कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

जेष्ठ निवृत्त शिक्षकांचा स्नेहमेळावा संपन्न

 


श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आणे या संस्थेतील‌ सेवानिवृत्त शिक्षकांचा २० जानेवारी रोजी एकत्र येत स्नेह मेळावा संपन्न झाला. तर यातील अनेक शिक्षक वयोवृद्ध झालेले दिसत होते. सर्वच शिक्षक सेवा निवृत्ती नंतर अनेक दिवसांनी एकत्र आल्याने शिक्षकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता

अनेक ठिकाणी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाते असेच आयोजन संगमनेर तालुक्यातील घारगांव येथेही काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. तर त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य विश्वनाथ आहेर सर हे होते. तर त्याच वेळी त्यांना संकल्पना सुचली की, सेवानिवृत्त शिक्षकांचाही स्नेह मेळावा घेणे गरजेचे आहे. त्यांनी त्यानुसार शिक्षक पाराजी कडाळे, कमाल शेख यांच्याशी संपर्क साधून  सेवानिवृत्त शिक्षकांचा व्हॉट्स ॲप गृप बनवला व स्नेहमेळावा घेण्याचे ठरले .



 त्या नंतर झालेल्या स्नेह मेळाव्यासाठी तब्बल १४० माजी शिक्षकांनी हजेरी लावली होती.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ आहेर हे होते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पेंढार या शाळेतील विद्यार्थीनींनी इशस्तवन व स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. व दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शिक्षक व शिक्षीकेंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अध्यक्षीय भाषणात बोलताना विश्वनाथ आहेर यांनी रंगदास स्वामी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय भाऊसाहेब बोरा ( भाऊ ) यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा इतीहास मांडला.शांत स्वभाव व दुरदृष्टी यामुळे संस्थेचा विकास होऊन शाखा वाढवता आल्या त्यामुळे दलितमित्र, शिक्षणमहर्षी भाऊंसारखा व्यक्ती होणे नाही असे यावेळी विश्वनाथ आहेर सर म्हणाले.

तर हा मेळावा यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ आहेर, जयसिंग जाधव,पाराजी कडाळे, रमाकांत खडके, कमाल शेख, श्रीपाद घाटपांडे, गुलाब गागरे, भास्कर गलांडे, बाळासाहेब वेठेकर,पोपट दाते, प्रविण डुंबरे, ज्ञानदेव गलांडे, भिमसेन लोखंडे, चंद्रकांत मुळे, लक्ष्मण फलके आदि शिक्षकांनी अथक परीवर्तन घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातपुते यांनी तर आभार नवले यांनी मानले स्नेह भोजनाने हा कार्यक्रम संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु