कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

सगमनेर/ तालुक्यातील साकुर जवळील बिरेवाडी येथील शेतकरी लालू नारायण ढेंबरे यांच्या एक दुभती गाय व ३ गाभण शेळ्यांचा गवतातून विषबाधा झाल्यामुळे तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार दि २८ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, साकुर जवळील बिरेवाडी येथील शेंडगे वस्तीवर (दुधाणे मळा) येथील लालू नारायण ढेंबरे हे शेतकरी राहत आहे. त्यांनी जवळपास १० शेळ्या व २ गायी पाळल्या आहे. घराजवळच गोठा असून त्यात त्या बांधून ठेवल्या होत्या. तसेच नेहमीप्रमाणे लालू ढेंबरे हे शेतकरी शेळ्या व गायांना गोठ्यात त्यांच्याच शेतातील गवत टाकत होते. परंतु रविवार दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गवत खाल्याने शेळ्या व गायी हंबरडा फोडू लागले होते. मात्र बिबट्या आला की काय यामुळे हंबरडा फोडत असल्याचे ढेंबरे यांच्या घरच्यांना वाटले
. परंतु काही तासांतच ३ शेळ्या व एक गायीचा तडफडून मृत्यू झाला. दरम्यान सोमवार (दि २९ ) रोजी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जोंधळे यांना घटनेची माहिती समजताच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गवतातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र या घटनेमुळे लालू ढेंबरे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
चिबुकाटा गवत खाल्याने ३ शेळ्या व १ गायी दगावली आहे. तसेच चिबुकाटा गवतातून हायड्रोजन सायनाईमुळे विषबाधा झाल्याची शक्यता आहे. परंतु संबंधित शेतकऱ्याला भरपाई मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे".
(पशुवैद्यकीय अधिकारी डॉ नितीन जोंधळे)
Comments
Post a Comment