कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

डोळासणे येथे महिला बचत गटांना कर्ज वाटप मेळावा संपन्न.
सतीश फाफाळे
संगमनेर / तालुक्यातील पठार भागातील डोळासणे गावातील काळ भैरव मदिर परिसरात शनिवार दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी महिला स्वयंम सहायत्ता समूहाचे बचत गटांना कर्ज वाटप मेळावा घेत महिला बचत गटांना नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी कर्ज वाटप करण्यात आले आहे.
यावेळी बँकेने मागील वर्षी दिलेले पहीले कर्ज नियमित भरलेल्या २२ गटांना एकूण ३८ लाख ४० हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत सबसिडी ३५% टक्के अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनचा व्यवसाय करणाऱ्या एक लाभार्थ्याला २० लाख रुपये असे एकूण ५८ लाख ४० हजार रुपये रक्कमेचे कर्ज वाटप करण्यात आले आहे..
आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेदच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन केले त्यानुसार त्यांनी बचत गट स्थापन करून बचत करण्यास सुरवात केली.त्यातून त्यांना बचतीची सवय लागली.तसेच बँक खात्याशी संलग्न झाल्याने महिला आर्थिक साक्षर बनल्या आहेत.या योजनेतून महिलांना कमी व्याजदरात बँक कर्ज उपलब्ध करून दिले.त्यांनी त्याची नियमित परतफेड केल्याने आता त्यांना नव्याने नवीन व्यवसायासाठी कर्ज वाटप केले आहे.
महेश पारधी
( प्रभाग समन्वयक जी. प. गट साकुर)
या योजनेतून महिला साक्षर बनल्या आहेत.त्यांना नवीन व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन केले.आणि त्यांना पूर्वी महिला बचत गटांना इतर सोर्स मधून कर्ज उपलब्ध होत होते.परंतु त्याचा व्याजदर परवडेबल नसल्याने व्यवसायात कमी नफा शिल्लक राहत असल्याने नवीन कर्ज महिला बचत गट नाकारत होते.आता कमी व्याजदरात त्यांना नवीन व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होत असल्याने महिला देखील यात उत्स्पूर्त सहभाग घेत आहे.यातून नक्कीच महिला बचत गटांची प्रगती होईल.आणि इतर महिला बचत नवीन व्यवसायासाठी गटांना देखील प्रेरणा मिळणार आहे.
अनिल नागणे
(गट विकास आधिकारी)
Comments
Post a Comment