कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर/ (सतिश फापाळे) तालुक्याच्या पठार भागातील साकुर येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोघांवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी गुन्हा दाखल केल्याची घटना बुधवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी पावणे बारा वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इस्माईल इब्राहिम शेख यांचे साकुर ग्रामपंचायत जवळ अमन पान शॉप हे दुकान आहे.तर किरण सुखदेव डोखे यांचे साकुर ग्रामपंचायत समोर गणेश पान शॉप हे दुकान आहे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी हे साकुर गावात आले असता त्यांना अमन पान शॉप सेंटर या ठिकाणी इस्माइल शेख हे गुटखा विक्री करताना आढळून आले.तर त्यांच्या पान शाॅप मध्ये २३४ रुपये किमतीचे विमल पान मसालाचे १३ पाऊच,२६ रुपये किमतीचे तंबाखुचे १३ पाऊच,१२८ रुपये किमतीचे हिरा पान मसाला ३२ पाऊच,३० रुपये किमतीचे रॉयल ७१७ तंबाखुचे ३० पाऊच असा एकुण ४१८ रुपये किमतीचा मुद्दे माल सापडला आहे. तर किरण डोखे यांच्या गणेश पान शॉप मध्ये १४०८ रुपये किमतीचा हिरा पान मसाला (एस.एल पॅक)३५२ पाउचेस ३५२ रुपये किमतीची रॉयल ७१७ तंबाखू ३५२ पाऊचेस असा एकूण १७६० रुपये किमतीचा माल आढळून आला आहे.
तर हे प्रतीबंधीत अन्न पदार्थ जन आरोग्यास धोका असलेबाबत माहीती असून सुद्धा त्याची विक्री व साठा करण्यात आलेला आहे.तसेच उत्पादन व विक्रेता यांनी प्रतिबंधीत अन्न पदार्थ हे शरीरास इजा करणारे व ज्याच्या सेवनापासून वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आजार उद्भवतात त्यामुळे शरीरास बाधा पोहचते. हे माहीत असताना सुद्धा हा अवैध गुटखा स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करताना आढळून आल्यामुळे प्रदिप परशुराम पवार (अन्न सुरक्षा अधिकारी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इस्माईल इब्राहिम शेख वय ४६ रा साकूर ता.संगमनेर. जिल्हा अहमदनगर व किरन सुखदेव डोखे वर २८ रा.साकूर ता.संगमनेर यांच्या विरोधात घारगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तर पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते हे करत आहेत.
पठार भाग अवैध धंद्यांचा बालेकिल्ला
पठारभाग अवैध धंद्यांचा बालेकिल्ला बनला असून इतर अवैध धंद्यांबरोबर गुटखा विक्री बरोबर मोठ मोठे डिलर पठार भागात तयार झाले आहेत . तसेच बाहेरच्या तालुका, जिल्ह्यातून पठार भागातील गावांमध्ये विक्रिसाठी येत असल्याची माहिती असून यामध्ये मोठ्या डिलरांचा समावेश आहे. त्यातच अवैध गुटखा विक्री होत असल्याची कल्पना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना असून कुठलीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. कारवाई का होत नाही यामागचे कारण ना समजण्या इतपत पठार भागातील जनता दुधखुळी नाही . साकुरमध्ये याआधीही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आले अन् कारवाई न करताच निघून गेल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे यामागे नेमके गौडबंगाल काय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. त्यात बुधवार दि १४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली खरी पण यावेळेस त्यांच्या हाती फक्त २१७८ रुपयांचा मुद्देमाल लागला. तोही दोन पान टपरीवर. त्यामुळे साकुरमध्ये नगरहून आलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या या कारवाईने नेमकं काय साध्य केलं?बडया गुटखा किंगवर कारवाई कधी होणार? ही कारवाई फक्त नावालाच दाखवण्यापुरतीच केली आहे का असे एक ना अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत
साकुर सह पठारभागात अवैध गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत असून होत असून अनेक डिलर देखील तयार झालेले आहेत. याबाबत विविध माध्यमांतून आवाज उठवला होता त्यानंतर मंत्रालयात ऑनलाइन तक्रार देखील केली होती. याच तक्रारीची दखल घेत वरील कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. परंतु ही कारवाई फक्त नावालाच केली असून चोर सोडून संन्यासालाच फाशी दिली आहे. तसेच खरे गुटखा किंग मोकाट असून खरी कारवाई बड्या माश्यांवर करावी. कारवाई न झाल्यास येत्या २ ऑक्टबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे.
सुनिल इघे
(सामाजिक कार्यकर्ते साकूर)
Comments
Post a Comment