कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील नांदुर गावा अंतर्गत असणार्या बावपठार येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाल्याची घटना मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी पहाटे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की नितीन मुरलीधर करंजेकर हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत बावपठार येथे राहत आहेत.व शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही करत आहेत. त्यांच्याकडे तीन गायी असून मंगळवारी पहाटे घरासमोर बांधलेल्या दिड वर्षाच्या कालवडी वर बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यात कालवड जागीच ठार झाली आहे. त्यामुळे करंजेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर घटनेची माहिती मिळताच वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रेश्मा जाधव यांसह आदिंनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला
दरम्यान बावपठार परीसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असून बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तर शेतकऱ्यांनाही शेतात कामधंदा करण्यासाठी भिती वाटत आहे त्यामुळे वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी एकनाथ करंजेकर, नितीन करंजेकर, अशोक करंजेकर, राजेंद्र करंजेकर,लहानभाऊ करंजेकर, विकास करंजेकर,सारंगधर भागवत, रामनाथ भागवत,किशोर,भागवत,ज्ञानदेव भागवत, नानासाहेब भागवत,सबाजी भागवत,मारूती भागवत यांसह आदि शेतकर्यांनी केली आहे
Comments
Post a Comment