कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर/ तालुक्यातील साकुर परिसरात गेल्या १० ते १५ दिवसांपासून एका माकडाने उच्छाद मांडला होता. तसेच बालके व ग्रामस्थांवर थेट हल्ले केले व चावा घेत जखमी केले होते. त्यामुळ परिसरात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली होती. तसेच बुधवारी सायंकाळी साकुर येथील दोन मुलींवर माकडाने हल्ला करत चावा घेत गंभीर जखमी केले होते. जवळपास २७ व्यक्तींना माकडाने चावा घेत जखमी केल्याची माहिती आहे. मात्र माकडाच्या या दहशतीने साकुरकर हैराण झाले होते. त्यामुळे लवकरात लवकर या माकडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती.
दरम्यान शुक्रवारी संगमनेर वनविभाग -३ चे वनक्षेत्रपाल सुभाष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तास्करवाडी रोड वर वनविभागाचे कर्मचारी हनुमंत घूगे, सुहास उपासणे, संतोष पारधी, हरिश्चंद्र जोजार, बाळासाहेब फटांगरे, रामदास वर्पे यांनी रेस्क्यु ऑपरेशन केले. यासाठी स्थानिक सागर डोके, रामा केदार, राजू झिटे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी माकडाला पकडण्यासाठी तास्करवाडी रोडलगत पिंजरा लावण्यात आला होता. यावेळी माकडाला पकडण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले होते. माकड पिंजऱ्यात अडकले होते पण त्याने तेथून पुन्हा धूम ठोकली होती. त्याचवेळी माकडाला बधिरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे माकड जेरबंद होणार अशी खात्री वनविभागाला होती. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी माकडाचा शोध घेत मोहीम राबविली. त्यानंतर काही तासांच्या आत अथक प्रयत्नानंतर माकडाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.
परंतु साकुर परिसरात गेल्या १० ते १५ दिवसांपासून माकडाने चांगलाच धूमाकूळ घातल्याने घबराट पसरली होती. माकड अचानकपणे कुणावरही हल्ले करत अंगावर धावून येत होते. विशेषता माकड लहान मुलांना टारगेट करत होते. मात्र वनविभागाने अथक परिश्रम घेत माकड जेरबंद करण्यासाठी यशस्वी ठरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
Comments
Post a Comment