कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

पोलीस निरीक्षक डांगे यांची बारागांव नांदुर जिल्हा परिषद शाळेस सदिच्छा भेट
शेख युनुस /अहमदनगर
राहुरी तालुका पोलीस निरीक्षक घनश्याम डांगे यांनी बारागांव नांदुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व येथे होणारा टारगेटांचा त्रास या आदी गोष्टी लक्षात घेता बारागांव नांदुर येथे जावून शाळेला सदिच्छा भेट दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारागांव नांदुर येथे अनेक दिवसापासून टारगेट मुलांचा त्रास असल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्याच प्रमाणे शाळेची बिकट दुरवस्था झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन समितीने स्वखर्चातून,दुरुस्ती, रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेतले असून प्रगतीपथावर आहे.दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी राहुरीचे पोलीस निरीक्षक डांगे घनश्याम यांनी शाळेला भेट देत पाहणी केली.शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.पोलीस निरीक्षक घनश्याम डांगे म्हणाले कि,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात जो टारगेट मुलांचा बंदोबस्त करण्यात येईल तसेच शिक्षक कर्मचारी यांना टारगेट मुलांचा त्रास होणार नाही यासंदर्भात बिट हवालदार यांना सुचना देऊन दररोज शाळेच्या आवारात लक्ष ठेवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून तात्काळ कार्यवाही करा अशा सुचना दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व कर्मचारी व सदस्य उपस्थित होते.यावेळी इम्रान नबी देशमुख यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने पोलीस निरीक्षक घनश्याम डांगे यांचा सत्कार केला.पोलीस निरीक्षक डांगे यांच्या भेटीचे कौतुक करत म्हणाले राहुरी पोलीस स्टेशनचे पहिले पोलीस निरीक्षक आहे कि,ज्यांनी शाळेला सदिच्छा भेट देत शाळेच्या समस्या जाणून घेवून शाळा व्यवस्थापन समिती तसेच शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना धीर दिला.
याप्रसंगी रियाज सय्यद,समीर पठाण,अय्याज देशमुख,अमजद पठाण,चंद्रकांत जाधव,तोहीद पिरजादे,अशोक माळी आदी मान्यवर सदस्य आणि उर्दू व मराठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद ,विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment