कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

तुम्हालाही रात्री खोकला येतो का:,तर मग ह्या विषयी माहिती

 

.



 काही लोकांना खोकला-सर्दी, घसा खवखवणे अशा समस्या येतात आणि ते लवकर बरे होत नाही. कफ सोबतचा खोकला शक्यतो जास्त होतो आणि योग्य उपचाराने तो लवकर बरा होतो. खोकल्यानंतर घश्यात वेदना, जळजळ होते. काही लोकांना दिवसापेक्षा रात्री जास्त खोकला  येतो. रात्री झोपताना खोकल्यामुळे फक्त तुमचीच नाही तर घरात, झोपलेल्यांचीही झोप खराब होते. अशा काही टिप्स किंवा घरगुती उपाय आहेत, ज्याचा अवलंब केल्याने रात्री येणाऱया खोकल्याला मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो.


मध आणि आले


हे दोन्ही घटक केवळ खोकलाच नाही तर, शरीराच्या इतर समस्याही सहज दूर करू शकतात. जर तुम्हाला रात्री खोकल्याचा त्रास होत असेल तर आल्याचा रस काढून त्यात थोडे मध मिसळा. तयार केलेली पेस्ट खा आणि सरळ झोपा. यानंतर, चुकूनही पाणी पिऊ नका आणि सुमारे एक आठवडा हा उपाय करा. खोकल्यापासून आराम मिळाल्यावरही दोन ते तीन दिवस असे करा.


आले आणि गूळ


गूळ हा असा नैसर्गिक घटक आहे, जो आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. ही एक नैसर्गिक साखर आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. गूळ आल्याबरोबर खाल्ल्यास होणारा खोकला काही दिवसात दूर होतो. एका भांड्यात थोडा गूळ गरम करून त्यात आल्याचा रस घाला. ही पेस्ट खाऊन झोपा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.


काळी मिरी आणि मीठ


काहीवेळा खोकला काही चुकीच्या खाण्याने किंवा ऍलर्जीमुळे सुरू होतो, परंतु झोपेचा त्रास दुसऱ्या दिवशीचा दिनक्रम बिघडू शकतो. यापासून आराम मिळण्यासाठी एका भांड्यात ठेचलेली काळी मिरी घेऊन त्यात थोडे मीठ टाका. त्यात थोडे मध घालून सेवन करा. या तीन गोष्टी मिळून खोकल्यापासून लवकर सुटका मिळेल.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु