कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेना पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करत असतानाच राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झालं आहे. राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात युती झाली आहे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी तसेच संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तर शिवसेनेसोबत का युती केली, याचं कारण संभाजी ब्रिगेडनं स्पष्ट केलं आहे. तर यावरूनच विरोधकांकडून शिवसेनेवर चौफेर टीका केली जात आहे.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपा नेते निलेश राणेंनी संभाजी ब्रिगेडशी युती केल्यावरून उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे की ते सैराट मित्र मंडळ सोबत सुद्धा युती करतील.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरेंनी फुसकाबार सोडला आहे. उद्धव ठाकरे यांना शेवटची घर घर लागली आहे. सध्या उद्धवजींसाठी वाईट काळ आलाय, त्यांनी आत्मपरीक्षण करावे.अडीच वर्षात जनतेची दुर्गती कशी झाली हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे सध्या युती करायला कुणी मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेने संभाजी ब्रिगेडला सोबत घेतले आहे.
Comments
Post a Comment