कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

म्हणतात ना हौशैला मोल नसतं माणूस आपल्या हौसेपोटी अनेक सुख सोहळे करत असतो.परंतू मुक्या जनावरांचे डोहाळे जेवण कधी ऐकलंय का ? नाही ना? असाच एक सोहळा पार पडला आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा गावा अंतर्गत असणार्या जोठेवाडी या ठिकाणी.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा गावा अंतर्गत असणार्या जोठेवाडी येथील पशूपालक शेतकऱ्यांने आपल्या गोठ्यात असणार्या व स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केलेल्या गोमातेचे पूजन व तीच्या डोहाळे जेवणाच्या समारंभाचे आयोजन गुरवार दिनांक १२ जानेवारी रोजी केले होते.याप्रसंगी ह. भ. प. श्रीकृष्णकृपांकीत गुरुवर्य डॉ. श्री .विकासानंदजी महाराज मिसाळ यांची किर्तन सेवाही संपन्न झाली.
शेतकरी हा आपली शेती करत असताना आपल्या गोठ्यात असणार्या गायी, म्हशी,बैल यांना पोटच्या पोराप्रमाने जिव लावत असतो. अनेक शेतकरी हे त्यांच्या गोठ्यात असणार्या या मुक्या जनावरांवर प्रेम करत असताना त्यांचे वाढदिवस, किंवा ते मृत झाले तर त्यांच्या प्रती असणार्या कृतज्ञतेने त्यांचे दशक्रिया विधी करत असल्याचे दिसून येत आहे.परंतू आंबीखालसा येथील शेतकरी बाळासाहेब, नामदेव,व ज्ञानदेव गाडेकर या तीघा भावांनी आपल्या गोठ्यात असलेल्या खिल्लारी गायीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने परीसरातून त्यांची चर्चा होत असून कौतूकही केले जात आहे.
बाळासाहेब, नामदेव व ज्ञानदेव हे तीघे भाऊ आंबीखालसा येथील जोठेवाडी येथे राहत आहे.व शेतीला जोडधंदा म्हणून कुटुंबातूनच मागील पिढयांमधून परंपरागत चालत आलेला आलेला दुग्ध व्यवसाय करत आहेत.गाडेकर हे तीन पिढ्यांपासून खिल्लारी गायींचा सांभाळ करत आहेत.तर घरच्याच गाईला सोमवती अमावस्येला कालवड झाली असल्याने गाडेकर यांनी आनंदाने तीचे नाव सोमी ठेवले.तर ही सोमी आता गाभण असून तीला नववा महीला चालू असल्याने व या गायींच्या पिढ्यांनी कुटुंबाची भरभराट केल्याने या कुटुंबाने तीचा डोहाळे जेवणाचा सोहळा आयोजित केला.तर या गाईची सजावट करून असंख्य महीलांनी डोक्यावर वेगवेगळे वाण घेऊन सोमीची पुजा केली.तर महीलाही ओटीभरणाचे सामान,फळे, पशुखाद्य देऊन ओटीभरन करून पुजा केली. तर यावेळी पशुपालक बाळासाहेब गाडेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे,आंबीखालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले आदींनी याविषयीं माहीती देऊन पशुपालक गाडेकर बंधूंचे कौतुक केले.
पठार भागात प्रथमतःच हा आगळावेगळा सोहळा झाल्याने पशुवैद्यक डॉक्टर सुभाष गाडेकर , संपत इथापे, दत्ता गाडेकर , अप्पासाहेब दिघे, नूतन भुजबळ आदि पशुवैदयकांनी गाडेकर यांना गाई आणि वासरूची प्रतीमा भेट देत सन्मान केला.तर यावेळी पठार भागातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्राबरोबर, पशुपालक,शेतकरी व ग्रामस्थ,महीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment