Posts

Showing posts from August, 2022

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

शेतकऱ्यांनो केवायसी करा अन्यथा अनुदान होणार बंद

Image
  पीएम किसानच्या 27805 शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे तहसिलदार अमोल निकम यांच्या कडून आवाहन ..           प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकयाना ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. अद्याप 27 हजार ८०५ शेतकर्यांनी केवायसी केलेली नाही. या शेतकर्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत केवायसी करून घ्यावी, अन्यथा बारावा हप्ता बँकेत जमा होणार नाही, अशी माहिती तहसिलदार यांनी दिली आहे.        अल्पभूधारक  शेतकर्यांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. प्रत्येक पात्र शेतकयाला वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये निधी दिला जात आहे. प्रत्येक चार महिन्याला २ हजार रुपयांचा हप्ता शेतकयाच्या बँक खात्यात जमा केला जात आहे.         काही लाभार्थी शेतकयांचे बँक खात्यावरील असलेले नाव तसेच आधार कार्डवर असलेले नाव यामध्ये फरक आढळून येतो. त्यामुळे या योजनेचा हप्ता पात्र शेतकयांच्या बँक खात्यावर जमा होताना काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी शेतक...

बिबटयाच्या हल्ल्यात कालवड ठार

Image
  संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील नांदुर गावा अंतर्गत असणार्या बावपठार येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाल्याची घटना मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी पहाटे घडली आहे.            याबाबत अधिक माहिती अशी की नितीन मुरलीधर करंजेकर हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत बावपठार येथे राहत आहेत.व शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही करत आहेत. त्यांच्याकडे तीन गायी असून मंगळवारी पहाटे घरासमोर बांधलेल्या दिड वर्षाच्या कालवडी वर बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यात कालवड जागीच ठार झाली आहे. त्यामुळे करंजेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर घटनेची माहिती मिळताच वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रेश्मा जाधव यांसह आदिंनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला        दरम्यान बावपठार परीसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असून बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तर शेतकऱ्यांनाही शेतात कामधंदा करण्यासाठी भिती वाटत आहे त्यामुळे वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी माग...

विषबाधेने तडफडून मृत्यू

Image
  सगमनेर/ तालुक्यातील साकुर जवळील बिरेवाडी येथील शेतकरी लालू नारायण ढेंबरे यांच्या एक दुभती गाय व ३ गाभण शेळ्यांचा गवतातून विषबाधा झाल्यामुळे तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना  रविवार दि २८ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, साकुर जवळील बिरेवाडी येथील शेंडगे वस्तीवर (दुधाणे मळा) येथील लालू नारायण ढेंबरे हे शेतकरी राहत आहे. त्यांनी जवळपास १० शेळ्या व २ गायी पाळल्या आहे.  घराजवळच गोठा असून त्यात त्या बांधून ठेवल्या होत्या. तसेच नेहमीप्रमाणे लालू ढेंबरे हे शेतकरी शेळ्या व गायांना गोठ्यात त्यांच्याच शेतातील गवत टाकत होते. परंतु रविवार दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गवत खाल्याने शेळ्या व गायी हंबरडा फोडू लागले होते. मात्र बिबट्या आला की काय यामुळे हंबरडा फोडत असल्याचे ढेंबरे यांच्या घरच्यांना वाटले . परंतु काही तासांतच ३ शेळ्या व एक गायीचा तडफडून मृत्यू झाला. दरम्यान सोमवार (दि २९ ) रोजी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जोंधळे यांना घटनेची माहिती समजताच घटनास्...

तुम्हालाही रात्री खोकला येतो का:,तर मग ह्या विषयी माहिती

Image
  .  काही लोकांना खोकला-सर्दी, घसा खवखवणे अशा समस्या येतात आणि ते लवकर बरे होत नाही. कफ सोबतचा खोकला शक्यतो जास्त होतो आणि योग्य उपचाराने तो लवकर बरा होतो. खोकल्यानंतर घश्यात वेदना, जळजळ होते. काही लोकांना दिवसापेक्षा रात्री जास्त खोकला  येतो. रात्री झोपताना खोकल्यामुळे फक्त तुमचीच नाही तर घरात, झोपलेल्यांचीही झोप खराब होते. अशा काही टिप्स किंवा घरगुती उपाय आहेत, ज्याचा अवलंब केल्याने रात्री येणाऱया खोकल्याला मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो. मध आणि आले हे दोन्ही घटक केवळ खोकलाच नाही तर, शरीराच्या इतर समस्याही सहज दूर करू शकतात. जर तुम्हाला रात्री खोकल्याचा त्रास होत असेल तर आल्याचा रस काढून त्यात थोडे मध मिसळा. तयार केलेली पेस्ट खा आणि सरळ झोपा. यानंतर, चुकूनही पाणी पिऊ नका आणि सुमारे एक आठवडा हा उपाय करा. खोकल्यापासून आराम मिळाल्यावरही दोन ते तीन दिवस असे करा. आले आणि गूळ गूळ हा असा नैसर्गिक घटक आहे, जो आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. ही एक नैसर्गिक साखर आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. गूळ आल्याबरोबर खाल्ल्यास होणारा खोकला काही दिवसात दूर होत...

शिवसेना -संभाजी ब्रिगेड युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी- देवेंद्र फडणवीस

Image
  एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेना पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करत असतानाच राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झालं आहे. राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात युती झाली आहे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी तसेच संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तर शिवसेनेसोबत का युती केली, याचं कारण संभाजी ब्रिगेडनं स्पष्ट केलं आहे. तर यावरूनच विरोधकांकडून शिवसेनेवर चौफेर टीका केली जात आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपा नेते निलेश राणेंनी संभाजी ब्रिगेडशी युती केल्यावरून उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे की ते सैराट मित्र मंडळ सोबत सुद्धा युती करतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरेंनी फु...

करुणा मुंडे यांची संगमनेरमध्ये ३० लाख रुपयांची फसवणुक

Image
  एका कंपनीत पैसे गुंतवल्यानंतर दरमहा ४५ हजार ते ७० हजार रुपये मिळवा, असे अमिष दाखवून संगमनेरच्या तिघा जणांनी करुणा धनंजय मुंडे यांना ३० लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी श्रीमती मुंडे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. भारत संभाजी भोसले (रा. डाबे वस्ती कोंची, पोस्ट निमगावजाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग (दोघे ही राहणार घुलेवाडी, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनी करुणा धनंजय मुंडे यांचा विश्‍वास संपादन करीत त्यांना एका कंपनी बाबत माहिती दिली.आमच्या या कंपनीत तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला खूप फायदा होईल, तुम्ही जर मला ३० लाख रुपये दिले तर मी तुम्हाला कमीत कमी ४५ हजार ते ७० हजार रुपये महिन्याला नफा देईल तसेच यापेक्षा जास्त फायदा झाला  तर त्याप्रमाणात तुम्हाला नफा देत जावू या पद्धतीने वरील तिघांनी करुणा मुंडे यांना पटवून दिले. त्याप्रमाणे श्रीमती मुंडे यांनी वरील तिघांना १० दिवसात कॅश व चेक स्वरुपात असे एकूण ३० लाख रुपये दिले. मात्र त्यानंतरही वरील तिघांनी कंपनीबाबत काही एक म...

शिर्डी गुन्हेगारी मुक्त करण्याच्या सुचना

Image
  शिर्डी शहर व परिसरातील विविध समस्यांवर महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले की, शिर्डी शहर व परिसर शंभरटक्के गुन्हेगारीमुक्त झाला पाहिजे. सोनसाखळी चोरी, गुंडगिरी, अवैध व्यवसाय, गांर्दूल्याचा उच्छाद, भाविकांची लूट, अवैध धुम्रपान, चरस-गांजा-गुटखा विक्री यासारख्या अनेक गुन्ह्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी पोलीस विभागाने तात्काळ कार्यवाही करावी. झिरो टॉलरन्स धोरण राबवून पोलिसांनी गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करावे. गुन्हेगारी विषयावर पुन्हा बैठक घेण्याची वेळ येऊ देऊ नये. अशा सूचनाही महसूलमंत्र्यांनी पोलीस विभागाला दिल्या. शिर्डीतील अंतर्गत रस्त्यांचा चारही बाजूंनी विस्तार झाला आहे. शहर झोपडीपट्टी मुक्त करण्यासाठी प्रशासन पावले उचलत आहे. शिर्डीच्या वैभवात भर पडत आहे. त्यामुळे हे वैभव कोठेही कमी होऊ नये यासाठी व्यावसायिक दुकानदार, हॉटेल चालक यांनी अतिक्रमण करू नये. शहरातील अतिक्रमणांवर शिर्डी नगरपरिषदेने त्वरित कार्यवाही करण्यासाठी पावले उचलावीत. अशा सूचना महसूलमंत्र्यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिल्या

साई मंदिरात फूल-हार बंदी कायम

Image
  शिर्डीच्या साईबाबा मंदिरात असलेल हार फुलांची बंदी सध्या तरी कायम असून हार फुलांवरील निर्बंधाबाबत सर्वंकष धोरण ठरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर याबाबत शासनस्तरावरून योग्य तो निर्णय घेतला जाईल. अशा शब्दात राज्याचे महसूल, दूग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी ग्रामस्थांना आश्वासीत केले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याशी चर्चा करून भाविकांच्या भावनांचा आणि श्रद्धेचा विचार करून या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महसूलमंत्र्यानी  २८ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व शिर्डी ग्रामस्थांची चर्चा केली. हार फुले बंदीवरील भूमिका जाणून घेतल्या. या बैठकीला श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे आदी अधिकारी तसेच संस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ यावे...

नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा-पो.नि.पाटील

Image
  अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी प्रशासनाकडून सुरु झाली असून उत्सवाची रुपरेषा ठरविण्यासाठी संगमनेर तालुक्यातील घारगांव पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी घारगांव पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटील,गणेश मंडळे व त्यांच्या प्रतीनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. घारगांवसह पंचक्रोशीतील गावांमध्ये गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असतो.मात्र मागील दोन वर्ष कोरोनाचे जागतीक संकट उभे राहील्याने उत्सव अतिशय साध्या पद्धतीने पार पडले होते.परंतु यावर्षी शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरे केले जाणार आहेत त्यामुळे गणेश उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासन आतापासूनच सज्ज झाले असून त्यानिमित्ताने आजची बैठक पार पडली. यावर्षी गणेश मंडळांनी  ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिली तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, गणेश मंडळांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवावेत.तसेच कोणाकडूनही सक्तीने वर्गणीची वसूली करू नये....

अरे बापरे...पठार भागात चोरटे सुसाटच

Image
  अरे बापरे. . पठार भागात चोरटे सुसाटच अशी म्हणण्याची वेळ संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नागरीकांवर आता आली आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे.दिवसेंदिवस पठार भागात चोऱ्यांचे सत्र सुरुच असून घरफोडी,दुचाकी चोरी, व्यावसायिकांचे दुकाने फोडून चोरी, शेतकऱ्यांच्या केबल, मोटारीची चोरी,फळपिकांची चोरी,मंदिरांमधील दानपेटी चोरी, आणि हेच कमी की काय म्हणून शासनाच्या संपत्तीचीही चोरी करायला चोरटे मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे या चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांना लगाम लावावा अशीच मागणी पठार भागातील नागरीकांमधून जोर धरू लागली आहे.       नुकतेच साकुर व जांबुत या दोन गावांना जोडणाऱ्या केटिवेअरचे ढापे चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, साकुर परिसरात मुळा नदीवर साकुर व जांबूत या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा केटियर आहे . पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याचे लोखंडी ढापे काढून ठेवले जातात . चालू वर्षी देखील या बंधाऱ्याचे वापरायोग्य २२५ ढापे काढून जांबूत हद्दीत ठेवण्यात आले होते. ५ मे ते १९ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपूर्वीच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी यातील १ ...

ग्रामीण जीवनोन्नती अभियानद्वारे कर्ज वाटप मेळावा संपन्न.

Image
डोळासणे येथे महिला बचत गटांना कर्ज वाटप मेळावा संपन्न . सतीश फाफाळे     संगमनेर / तालुक्यातील पठार भागातील डोळासणे गावातील काळ भैरव मदिर परिसरात शनिवार  दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी  महिला स्वयंम सहायत्ता समूहाचे बचत गटांना कर्ज वाटप मेळावा घेत महिला बचत गटांना नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी कर्ज वाटप करण्यात आले आहे.         महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती  व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा डोळासणे, व तालुका अभियान कक्ष पंचायत समिती संगमनेरच्या वतीने भव्य कर्ज वाटप मेळावा  पार पडला आहे. यावेळी कर्ज वितरण गट विकास अधिकारी अनिल नागणे  विस्तार अधिकारी डोके ,तालुका व्यवस्थापक मार्केटिंग, कृती समितीचे महेश पारधी ,प्रशांत पानसरे,भाऊसाहेब शिंदे,सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे चंदन मंगलम,गीतांजली काटकर शाखा व्यवस्थापक सागर गोडसे, नवले मॅडम ,रवींद्र खलाटे आदी उपस्थित होते.       यावेळी बँकेने मागील वर्षी दिलेले पहीले कर्ज नियमित भरलेल्या २२ गटांना  एकूण ३८ लाख ४० हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.तसेच प्...

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

Image
            संगमनेर / तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या खंडेरायवाडी (पिंपळगाव देपा ) येथील शालेय विद्यार्थीनी ९ जून रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान,  शाळेत जाते म्हणून घरी सांगून गेली, ती अद्याप (१८ ऑगस्ट) पर्यंत घरी परतली नसून तीन महिन्यांपासून ती बेपत्ता आहे. अशा आशयाची फिर्याद मुलीच्या पालकांनी पोलिसांत दाखल केली आहे. वैष्णवी सोपान तळेकर असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव असून याबाबत तिचे वडील सोपान दत्तू तळेकर (वय-४२, खंडेरायवाडी ) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चंदनापुरी येथील चंद्नेश्वर माध्यमिक विद्यालयात शिकत असलेली विद्यार्थीनी  ९ जून रोजी शाळेत जाते म्हणून   घरून  गेली. मात्र, तेव्हापासून ती घरी परतली नाही. यादरम्यान तीच्या कुटूंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. अखेर पालकांनी घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. सदर मुलीचे वर्णन वय १५ वर्षे ३ महिने, रंग गोरा,उंची-५.४ इंच,चेहरा-गोल,डोळे-काळे,नाक-सरळ,केस-लांब,काळे तांबूस,...

मांडवे बुद्रुकच्या सरपंचपदी आशा कुटे तर उपसरपंच पदी शब्बीर सय्यद..

Image
  सं गमनेर / तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील ग्रामपंचायत वरती ग्राम विकास मंडळाने बाजी मारली असून मांडवे बुद्रुक गावचे दानशूर व्यक्तिमत्व बाबासाहेब कुटे , आणि एडवोकेट अमित धुळगंड, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम विकास मंडळाचे सदस्य निवडून आले आहे तर 17 ऑगस्टला सरपंच पदाची निवडणूक पार पडली, गावचे सरपंच पदी आशा बाबासाहेब कुटे, तर उपसरपंच पदी शब्बीर पीर महम्मद सय्यद, यांची बिनविरोध निवड करण्यात आली.      सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य यांची डीजेच्या तालावर जंगी मिरवणूक करण्यात आली होती, तर ग्रामविकास मंडळाला मोलाची साथ , संतोष कुटे, भगत बुडण भाई शेख, मेजर उत्तम बर्डे, मेजर देवराम उमाप, दत्तात्रेय अष्टेकर, बाबा शेख, दत्तू बर्डे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सुनील बर्डे, पोपट वाडेकर, अलीम शेख, शकर बिडकर, भीमराज बाचकर, भागा बाचकर ,अतुल बर्डे, सुनील पवार,बापू धुळगंड, पवन राजे डोमाळे,बबन डोलनर , इनुस हवालदार , सुभाष बिडकर ,यांची मोलाची साथ मिळाली. सदस्यपदी  मनीषा संतोष बिडकर, भास्कर श्रीरंग बर्डे, शिला संदीप आयनर , सना सलीम शेख, जितेंद्र देवराम ऊमाप, यांची निवड झाली आहे. सरपंच ...

प्रवरेत वाहून गेलेल्या पिक अप सह एक मृतदेह सापडला

Image
  संगमनेर/  तालुक्यात सोमवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी  जोर्वे-पिंपरणे रस्त्यावरील प्रवरा नदीच्या पुलावरुन एक मालवाहतूक करणारे वाहन वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या भयानक दुर्घटनेत वाहनचालकासह अन्य दोन प्रवाशीही वाहून गेले होते .  याबाबतची माहिती मंगळवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी  संगमनेर तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांनी तत्काळ आपल्या फौजफाट्यासह जोर्वे-पिंपरणे रस्त्यावरील पुलाकडे धाव घेत पाहणी केली. सदरील पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत दिसून आले होते तर  निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सदरील पुलावरुन पाणी वाहत होते. त्यामुळे अशा प्रकारची दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची  चौकशी केली होती त्यानंतर अशी माहिती समजली की, ओझर बु. येथील संदीप नागरे यांच्या घराचे काम सुरु आहे . त्यांच्याकडे सोमवार दिनांक 15 ऑगस्ट सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खिडक्यांच्या कांचा घेवून (एम.एच.15/एफ.व्ही.8943) हे पिकअप वाहन आले होते. त्यांच्या कांचा खाली करुन वाहनचालक कनोली मार्गे पिंप...

मोठी बातमी!ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर !

Image
  पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्‌भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट २०२२ ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे २७, २८ व ...

अथक प्रयत्नानंतर हल्लेखोर जेरबंद

Image
संगमनेर / तालुक्यातील साकुर परिसरात गेल्या १० ते १५ दिवसांपासून एका माकडाने उच्छाद मांडला होता. तसेच बालके व ग्रामस्थांवर थेट हल्ले केले व  चावा घेत जखमी केले होते. त्यामुळ परिसरात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली होती. तसेच बुधवारी सायंकाळी साकुर येथील दोन मुलींवर माकडाने हल्ला करत चावा घेत गंभीर जखमी केले होते. जवळपास २७ व्यक्तींना माकडाने चावा घेत जखमी केल्याची माहिती आहे. मात्र माकडाच्या या दहशतीने साकुरकर हैराण झाले होते. त्यामुळे लवकरात लवकर या माकडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती.  दरम्यान शुक्रवारी संगमनेर वनविभाग -३ चे वनक्षेत्रपाल सुभाष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तास्करवाडी रोड वर वनविभागाचे कर्मचारी हनुमंत घूगे, सुहास उपासणे, संतोष पारधी, हरिश्चंद्र जोजार, बाळासाहेब फटांगरे, रामदास वर्पे यांनी रेस्क्यु ऑपरेशन केले. यासाठी स्थानिक सागर डोके, रामा केदार, राजू झिटे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी माकडाला पकडण्यासाठी तास्करवाडी रोडलगत पिंजरा लावण्यात आला होता. यावेळी माकडाला पकडण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले होते. माकड पिंजऱ्यात अडकले होते पण त्याने...

घारगावच्या उपसरपंच पदी जया गाडेकर

Image
  संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील घारगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी जया राजेंद्र गाडेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतच्या सभागृहात शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी प्रशासनाचे नियमांचे पालन करून पार पडली आहे. अध्यादेशिये अधिकारी सरपंच अर्चना आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली तर सचिव म्हणून ग्रामसेवक गिरीश धराडे यांनी काम पाहिले उपसरपंच पदासाठी जया गाडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता त्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे   शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर व सरपंच अर्चना आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने मला आज उपसरपंच पदाची जी संधी मिळाली. त्यामुळे मी भारावून गेली आहे. गावच्या विकासाची या संधीचे नक्कीच सोने करण्याचा अतोनात प्रयत्न करत राहील.  गावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच एकोपाने अद्यापपर्यंत काम करत आलो आहे भविष्यातही सरपंच आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली  विकासाचा रथ पुढे चालू ठेवू . सौ.जया गाडेकर ( नवनिर्वाचित उपसरपंच घार...

पोलिसांनी अशीही जपली सामाजिक बांधिलकी

Image
  संगमनेर / तालुक्यातील नाशिक - पुणे महामार्गावर  तालुक्यातील आळेखिंड ते रायतेवाडी फाटा अंतरात अनेक मोठे मोठे खड्डे पडले आहेत.  या खड्ड्यांमध्ये अनेक वाहने ये जा करताना आदळत असतात व अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांमध्ये आदळुन जखमी झाले आहेत तर वाहणांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख व पोलीस नाईक किशोर लाड हे शुक्रवारी दिनांक १२ ऑगस्ट रोजी बोटा येथे एका विद्यालयात हर घर तिरंगा या कार्यक्रमासाठी जात होते. त्याच दरम्यान , बोटा परीसरात  महामार्गावर मोठा खड्डा पडल्याने एक दुचाकी खड्ड्यात आदळली. दुचाकीस्वार दुचाकीवरून पडल्याने जखमी झाला.  त्यास पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत या खड्ड्यात खडी व माती टाकत तात्पुरत्या स्वरूपात खड्डा बुजविला आहे. सदर जीवघेणा खड्डा बुजविण्यात आल्यामुळे दुचाकी चालकांना तात्पुरता का होईना  दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या दोनही पोलिस कर्मचाऱ्यांचे उपस्थित वाहन चालकांनी कौतूक केले आहे. दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर...

साकुरमधील हल्लेखोर जेरबंद होणार का ?

Image
  साहेब तो हल्लेखोर जेरबंद होणार का ? अशी म्हणण्याची वेळ भयभीत ग्रामस्थांवर आली आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे संगमनेर तालुक्यातील  साकुर परीसरातील बिरेवाडी येथे गेल्या काही दिवसांपुर्वी माकडाने अनेकांवर हल्ले करत जखमी केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यात  आता साकुर गावठाण परीसरात या  माकडाने उच्छाद मांडला असून दररोजच बालके व ग्रामस्थांवर  हल्ले करत चावा घेत असल्याने  नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे.  बुधवार दिनांक १० ऑगस्ट रोजी साकुर येथील एका मुलीवर माकडाने हल्ला करत चावा घेत गंभीर जखमी केल्याची घटना  सायंकाळी घडली आहे. चावा घेत मुलीच्या उजव्या डोळ्या जवळ गंभीर दुखापत केली आहे. नगमा वसिम मोमीन असे या जखमी मुलीच नाव आहे. तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. माकडाच्या या दहशतीने साकुरकर हैराण झाले आहे. तसेच माकड थेट विरभद्र विद्यालयातील शाळेत घुसले होते. त्यावेळी एकच गोंधळ उडाला होता. विद्यार्थी घाबरले होते. वन विभागाने लवकरात लवकर या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ वारंवार करत आहे . वनविभागही माकड पकडण्याचा प्रयत्न करत आहे परंत...