कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

साकुरची तरुणी महाराष्ट्रात पहिली
संगमनेर / तालुक्यातील साकूर येथील कु. मनिषा सिताई बबन भालके हिने गेल्या डिसेंबर महिन्यात लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पार पडलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवला होता तर या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मनिषा हीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डिसेंबर महिन्यात लोहार समाज - दशा आणि दिशा या विषयावर राज्य स्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या विजेत्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये संगमनेर तालुक्यातील साकूर येथील कु मनिषा सिताई बबन भालके हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सौ माधूरी गणेश थोरात यांनी द्वितीय व नगर जिल्ह्यातील राहुरी येथील सौ.अनुराधा ज्ञानेश्वर इघे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.
विजेत्यांना दि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी भोसरी येथील गोविंद गार्डन कार्यालयात होणाऱ्या विश्वकर्मा जयंती महोत्सवात ट्रॉफी व रोख रक्कम ,पारितोषीक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तर मनिषा हीचे या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
.
Comments
Post a Comment