करत असल्याचे दिसून येत आहे.परंतू आंबीखालसा येथील शेतकरी बाळासाहेब, ...

घारगावात १४ जानेवारीला भव्य ढकली हॉलीबॉल स्पर्धा

Image
  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती... घारगाव : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख (उद्धव ठाकरे गट) जनार्दन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली १४ व १५ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कै. म्हातारबा लक्ष्मण पा. आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती संभाजी क्रिकेट क्लब घारगाव यांच्या वतीने भव्य ढकली हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .          या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस (रु.२१,०००) मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके, द्वितीय बक्षीस (रु.१५,०००) लोकनियुक्त सरपंच अर्चनाताई आहेर (उपसरपंच व सर्व सदस्य), तृतीय बक्षीस (रु.११,०००) शिवसैनिक वसंत नाथाशेठ वाणी, चतुर्थ बक्षीस (रु.७,०००) युवानेते अशोक पांडुरंग गाडेकर, पाचवे बक्षीस (रु.३,०००) विमा सल्लागार अजित सुभाष आहेर, सहावे बक्षीस (रु.३,०००)आदर्श व्यापारी नवनाथ दत्तात्रय खोंड, सातवे बक्षीस (रु.३,०००) प्रगतशील शेतकरी महेंद्र दिनकर आहेर व राजेंद्र सुदाम धात्रक, आठवे बक्षीस (रु.३,०००) सामाजिक कार्यकर्ते महेश नानासाहे...

वृत्तनिवेदिका अश्विनी पुरी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Image
  कु.अश्विनी पुरी न्यूज इंडिया 27 च्या वृत्तनिवेदिका यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त.                                ‌    शेख युनुस / अहमदनगर  अहमदनगर जिल्ह्यातील व संगमनेर तालुक्यातील साकूर येथील पंचक्रोशीत असलेल्या बिरेवाडी येथील धाडसी,रिडर,आपल्या लेखणीचा बुलंद आवाज व न्युज इंडिया 27 या  वृत्तवाहिनी  च्या वृतनिवेदिका कुमारी अश्विनी किसन पुरी यांना उत्कृष्ट वृत्तनिवेदिका म्हणून सन्मान चिन्ह देऊन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.                      ‌    कुमारी अश्विनी पुरी ह्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील बिरेवाडी गावातील शेतकरी कुटुंबातील किसनराव पुरी यांच्या जेष्ठ कन्या  आहे.अश्विनी पुरी ह्या उत्तर महाराष्ट्रातील न्यूज इंडिया 27 या वृत्तवाहिनी च्या उत्तम, सुरेख ,सुमधुर वृत्तनिवेदिका म्हणून कार्यरत आहेत. अश्विनी पुरी ह्या उच्चशिक्षित असून त्यांनी समाजातील, अन्याय,दिन दुबळ्यांसा...

खेड्यांचा समृद्ध विकास आल्यास देश सशक्त बनेल .. प्राचार्य डॉ. सचिन घोलप

Image
  भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांच्या समृद्ध व शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वाचे आहे, यांच्या श्रमदानामुळे खेड्यांचा विकास करता येतो  खेडे विकासाच्या दृष्टीने समृद्ध झाल्यास देश सशक्त बनेल असे प्रतिपादन  प्राचार्य डॉ. सचिन घोलप यांनी केले. ते रमेश फिरोदिया कला ,विज्ञान व  वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या उपक्रमांतर्गत आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व रमेश फिरोदिया कला ,विज्ञान  व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर मंगळवार दि.3 जानेवारी 2023 ते सोमवार दि. 9 जानेवारी 2023 या कालावधीत हिवरगाव पठार ता.संगमनेर येथे संपन्न होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कु. सुप्रियाताई मिसाळ, उपसरपंच दत्तात्रय  वनवे, यादव नागरे, माधवराव डोळझाके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहे...