कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

अरे बापरे...पठार भागात चोरटे सुसाटच

 

अरे बापरे.. पठार भागात चोरटे सुसाटच अशी म्हणण्याची वेळ संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नागरीकांवर आता आली आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे.दिवसेंदिवस पठार भागात चोऱ्यांचे सत्र सुरुच असून घरफोडी,दुचाकी चोरी, व्यावसायिकांचे दुकाने फोडून चोरी, शेतकऱ्यांच्या केबल, मोटारीची चोरी,फळपिकांची चोरी,मंदिरांमधील दानपेटी चोरी, आणि हेच कमी की काय म्हणून शासनाच्या संपत्तीचीही चोरी करायला चोरटे मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे या चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांना लगाम लावावा अशीच मागणी पठार भागातील नागरीकांमधून जोर धरू लागली आहे.

      नुकतेच साकुर व जांबुत या दोन गावांना जोडणाऱ्या केटिवेअरचे ढापे चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, साकुर परिसरात मुळा नदीवर साकुर व जांबूत या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा केटियर आहे . पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याचे लोखंडी ढापे काढून ठेवले जातात . चालू वर्षी देखील या बंधाऱ्याचे वापरायोग्य २२५ ढापे काढून जांबूत हद्दीत ठेवण्यात आले होते. ५ मे ते १९ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपूर्वीच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी यातील १ लाख १० हजार रुपयांचे वापरायोग्य ४४ ढाप्यांची चोरी केली असल्याची बाब समोर आली आहे . यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . 

    तर तालुक्यातीलच शिंदोडी येथून चोरट्यांनी दानपेटी चोरून पोबारा केल्याचीही घटना घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की राजेंद्र भाऊसाहेब कुदनर राहणार शिंदोडी नागझरी यांचे आजोबा बाबुराव आबाजी कुदनर यांच्या स्मृती ठिकाणी सिमेंटचा चौथरा बांधलेला आहे व त्या चौथऱ्यावर दानपेटी ठेवलेली होती तर ती दानपेटी ही चोरून चोरट्यांनी पोबारा केला होता.तर त्या चोरीतील दत्ता पांडुरंग पवार राहणार चिखलठाण ता.राहुरी जि अहमदनगर यास पोलिसांनी अटक केली तर उत्तम दादाभाऊ दुधवडे रा.वाळुचा दरा चिखलठाण ता.राहूरी जि.अहमदनगर हा फरार झाला आहे.


दरम्यान, काही दिवसांपासून चोरट्यांनी पठारभागात धुमाकूळ घातला आहे. चोरांनी अशी कुठलीच बाब सोडली नाही की त्याची चोरी करणे बाकी आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची देखील चोर चोरी करू लागले आहे. त्यात बोटा परीसरातील डाळींब चोरणाऱ्या चोरट्यांना मात्र पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे आणि त्यात आता  शासनाची संपत्ती देखील आता लक्ष होत असल्याचे या घटनेने समोर आले आहे.तरी पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरीक करत  आहेत.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु