Posts

Showing posts from September, 2022

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

देवीला चाललेल्या भक्तांच्या वाहणाला अपघात

Image
  वाहनचालक  देवी भक्तांना वार्यावर सोडून वाहण घेऊन पसार  देवीला चाललेल्या वाहणाचा अपघात होऊन राहूरी येथील देवीभक्त जखमी झाल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदुर गावालगत असणार्या ओढयातील रस्त्यावर शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,राजेश बर्डे( राहणार राहुरी) हे नवरात्र उत्सवा निमित्त त्यांच्या कुटुंबियांना व नातलगांना घेऊन अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील येडूबाईच्या दर्शनाला चालले होते तर त्यांनी गावातीलच रिक्षा भाड्याने घेतली होती. ते शुक्रवारी दुपारी नांदुर परीसरात आले असता वाहत चालकाचा वाहणावरील ताबा सुटला व रिक्षा पलटी झाली.रिक्षातील लहान मुले, महिला व राजेश बर्डे यांनाही मार लागला. रिक्षाचालकाने रिक्षा सरळ करुन तेथुन धुम ठोकली.हि घटना आजुबाजुच्या नागरीकांच्या लक्षात येताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तातडीने नांदूर येथील खाजगी रुग्णालयात नेऊन तेथे त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आले. तर यावेळी.सरपंच जयवंत सुपेकर, बापू सुपेकर, राजेंद्र सुपेकर,संजय सोनवणे,गंगाधर भागवत, भाऊसाहेब सुपेकर, वैभव रोकडे, दत्ता ...

संगमनेर बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण..

Image
  संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो विक्रीसाठी गेलेल्या रणखांब येथील शेतकऱ्यास  मारहाण झाल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी सुमारे अर्धा ते एक तास बाजार समितीचे गेट बंद आंदोलन केले. अखेर पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात पुन्हा दाखल केल्या नंतर सदरचे गेट बंद आंदोलन मागे घेण्यात आले. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील रणखांब येथील शेतकरी किरण शिवाजी बारवे हा आपल्या शेतातील टोमॅटो घेऊन बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयुब सय्यद या व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी घेऊन गेला होता. त्या ठिकाणी किरण बारवे यांची पिक-अप गाडी आणि आयुब पठाण यांची सुद्धा गाडी उभी होती. त्यावेळी तुमची गाडी थोडी पुढे घ्या, असे शेतकरी किरण बारवे म्हटल्याचा आयुब पठाणला राग आला. त्याने मागचा पुढचा विचार न करता  शेतकऱ्यास शिवीगाळ केली. त्यानंतर जवळ असलेला त्याचा नातेवाईक अरबाल आयुब पठाण याने किरण यांची गच्ची पकडून लाथा बुक्यांनी मारहाण केली . संगमनेर  बाजार समितीच्या  मार्केटमध्ये शेतकऱ्याला मारहाण झाल्याची माहिती मिळत...

आजारी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश..

Image
  संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी गावाअंतर्गत असणार्या सांगडेवाडी परीसरातील पटेलदरा येथे आजारी अवस्थेतील दोन ते सव्वा दोन वर्षे वयाची बिबट्या मादी आढळून आल्याची घटना बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,कुरकुंडी परीसरात मोठ्या प्रमाणात डोंगर दर्या असून अनेक गुराखी आप आपली जनावरे चारण्यासाठी डोंगर दर्या मध्ये फिरत असतात. असेच सांगडेवाडी येथील त्रिंबक सांगडे हे  जनावरे चारत होते.तर त्यांना जनावरे चारत असताना अचानक गुरगुरणयाचा आवाज आला.तर त्यांनी पाहिले असता त्यांना बिबट्या आढळून आला. तर कुरकुंडी ते सांगडेवाडी रस्त्याच्या लगतच हा बिबट्या निपचित पडलेला असल्याने. त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बघ्याची गर्दी जमली होती.  घटनेची माहिती कुरकुंडी गावचे सरपंच शाहीन चौगुले, सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौगुले यांना समजताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेत वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे यांना याबाबतची माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आजारी बिबटयावर जाळी टाकून त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले...

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आपदा मित्र नोंदनी सुरू...

Image
  अहमदनगर जिल्हयातील नागरीकांना कळविणेत येते की, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर यांचे मार्फत अहमदनगर जिल्ह्यात आपदा मित्र योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हयात 500 स्वयंसेवकांची आपदा मित्र म्हणून निवड करण्यात येणार आहे. सदर आपदा मित्रांना 8-10 दिवसांचे निवासी आपत्कालीन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित आपदा मित्रांना ओळखपत्र, गणवेश तसेच प्रशिक्षित आपदा मित्र/ग्रामपंचायत यांना आपत्कालीन प्रतिसाद किट (Emergency Response Kit) देण्यात येणार आहे. आवश्यक : 1. वयोगट-18 ते 40 वयोगटातील ( माजी सैनिक, सेवानिवृत्त वैद्यकीय व्यावसायिक, स्थापत्य अभियंते यांना वयाचे निकष शिथिल केले जाऊ शकतात). 2. जिल्हयातील स्थानिक रहिवासी असावे. 3. शिक्षण :- किमान ७ वी पास. 4. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य 5. आपत्ती प्रतिसाद कार्यात स्वयंसेवा करण्याचा पूर्वीचा अनुभव असेल त्यास प्रथम प्राधान्य. 6. आधारकार्ड अनिवार्य 6. एकूण 25% महिलांचा सहभाग असावा. 7 . नेहरू युवा केंद्र, NCC, NSS, भारत स्काऊट गा...

थोरात कारखान्याचा मंगळवारी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ

Image
  संगमनेर / सहकारासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022 - 23 गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वा. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई थोरात यांच्या शुभहस्ते व आ.डॉ.सुधीर तांबे, बाजीराव पा.खेमनर यांच्या उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली आहे. काँग्रेस पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात 15 लाख 53 हजाराचे विक्रमी गाळप केले आहे. शेतकरी,सभासद, कार्यक्षेत्र बाहेरील ऊस उत्पादक या सर्वांचा थोरात कारखान्यावर मोठा विश्वास असून या कारखान्याने कायम सर्वाधिक भाव दिला आहे. मंगळवारी कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.आरतीताई थोरात, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मनीषा ताई हासे, रमेश गुंजाळ व सौ.ममताताई रमेश गुंजाळ, इंद्रजीत अशोकराव खेमनर व सौ.सोनालीताई...

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

Image
  संगमनेर / तालुक्यातील खांडगाव शिवारात सकाळी शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केला. यात परसराम जिजाबा गुंजाळ (वय 43) हे जखमी झाले आहे. परसराम गुंजाळ हे शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते. ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. जखमी परसराम गुंजाळ यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनक्षेत्रपाल लोंडे, श्रीमती कोंढार, कोळी, यादव यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन  जखमीची विचारपूस केली. परसराम गुंजाळ यांचेवर प्राथमिक उपचार करण्यात येवून त्यांना पुढील उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे

घारगावांत भुरट्या चोरांचा सुळसुळाट...

Image
  संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील घारगांव येथील गावठाण परीसरातील भुरट्या चोरांनी घरांना बाहेरील बाजूने कड्या लावून दुचाकींमधील पेट्रोलची चोरी केली आहे. हि घटना रवीवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,घारगांव गावठाण लगत कोठे बुद्रुक रोडला  विठ्ठल भिकाजी पिसाळ,मधे साहेब, अब्दुल हमीद शेख यांसह आदि चार ते पाच भाडेकरु राहायला आहेत रवीवारी रात्री जेवन केल्यानंतर सगळे गाढ झोपेत असल्याचा फायदा अज्ञात भुरट्या चोरांनी घेऊन परीसरातील सर्वच घरांना बाहेरुन कड्या लावल्या व बाहेर उभ्या असलेल्या दुचाकींचे पेट्रोल चोरुन धुम ठोकली.सकाळी हे रहीवासी उठल्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने बाहेरुन कड्या लावल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या नागरीकांना फोन केले .व ग्रामस्थ येऊन कड्या उघडल्यानंतर झालेला प्रकार सर्वांच्या लक्षात आला. दरम्यान पठार भागात भुरटे चोर कायमच उच्छाद मांडत असून शेतकऱ्यांच्या मोटारी,केबल, शेती उपयोगी  साहित्य,शेतमाल चोरी,दुचाकी,घरफोडी, व्यावसायिकांच्या दुकानांतील सामानांची चोरी अश्या वेगवेगळ्या चोऱ्या हे चोरटे कायमच करत ...

बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

Image
  संगमनेर /( गणेश भोसले ) तालुक्याच्या पठार भागातील घारगांव येथील रामदास भिकाजी पिसाळ यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरवारी दिनांक २२ सप्टेंबर रोजी रात्री दोन वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रामदास भिकाजी पिसाळ हे घारगांव गावठाण लगत राहत असून त्यांनी दुग्ध व्यवसायासाठी गाई पाळल्या आहेत.गुरवारी रात्री दोन वाजेच्या दरम्यान पिसाळ यांच्या गाईच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करत एक वर्षाच्या कालवडीवर हल्ला करत ठार केले. दरम्यान पिसाळ यांचा मुलगा शंतनु हा घराबाहेर आला असताना त्याला बिबट्याचे दर्शन झाल्याने शंतनु हा पुरता घाबरून गेला व त्याने आरडाओरडा करताच घरातील सदस्यही बाहेर आले.व आरडाओरडा केल्याने बिबट्याने धुम ठोकली. मात्र त्याआधी बिबट्याने कालवडी वर ताव मारला होता. पिसाळ हे गावठाण परीसरात राहत असून जंगल सोडून बिबटया गावात येऊन त्यांच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश केल्याने घारगांव गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परीसरात पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत

पुणे नाशिक महामार्गावरील अपघातात दोन ठार एक जखमी

Image
  संगमनेर / तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट महामार्गावरील उड्डानपुलाचा कठड्याला तोडून खाली कोसळली. या भीषण अपघातात कारमधील  दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. ही घटना हिवरगाव पावसा येथील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दिनांक.२० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. प्रथमेश विकास कुरकुटे (वय 22, रा. कुरकुटवाडी) आणि अभिषेक साहेबराव रहाणे (वय 30, रा. चंदनापुरी) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील रहिवासी असणारा प्रथमेश विकास कुरकुटे, पोखरी बाळेश्वर येथील रहिवासी असणारा विजय काळे तसेच चंदनापुरी येथील रहिवासी असणारा अभिषेक साहेबराव रहाणे हे तिघेजण चंदनापुरीहुन नातेवाईकांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी घुलेवाडी येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाने जात होते. दरम्यान यांची कार हिवरगाव पावसातील महामार्गाच्या उड्डाण पुलावर आली असता अचानक कार चालवणाऱ्याचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे कार पुलाचे कठडे तोडून थेट खाली कोसळल...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत ,छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संगमनेरात पुरस्कार वितरण

Image
  राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत ,छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संगमनेरात पुरस्कार वितरण स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात पुरस्कार डॉ.अ.ह.साळुंखे यांना डॉ.अण्णासाहेब शिंदे पुरस्कार डॉ.सुधीर भोंगळे यांना तर सहकारातील नेतृत्व पुरस्काराने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा गौरव संगमनेर / राजस्थानचे मुख्यमंत्री नामदार अशोक गहलोत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार छगनरावजी भुजबळ, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12.30 वा. शेतकी संघ प्रांगण, यशोधन कार्यालयाशेजारी जयंती महोत्सव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार डॉ. सुधीर तांबे व बाजीराव पा. खेमनर यांनी दिली आहे. जयंती महोत्सव पुरस्कार कार्यक्रमाबाबत माहिती देताना आ.डॉ.तांबे म्हणाले की, यावर्षीचा जयंती महोत्सव हा कोरोना काळामुळे पुढे ढकलण्यात आला होता. हे पुरस्कार वितरण शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12.30 वा. शेतकी संघ प्रांगणात राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री नामदार अशोक गहलोत यांच्या शुभहस्ते ...

एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल’ बनतेय अत्याधुनिक दंतोपचाराचे केंद्र

Image
  संगमनेर / इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटर व हॉस्पिटलमध्ये (एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल) सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीने दंतोपचार केले जात आहेत. त्यामुळे संवेदनशील आणि वेदनादायक समजल्या जाणाऱ्या दंतउपचारांची भीती आता बाळगण्याची गरज राहिली नाही. दंतउपचार सुरवातीपासूनच गुंतागुंतीचे आणि दीर्घकाळ चालत आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण या आजारांकडे फारसे गांभीर्याने घेत नाहीत. मात्र, आता सोप्या पद्धतीने आणि कमी कालावधीत हे उपचार करता येणे शक्य झाले आहे. दातांच्या आजारात प्रामुख्याने दाताला लागलेली कीड, दात दुखणे, हिरड्यांचा आजार आदींचा समावेश होतो. रूट कॅनॉल, दात काढणे, अक्कलदाढा काढणे, जबड्याच्या आणि हाडांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात; तसेच व्यसनांमुळे होणाऱ्या दातांच्या आजारावर देखील उपचार केले जात आहेत. वेडेवाकडे दात असणे किंवा दात एकमेकांत बंद न होणे. अशा दातांमुळे रुग्णाला ते साफ किंवा निरोगी ठेवणे अवघड होते. त्यामुळे दात किडण्याचे व हिरडयांचा त्रास होण्याचा धोका बळावतो. विशेष म्हणजे, वेदना देणारी दातांची शसक्रिया आता लेझर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हो...

आतुरता उद्धव साहेबांच्या गर्जनेची ; पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

Image
  शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात शिंदे गटासह भाजपने सरकार स्थापन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात शाब्दिक संघर्ष सुरु झाल्याचे दिसून आले. शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनात देखील आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. आता दसरा मेळाव्यावावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले आहेत. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. शिंदे गट वारंवार आम्हीच शिवसेना आहोत असं सांगत आहे. अशात उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दसरा मेळाव्याची तयारी करण्याचे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांना काय आदेश देणार याकडे राज्यासह देशाचे देखील लक्ष लागले आहे. अशात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात आतुरता उद्धव साहेबांच्या गर्जनेची अशा आशयासह बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरवर शिवसेनेनेच निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण देखील टाकण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकर...

पारनेर डेपोमध्ये चालक दिन साजरा..

Image
  पारनेर  /  तालुक्यातील पारनेर परिवहन क्षेत्रात चालकांचे मोठे योगदान असल्याने जागतिक चालक दिन 17 सप्टेंबरला साजरा करण्यात आला. यावेळी पारनेर तालुका शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियांका ताई खिल्लारी  यांनी शिवसेनेच्या माध्यमातून वाहन चालक यांना श्रीफळ व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, तर अहो रात्र कष्ट करून प्रवासांना सुखरूप पर्यंत घरी पोहोचवण्याचे हे काम चालक करत असतात. म्हणून आज पारनेर डेपो येथे चालक दिन साजरा करण्यात आला. जगातील पहिला चालक म्हणजे श्रीकृष्ण जननी अर्जुनाच्या रथाचे सार्थ केले त्याचप्रमाणे वाहन चालक आपल्या कुटुंबाप्रमाणे प्रवाशांच्या जीवाची काळजी घेतात वाहनाची पुढची काच खूप मोठी असते आणि मागे कोण आहे हे बघण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो कारण भूतकाळाला फारच थोडे महत्त्व आहे मागे फक्त लक्षात ठेवा भविष्यकाळ महत्त्वाचा आहे भूतकाळातील गोष्टींचा विसर पडून भविष्य काळात आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवणे हेच प्रमुख ध्येय चालकाचे असते, तर आपल्या जीवाची परवा न करता प्रामाणिकपणे नोकरी करून आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह करत असतात त्यामुळे त्यांचा सत्कार करून त्यांन...

पाणी ढगातूनच नाही तर डोळ्यातूनही वाहू लागले..

Image
एक-एक पै गोळा करुन कसतरी बि-बियाणं गोळा केलतं हाता-पाया पडुन काळ्या आईच्या कुशीत पेरलं होतं रक्ताचं पाणी करुन शिवार सोन्यावानी पिकवलं होत.. मेघ राजाचा झाला असा कसा कोप नाही नाही म्हणत विजांचा लकलकाट, ढगांचा गडगडाट करुन आलास होत्याच नव्हतं नव्हतं होत केलं वाहून गेल सारं शिवार लागली सोन्यासारखी पिकांची वाट.. होतं नव्हतं सर्वे कष्टान पिकवलेल गेलं सोन्यासारखं पीक मातीमोल झालं, पाणी फक्त ढगातुनचं नाही तर डोळ्यांमधून वाहु लागलं. . आता गरज सरसकट मदतीची नको कुठल्या घोषणेची वाट नको अधिकार्यांचा पंचनाम्याचा थाट, नको पाहणी दौरा नको कागदी घोडे  नको आम्हाला सांत्वनाचे शब्दकोडे माय-बाप सरकार आता लक्ष द्या आमच्याकडे..         कवी - गणेश सोनवणे..शेतकरी पुत्र

वाघवाड्यात घुसून बिबटयाचा हल्ला...

Image
  बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व कोंबड्या ठार शेळकेवाडी येथील घटना.. संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावा अंतर्गत असणार्या शेळके वाडी येथील वाघ वाड्यात घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी व कोंबड्या ठार झाल्याची घटना गुरवारी दिनांक १५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.       याबाबत अधिक माहिती अशी की दत्तात्रय दामू वाघ हे आपल्या कुटुंबासोबत शेळकेवाडी येथे राहत आहेत.व शेती बरोबरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत. व घरासमोर शेळ्यांचा गोठा बांधला आहे. गुरवारी रात्री अचानक बिबट्याने गोठ्यात प्रवेश करत शेळीला ठार करत शेळी घेऊन पलायन केले. व तेथेच असणार्या कोंबड्यांचाही बिबट्याने फडशा पाडला आहे. तर सकाळी उठल्यानंतर ही गोष्ट वाघ यांच्या लक्षात आली.शेळी व कोंबड्या एकाच वेळी ठार केल्याने एक पेक्षा जास्त  बिबटे  असण्याची शक्यता वाघ यांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती समजताच वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रेश्मा जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान परीसरात उसाचे क्षेत्र मो...

साकुर मध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई..

Image
  संगमनेर / ( सतिश फापाळे ) तालुक्याच्या  पठार भागातील साकुर येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोघांवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी गुन्हा दाखल केल्याची घटना बुधवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी पावणे बारा वाजेच्या दरम्यान घडली आहे.     याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इस्माईल इब्राहिम शेख यांचे साकुर ग्रामपंचायत जवळ अमन पान शॉप हे दुकान आहे.तर किरण सुखदेव डोखे यांचे साकुर ग्रामपंचायत समोर गणेश पान शॉप हे दुकान आहे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी हे साकुर गावात आले असता त्यांना अमन पान शॉप सेंटर या ठिकाणी इस्माइल शेख हे गुटखा विक्री करताना आढळून आले.तर त्यांच्या पान शाॅप मध्ये २३४ रुपये किमतीचे विमल पान मसालाचे १३ पाऊच,२६ रुपये किमतीचे तंबाखुचे १३ पाऊच,१२८ रुपये किमतीचे हिरा पान मसाला ३२ पाऊच,३० रुपये किमतीचे रॉयल ७१७ तंबाखुचे ३० पाऊच असा एकुण ४१८ रुपये किमतीचा मुद्दे माल सापडला आहे. तर किरण डोखे यांच्या गणेश पान शॉप  मध्ये १४०८ रुपये किमतीचा हिरा पान मसाला (एस.एल पॅक)३५२ पाउचेस ३५२ रुपये किमतीची रॉयल ७१७ तंबाखू ३५२ पाऊचेस असा एकूण १७६० रुपये ...