कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पोलिसांनी अशीही जपली सामाजिक बांधिलकी

 




संगमनेर /तालुक्यातील नाशिक - पुणे महामार्गावर  तालुक्यातील आळेखिंड ते रायतेवाडी फाटा अंतरात अनेक मोठे मोठे खड्डे पडले आहेत.  या खड्ड्यांमध्ये अनेक वाहने ये जा करताना आदळत असतात व अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांमध्ये आदळुन जखमी झाले आहेत तर वाहणांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

त्यातच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख व पोलीस नाईक किशोर लाड हे शुक्रवारी दिनांक १२ ऑगस्ट रोजी बोटा येथे एका विद्यालयात हर घर तिरंगा या कार्यक्रमासाठी जात होते. त्याच दरम्यान , बोटा परीसरात  महामार्गावर मोठा खड्डा पडल्याने एक दुचाकी खड्ड्यात आदळली. दुचाकीस्वार दुचाकीवरून पडल्याने जखमी झाला.  त्यास पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.

या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत या खड्ड्यात खडी व माती टाकत तात्पुरत्या स्वरूपात खड्डा बुजविला आहे. सदर जीवघेणा खड्डा बुजविण्यात आल्यामुळे दुचाकी चालकांना तात्पुरता का होईना  दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या दोनही पोलिस कर्मचाऱ्यांचे उपस्थित वाहन चालकांनी कौतूक केले आहे.

दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून महामार्ग प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले आहेत .या खड्ड्यांमध्ये टाकलेली खडी उडून अनेक वाहनचालकांना लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने कायम स्वरुपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहण चालकांकडून करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु