कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

पीएम किसानच्या 27805 शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे तहसिलदार अमोल निकम यांच्या कडून आवाहन ..
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकयाना ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. अद्याप 27 हजार ८०५ शेतकर्यांनी केवायसी केलेली नाही. या शेतकर्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत केवायसी करून घ्यावी, अन्यथा बारावा हप्ता बँकेत जमा होणार नाही, अशी माहिती तहसिलदार यांनी दिली आहे.
अल्पभूधारक शेतकर्यांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. प्रत्येक पात्र शेतकयाला वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये निधी दिला जात आहे. प्रत्येक चार महिन्याला २ हजार रुपयांचा हप्ता शेतकयाच्या बँक खात्यात जमा केला जात आहे.
काही लाभार्थी शेतकयांचे बँक खात्यावरील असलेले नाव तसेच आधार कार्डवर असलेले नाव यामध्ये फरक आढळून येतो. त्यामुळे या योजनेचा हप्ता पात्र शेतकयांच्या बँक खात्यावर जमा होताना काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी शेतकयास e-KYC प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले. 31 ऑगस्ट पर्यंत ई केवायसी केली नाही तर पुढील हप्ते मिळणार नाही. E-KYC करण्यासाठी लाभार्थी यांनी नजीकचे सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्र, CSC सेंटर मध्ये आधार कार्ड व मोबाइल घेऊन जावे.
केवायसी शंभर टक्के व्हावी, यासाठी केंद्र सरकारने ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत दिली होती. मात्र, या प्रक्रियेस शेतकयांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रक्रियेस ३१ मे, ३१ जुलै व १५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली होती, तरीही अद्याप संगमनेर तालुक्यातील २७,८०५ शेतकयांची ई–केवायसी केलेली नाही. या लाभार्थ्यांना ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसिलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment