कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

समाजमान्य आदर्श शिक्षक दाम्पत्य ; जिवनपट आढावा..

 


         संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग काळे यांची ७५ वर्षपूर्ती,त्यांची पत्नी सौ.चंद्रकला काळे यांची ७० वर्षपूर्ती तसेच लग्नाचा ५० वा वाढदिवस अशा या तिहेरी अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता लक्ष्मी मंगल कार्यालय घारगाव येथे करण्याचे आयोजिले आहे.तरी या निमित्त ह.भ. प.परशुराम महाराज अनर्थे (कोपरगाव) यांचे कीर्तन रुपी सेवा संपन्न होणार आहे.अशी माहिती त्यांचे सुपुत्र सोमनाथ काळे व साईनाथ काळे यांनी दिली आहे.

    अभिष्टचिंतन सोहळ्याचे निमित्ताने त्यांचे जिवणपटाचा घेतलेला आढावा...

             उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दिसायला दोन्ही सारखेच दिसतात पण दोघांत फरक एवढाच आहे कि ,उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो या उक्तीप्रमाणे अनेकांच्या जीवनात आपल्या अनुभवाच्या जोरावर यशस्वी होण्यासाठी ज्ञानाची शिदोरी देऊन अनेक कुटुंबे ऊभी केली गेली.अगदी कोणताही गाजावाजा न करता असे आदर्श शिक्षक जोडपे म्हणजे पांडुरंग काळे गुरुजी व सौ.चंद्रकला काळे बाई यांचा अभिष्ठचिंतन सोहळा होत आहे.


    काळे गुरुजी यांचा जन्म १ मार्च १९४७ रोजी पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील हंगा या निसर्गरम्य गांवात झाला आहे. तो गुलामगिरीचे जू झुगारून स्वातंत्र्यांचा सुर्य घेऊनच झाला.तीन बहिणी व तीन भाऊ ह्या भावंडांमध्ये काळे गुरुजी सर्वात लहान बंधू असल्यामुळे घरात सर्वांचे लाडके होते. त्यांचे प्राथमिक शिक्षणाचे धडे मुळ गावीच गिरवले गेले.थोरले बंधू चिमाजी काळे (निवृत्त मुख्याध्यापक) गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली पांरपांरीक व्यवसायाला तिलांजली देत, ज्युनियर पीटीसीचे शिक्षण सातारा येथे केले. त्याकाळी ज्युनियर पीटीसी ही डिग्री म्हणजे शिक्षक होण्याची पात्रता होती. ज्युनियर पीटीसी पुर्ण करुन ज्ञानदानाचे पवित्र कार्य मदडगांव नगर येथे सन १९७० मध्ये सुरू केले.३ फेब्रुवारी १९७२ रोजी गुरुजींचा शुभविवाह अहमदनगर येथील स्वतंत्रसैनिक वडील व चुलते नगराध्यक्ष अशा अत्यंत सुशिक्षित असणा-या कुटुंबांतील कन्या चंद्रकला यांच्याशी थाटामाटात झाला. ह्या जोडीने सुरुवातीचे काही वर्षे पारनेर तालुक्यातील कासारे नंतर शहाजापूर येथे सन १९८५ पर्यंत येथे सेवा केली.

  


नंतर १९८५ साली त्यांची आंतर-तालुका स्तरावरची बदली संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे झाली.   आंबी खालसा येथे येथे स्थायिक झालेले शिक्षक काळे दाम्पत्य आजतागायात आंबीमध्येच स्थिरावले. दोघांचीही उर्वरित नोकरी पठार भागातील माहुली, खंदरमाळ ह्या ठिकाणी झाली. गुरुजी २००५ ह्या वर्षी मुख्याध्यापकपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळल्यानंतर येठेवाडी, खंदरमाळ येथून निवृत्त झाले.काळे बाई सुद्धा क्रमाने २०१० साली खंदारमाळ ह्या ठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून कारकीर्द पार पडून सेवा-निवृत्त झाल्या आहेत. मन हे आपले सागराच्या दोन किना-यावरील फुला प्रमाणे असते .अगदी तसेच काळे गुरुजींनी शाळा, समाज आणि गावची नाळ घट्ट जोडुन ठेवली ती आजपर्यंत !!!

हे विश्वची माझे घर|ऐसी मती जयाची स्थिर |

किंबहुना चराचर |आपण जाहला ||

शाळा आणि चिमुकले विध्यार्थी हेच दैवत व सर्व समाजा प्रती प्रेमभावना हीच ईश्वरसेवा मानणारे हे शिक्षक जोडपे म्हणजे एक अनमोल असा आदर्श ठेवा त्यांनी निर्माण केला. नोकरी ज्या ज्या गावात केली त्या गावांनी तर यांना डोक्यावर घेतलेच तसेच आजुबाजुच्या गावातही लौकिक कमावला आहे.आयुष्याच्या प्रवासात जिद्द, संघर्ष, आणि आत्मविश्वास हे तिन मित्र सदैव सोबत ठेवले तर आपल्याला कोणीही पराजित करू शकणार नाही याची पुरेपूर जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे काळे गुरुजी होय.विद्यार्थी, समाजाप्रती काम करत असताना शिक्षक बांधवांसाठी ही संघटनेच्या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले. शिक्षकांच्या सुख दुःखात सदैव सहभागी होणारे काळे गुरुजी एक अवलियाच. गुरुजीना वाहने चालवण्याचा खूपच शौक आहे. ९०च्या दशकात ते राजदूत मोटारसायकल वर प्रवास करायचे. गुरुजी त्या काळी गटशिक्षण अधिकारी साहेब समवेत शाळा तपासणीसाठी फिरायचे. प्राथमिक शिक्षक संघटनेच्या कामाला पण स्वखर्चाने पूर्ण तालुका पिंजून काढायचे. काळाच्या ओघाप्रमाणे त्यांनी महिंद्रा जीप विकत घेतली. वयाच्या ५५ व्या वर्षी जीप अगदी जिद्दीने चालवायला शिकले आणि निवुर्त्तीच्या काही वर्षे ते शाळेचा प्रवास जीपने केला. काळे गुरुजी हे महाराष्ट्रातील पहिले  जीप चालवणारे गुरुजी असावेत. अजूनही गुरुजी त्याची जीप चालवण्याचा आवडतीछंद जोपासत आहे. काळें गुरुजी यांच्या जिवनात पडद्यामागील खरा आधारस्तंभ म्हणजे त्यांच्या अर्धांगिनी चंद्रकला रामदास वाघमारे (काळे मॅडम) होत. काळे मॅडम.स्व:ता शिक्षिका असुनही सदैव एक आदर्श माता व एक आदर्श गृहिणी म्हणून श्री काळे गुरुजी यांच्या जिवनात सर्व सुखदुःखात खंबिरपणे साथ दिली. बाईनी गुरुजींना जीवनरूपी रथाचे दुसरे चाक बनून संसार नेटाने पुढे नेला. तसेच संसारातील सून, आई, नणंद, भावजय, लेक, बहीण अशा सगळ्या भूमिका पद्धतशीरपणे पार पाडल्या आहेत. घरी आलेला प्रत्येक पाहुण्यांचे आदरतिथ्य तसेच पाहुणचार करण्यात यत्किंचितही कसूर ठेवली नाही.शुद्ध बीजापोटी ! फळे रसाळ गोमटी !!  तुकाराम महाराज म्हणतात की,बीज( बियाणे )जर शुद्ध असेल,कसदार,संस्कारी असेल तर त्या झाडाला फळेही गोमटी म्हणजे चांगलीच येणार.आणि ती फळे रसाळ आणि गोडच असणार.जर बीज किडके असेल कमकुवत असेल तर त्या बिजापासुन बनलेले झाड आणि त्याला येणारी फळे ही सुद्धा कमकुवतच निपजतात.या बिजाप्रमाणेच जर माणुस संस्कारी असेल.निर्व्यसनी,पुण्यवान,शिलवान,चारिञ्यवान शुद्ध असेल तर त्याच्या पोटी जन्मणारी संततीही गोमटी आणि शिलवान,चारिञ्यवान,संस्कारी निपजेल. या अभंगाप्रमाणे दोघांची चारही अपत्यांवर चांगले संस्कार घडले व ते आज सुजाण व कर्तव्यशील नागरिक म्ह्नणून वेगवेगळ्या क्षेत्रात आपापली भूमिका चोखपणे निभावत आहेत.  


त्यांच्या दोन मुली सुजाता (प्राथमिक शिक्षिका) व  संगीता (व्यावसायिक) तसेच दोन मुले  सोमनाथ (बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये सॉफ्टवेअर टेस्ट मॅनेजर) व  साईनाथ (कॅनडा मध्ये हॉटेल व्यवसाय) कार्यरत आहेत. काळे दापंत्याचे मोठे जावई श्री. सुनील पंडित हे हेसुद्धा शिक्षक असून ते अहमदनगर शहरातील प्रगत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून काम सांभाळत आहेत. त्यांचे शैक्षणिक चळवळीतील योगदान पाहून सन २०१८ मध्ये त्यांना माननीय राष्ट्र्पतीच्या हस्ते दिल्ली येथे 'राष्ट्रीय आदर्श शिक्षक' या  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतीच त्यांचू महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या शिक्षक संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे.  ते अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत. 

गुरुजींचे दुसरे जावई श्री. विलास खंडागळे हे फोटोग्राफी व्यावसायिक असून ते संगमनेर तालुक्यातील उत्कृष्ठ फोटोग्राफर म्हणून नावलौकिक आहे. गुरुजींच्या मोठा मुलगा सोमनाथ ह्याने पुण्यात संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून तो एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मॅनेजर आहे. काळे दाम्पत्याचे शेंडेफळ असलेले चिरंजीव साईनाथ ह्याने पुण्यामध्ये हॉटेल मॅनॅजमेण्ट ची पदवी घेतली नंतर त्याने लंडन मध्ये एमबीए सुद्धा केले. सध्या तो कॅनडा मधील टोरांटो या शहरात स्वतःचे 'डोसा ट्विस्ट' नावाचे हॉटेल चालवत आहे.  


स्वतःची चारही मुले उच्च विभुषित व सर्व गुणसंपन्न करण्याचे एक माता-पिता म्हणून असणारे कर्तव्य या दोन्ही माऊलीने बजावत आपले अनेक विद्यार्थी योग्य ज्ञानाची शिदोरी देऊन उच्च पदस्थ केले. त्यांचे अनेक विध्यार्थी आजही त्यांना आवर्जून घरी भेटायला जातात. भेटताक्षणीच ते आपल्या गुरुवर्या समोर आदराने नतमस्तक होतात व कृतज्ञता व्यक्त करतात. 


कर्तव्य आणि कर्म यांचा योग्य समन्वय साधून सौ.काळे गुरुजी व मॅडम दोघांनीही आदर्श असा संसाराचा वटवृक्ष तयार केला. काळे परिवार आपल्या कार्यकालातील प्रत्येक गावात सामाजिक तसेच अध्यात्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर आजही असतात.मधल्या काळात दोघांच्याही आरोग्यविषयी काही तक्रारी झाल्या परंतु पूर्व-पुण्याईने त्या खडतर प्रसंगातून बाहेर आले. 

आज २२/१/२०२३ रोजी या भुतलावर श्री व सौ काळे दाम्पत्य हे एकमेकांबरोबर संसारुपी सागरात आपली नाव किनारी लावण्या साठी सहकार्य प्रयत्न करताना आज ५०वर्ष पुर्ण होत आहेत. गुरुजींनाही वयाची अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे तसे  काळे बाई सुद्धा वयाची सत्तरी गाठली आहे. या पुढील काळ त्यांना अतिशय आनंदमयी जावो अर्थात तो जाणारच कारण मुलें खुप सुसंस्कृत आहेत. तरीही या उभयतांना भविष्य काळासाठी आरोग्यमय जीवनासाठी खुप खुप मन:पूर्वक शुभेच्छा !!!

शब्दांकन - अरुण आवारी.

सरपंच रांधे ता.पारनेर तथा-राज्यनेते मुख्याध्यापक संघ


Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु