कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

घारगावात १४ जानेवारीला भव्य ढकली हॉलीबॉल स्पर्धा

 


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती...


घारगाव : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख (उद्धव ठाकरे गट) जनार्दन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली १४ व १५ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कै. म्हातारबा लक्ष्मण पा. आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती संभाजी क्रिकेट क्लब घारगाव यांच्या वतीने भव्य ढकली हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


         या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस (रु.२१,०००) मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके, द्वितीय बक्षीस (रु.१५,०००) लोकनियुक्त सरपंच अर्चनाताई आहेर (उपसरपंच व सर्व सदस्य), तृतीय बक्षीस (रु.११,०००) शिवसैनिक वसंत नाथाशेठ वाणी, चतुर्थ बक्षीस (रु.७,०००) युवानेते अशोक पांडुरंग गाडेकर, पाचवे बक्षीस (रु.३,०००) विमा सल्लागार अजित सुभाष आहेर, सहावे बक्षीस (रु.३,०००)आदर्श व्यापारी नवनाथ दत्तात्रय खोंड, सातवे बक्षीस (रु.३,०००) प्रगतशील शेतकरी महेंद्र दिनकर आहेर व राजेंद्र सुदाम धात्रक, आठवे बक्षीस (रु.३,०००) सामाजिक कार्यकर्ते महेश नानासाहेब शेळके यांनी बक्षिसे दिली आहेत.


         ट्रॉफी सौजन्य व भोजन व्यवस्था उद्योजक सुदीप बजरंग वाकळे (साईनाथ उद्योग समूह),मंडप व लाईटचे  सौजन्य उद्योजक राहुल गडगे,योगेश गडगे,सुनील गाडेकर,बॉल,मैदान सजावट सौजन्य उद्योजक कैलास शेळके व प्रविण दिड्डी, नेट सौजन्य राष्ट्रवादीचे मुन्नाभाई शेख व सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख, बेस्ट शुटर व बेस्ट नेटमनसाठी  (रु.१५००) आंबी खालसाचे गटप्रमुख दत्तात्रय दिलीप गाडेकर, नांदूर खंदरमाळ चे माजी सरपंच भाऊसाहेब तान्हाजी भागवत यांनी बक्षिसे दिली आहेत. या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अमोल खोंड यांनी केले आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु