कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी गावच्या हद्दीतील वायळवाडी परीसरातील युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रविंद्र दिलिप दिघे ( वय २५ )हा कुरकुंडी गावा अंतर्गत असणार्या वायळवाडी परीसरात राहत होता. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान रविंद्र याने राहत्या घरात नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.तर त्याची आई सायंकाळच्या सुमारास घराकडे आली असता तीच्या निदर्शनास ही गोष्ट आली. तर तीने एकच हंबरडा फोडला .माहीती समजताच कुरकुंडी गावच्या सरपंच शाहीन चौगुले, सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौगुले,यांसह आजुबाजुच्या नागरीकांनीही धाव घेतली व मृतदेह खाली घेतला.परंतू तोपर्यंत रविंद्र यांची प्राणज्योत मालवली होती.
तर त्यास उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. पुनाजी सावळे राम वारे यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment