कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खालची माहुली परीसरातील हॉटेल मिरच्यामॅटिक समोर कारच्या धडकेत पादचारी महीला ठार झाली आहे तर ही घटना बुधवार दिनांक १८ जानेवारी रोजी दुपारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माहुली येथील रहिवासी हिराबाई बाळशीराम दिघे या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून माहुलीकडून १९ मैल परीसराकडे पायी चालल्या होत्या. त्याच दरम्यान पूणेकडून संगमनेरच्या दिशेने चाललेली कार क्रमांक एम एच १२ एम आर ४३२० ही आली असता.तीने दिघे यांना जोरदार धडक दिली त्यात दिघे या जागीच ठार झाल्या.
दरम्यान घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पंढरीनाथ पुजारी, नारायण ढोकरे,घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू लांघे आदिंनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. व पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
Comments
Post a Comment