कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोरबन येथे १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी रोजी त्रिदिनात्मक गणपती, ग्रामदैवत मारुती व साईनाथ महाराज या देवांच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे .
दरम्यान बुधवारी सकाळी घारगांव बसस्थानकापासून मुर्तींच्या मिरवणूकीला प्रारंभ झाला असून असंख्य महीलांनी डोक्यावर कलश घेऊन या मिरवणूक सोहळ्यात सहभागी झाल्या तर लेझीमच्या डावाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले तर महीलांनीही फुगडीचा आनंद घेतला. व ही मिरवणूक हळूहळू बोरबन गावच्या दिशेने मार्गस्थ झाली.
तर आज सायंकाळी ७ वा ह.भ.प. दत्तात्रय महाराज भोर यांची किर्तन सेवा संपन्न होणार आहे. तद्नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी प्रायश्चित्त विधी,मंडल देवता स्थापना,जलाधिवास, मुर्तीस्थापन विधी,हवन, मुर्तीशय्याधिवास आदि कार्यक्रम पार पडणार असून सायंकाळी ७ वाजता ह.भ.प.केशव महाराज हगवणे ( देहु) यांचे हरी किर्तन होणार आहे.व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पार पडणार आहे तर सकाळी ९ वाजता ह.भ.प. उमेश महाराज दशरथे ( आळंदी) यांचे काल्याचे किर्तन नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तर या सर्व कार्यक्रमांसाठी भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बोरबन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment