कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा-पो.नि.पाटील

 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी प्रशासनाकडून सुरु झाली असून उत्सवाची रुपरेषा ठरविण्यासाठी संगमनेर तालुक्यातील घारगांव पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी घारगांव पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटील,गणेश मंडळे व त्यांच्या प्रतीनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.

घारगांवसह पंचक्रोशीतील गावांमध्ये गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असतो.मात्र मागील दोन वर्ष कोरोनाचे जागतीक संकट उभे राहील्याने उत्सव अतिशय साध्या पद्धतीने पार पडले होते.परंतु यावर्षी शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरे केले जाणार आहेत त्यामुळे गणेश उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासन आतापासूनच सज्ज झाले असून त्यानिमित्ताने आजची बैठक पार पडली.


यावर्षी गणेश मंडळांनी  ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिली तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, गणेश मंडळांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवावेत.तसेच कोणाकडूनही सक्तीने वर्गणीची वसूली करू नये. शासनाने ठरवून दिलेले नियम मंडळांना बंधनकारक असून गणेश उत्सव शांततेत व आनंदात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.


तर यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कदम पोलिस पाटील सिताराम आभाळे, भाऊसाहेब खरात,राजू पाडेकर,संजय जठार, संदिप बुरके,किसन सुपेकर, विठ्ठल मेंगाळ, कुंडलीक साळुंके सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर,पप्पू चौगुले, सदाशिव शेळके, सुनिल वाघ, रमेश कर्डक यांसह गणेश मंडळांचे, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 आगामी काळात होणारे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गणपती स्थापना , मिरवणुक कार्यक्रमासाठी गणपती मंडळे व इतर नागरिक हे परवानगी घेण्यासाठी सीटीझन ( https://citizen.mahapolice.gov.in/citizen/MH/index.aspx ) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकिता ( www.mahapolice.gov.in ) या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध  आहे .


Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु