कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पत्रकारास जीवे मारण्याची धमकी.

 


अहमदनगर राहुरी-ताहाराबाद रस्त्यावरील घटना ; पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न


शेख युनुस / राहूरी


दै. सार्वमंथन वृत्तपत्राचे कार्यालयीन कामकाज पार पाडून घराच्या दिशेने जात असताना राहुरी-ताहाराबाद रस्त्यावर दोन अज्ञात व्यक्तीने पत्रकाराच्या गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली असल्याची घटना  २४ जानेवारी रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तीविरोधात राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.


सागर माधव दोंदे (वय ३१, रा. म्हैसगाव, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दोंदे कार्यालयीन कामकाज आवरुन स्वतःच्या दुचाकीवरून (एमएच १७, बी क्यु २९१९) राहुरीहून म्हैसगावकडे जात असताना सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास ताहाराबाद रस्त्यावरील सटुआई मंदीराजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकी आडवी लावून दोंदे याना म्हणाले की, कारे तु माजला का. तुझी लायकी काय, तु तुझ्या लायकीत राहा, असे म्हणुन त्यांची गचांडी पकडुन धक्काबुक्की केली आणि आमच्या नादाला लागु नकोस, नाहीतर तुला माझ्या हातात असलेल्या चाकुने भोकसुन जिवे ठार मारीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यांनतर ते दोघेही दुचाकीवरून पसार झाले.सागर दोंदे यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात कलम 341, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांची घटनास्थळी धाव

सागर दोंदे यांनी सहकारी मित्रांना संपर्क करून घडलेला प्रकार कथन केला. त्याच दरम्यान एका सहकाऱ्यानी राहुरी पोलिसांना संपर्क करून घटनास्थळी धाव घेण्यास सांगितले. काही तासांतच मित्र परिवार व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांना धीर दिला.

पत्रकारांचा आवाज दाबला जातोय

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमाकडे पाहिले जाते. मात्र सद्यस्थितीला कोणतेही माध्यमं सुरक्षित राहिलेले नाहीत. अनेक पत्रकार बांधव सामाजिक, राजकीय विषयांना वाचा फोडतात. मात्र त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पत्रकारिता करत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असल्याने वृत्तपत्रात काम करायचे कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु