कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

शेख युनुस
राहुरी तालुका स्कूल असोसिएशन च्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत म्हैंसगांव येथील आरोही स्कूल च्या विद्यार्थ्यांनी चांगले प्रदर्शन करून घवघवीत यश संपादन करत बाजी मारली.
राहुरी तालुका स्कूल असोसिएशन ने ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल गुहा येथे घेतलेल्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी अतिशय नियोजन पूर्वक पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन राहुरी तालुका गटशिक्षणाधिकारी श्री. गोरक्षनाथ नजन यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. दोन दिवशीय आयोजित करण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धेत आरोही स्कूल च्या मुलांनी कबड्डी साठी मोठ्या गटात तालुक्यात प्रथम क्रमांक तर मुलींनी दुसऱ्या क्रमांकावर विजय मिळवून बाजी मारली.खो खो लहान गटात मुलांनी दुसरा क्रमांक तसेच रेले रेस मध्ये लहान व मोठा गट दोन्हीही दुसरा क्रमांक मिळवला तसेच वैयक्तिक स्पर्धेत मुलांनी वेगवेगळ्या खेळात पाच पदक आणि पाच ट्रॉफी मिळवल्या.
यावेळी उपस्थित शिव फाऊंडेशन संचलित आरोही स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री. दतात्रय काकडे सर,व प्राचार्या काकडे मॅडम यांनी मार्गदर्शक शिक्षक व खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री बुळे सर,जाधव सर,पानसरे मॅडम, पवार मॅडम, आदि शिक्षकांनी क्रिडा स्पर्धेसाठी मुलांना बहुमोल मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment