कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

काव्य वाचन स्पर्धेत मांडवेचा विशाल धुळगंड प्रथम

  



( पठार वार्ता / नवनाथ गाडेकर) निनाद फाऊंडेशन व बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या भव्य ऑनलाइन काव्य स्पर्धेत मांडवेच्या विशाल गिताराम धुळगंड याने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

     विशाल धुळगंड हा मांडवे येथील रहिवासी असून तो साकुर येथील रमेश फिरोदिया महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. नुकतीच २०२२ ते २०२३ या वर्षांकरीता निनाद फाऊंडेशन व बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय बेलापूर यांच्या वतीने खुल्या काव्य वाचन ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तर त्याचा निकाल नुकताच  जाहीर झाला आहे. यात प्रथम क्रमांकाचे छत्रपती शिवाजराजे पारितोषीक विशाल गिताराम धुळगंड,याला तर द्वितीय क्रमांकाचे महात्मा फुले पारितोषिक ऐश्वर्या पोपट शिंगाडे, हिला तर तृतीय क्रमांकाचे सावित्रीबाई फुले पारितोषिक राखी बन्सीलाल सोंडेकर  हिला मिळाले आहे.

 विजेत्यांना शनिवार दिनांक २८/०१/२०२३ रोजी कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय बेलापूर या ठिकाणी मान्यवर व प्रमुख अतिथींच्या हस्ते रोख रक्कम,पारितोषीक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अशी मागणी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ गुंफा कोकाटे यांनी दिली आहे. विशाल याने प्रथम क्रमांक मिळवून गावचे नाव रोशन केल्याबद्दल  त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु