कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

ग्रामसुरक्षा यंत्रणा ही सर्वोत्तम आपत्कालीन संपर्क यंत्रणा ठरली आहे. त्यामुळे मोबाईल वापरकर्त्या प्रत्येकाने तिचा प्रभावी वापर करावा. परिणामी, गावाची सुरक्षितता ग्रामस्थांच्या हातात राहणार असल्याचे प्रतिपादन ग्रामसुरक्षा यंत्रणेंचे वरीष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे यांनी केले. तर यावेळी पोलीस नाईक किशोर लाड, बाबुराव गोडे उपस्थित होते.
ग्रामसुरक्षा यंत्रणेची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव ग्रामपंचायत सभागृहात शुक्रवार (दि. १३) रोजी बैठक पार पडली. यावेळी सरपंच अर्चना आहेर अध्यक्षस्थानी होत्या. तर लोकरे यांनी मोबाईल फोनवरुन ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरासंदर्भात सविस्तर माहिती देऊन या यंत्रणेच्या वापराचे प्रात्यक्षिकही करुन दाखवले.
या यंत्रणेमुळे गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवळून दुर्घटना टाळता आल्या आहे, त्यामुळे प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी या यंत्रणेचा वापर केल्यास गुन्हेगारीला आळा बसून आपत्कालीन परिस्थितीत गाव पातळीवर वेळीच प्रभावी मदत यंत्रणा उभी राहण्याची अपेक्षा लोकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर, ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष पिसाळ, विजय धात्रक काशिनाथ आहेर,शरद रांधवण, दैवत आहेर, सुनिल आहेर,हनुमंत गाडेकर, बाळासाहेब गाडेकर,अमजद शेख, सुनिल जाधव यांच्यासह आशासेविका, अंगणवाडी सेविका,शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामसुरक्षा यंत्रणेची माहिती देणाऱ्या छापील पुस्तिकाचे ग्रामस्थांना मोफत वितरण करण्यात आले.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
व्यापक सामाजिक हित लक्षात घेऊन ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आलेली असल्याने तिच्या प्रभावी वापरातून गाव परिसराची सुरक्षितता वाढणार आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत प्रमुख्याने पोलीस व महसूल यंत्रणेलाही सुरक्षेच्या उपाय योजनासाठी लोकांशी संपर्क ठेवण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
- अर्चना आहेर,
सरपंच, घारगांव
Comments
Post a Comment