कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

वृत्तनिवेदिका अश्विनी पुरी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

 


कु.अश्विनी पुरी न्यूज इंडिया 27 च्या वृत्तनिवेदिका यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त.    

                           ‌ 

 शेख युनुस / अहमदनगर 


अहमदनगर जिल्ह्यातील व संगमनेर तालुक्यातील साकूर येथील पंचक्रोशीत असलेल्या बिरेवाडी येथील धाडसी,रिडर,आपल्या लेखणीचा बुलंद आवाज व न्युज इंडिया 27 या  वृत्तवाहिनी  च्या वृतनिवेदिका कुमारी अश्विनी किसन पुरी यांना उत्कृष्ट वृत्तनिवेदिका म्हणून सन्मान चिन्ह देऊन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.      

               ‌    कुमारी अश्विनी पुरी ह्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील बिरेवाडी गावातील शेतकरी कुटुंबातील किसनराव पुरी यांच्या जेष्ठ कन्या  आहे.अश्विनी पुरी ह्या उत्तर महाराष्ट्रातील न्यूज इंडिया 27 या वृत्तवाहिनी च्या उत्तम, सुरेख ,सुमधुर वृत्तनिवेदिका म्हणून कार्यरत आहेत. अश्विनी पुरी ह्या उच्चशिक्षित असून त्यांनी समाजातील, अन्याय,दिन दुबळ्यांसाठी हक्कासाठी,समाजातील एकोपा,लोकाभिमुख ,लहान थोरांशी आदराची वागणूक देत समाजसेवेच्या माध्यमातून अश्विनी ह्यांनी आपला पत्रकार क्षेत्रात ठसा उमटवला आहे.       ‌            राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर तसेच कालीका देवी मंदिर संस्थान चे विश्वस्त अध्यक्ष केशवराव अण्णा पाटिल पाटील यांच्या हस्ते वृत्तनिवेदिका  कु.अश्विनी पुरी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.           

या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या कुमारी अश्विनी पुरी यांचे अहमदनगर, नाशिक, संगमनेर ,राहुरी आदी तालुक्यातील पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन करून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत  आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु