कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल’ बनतेय अत्याधुनिक दंतोपचाराचे केंद्र

 

संगमनेर / इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटर व हॉस्पिटलमध्ये (एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल) सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीने दंतोपचार केले जात आहेत. त्यामुळे संवेदनशील आणि वेदनादायक समजल्या जाणाऱ्या दंतउपचारांची भीती आता बाळगण्याची गरज राहिली नाही.

दंतउपचार सुरवातीपासूनच गुंतागुंतीचे आणि दीर्घकाळ चालत आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण या आजारांकडे फारसे गांभीर्याने घेत नाहीत. मात्र, आता सोप्या पद्धतीने आणि कमी कालावधीत हे उपचार करता येणे शक्य झाले आहे.


दातांच्या आजारात प्रामुख्याने दाताला लागलेली कीड, दात दुखणे, हिरड्यांचा आजार आदींचा समावेश होतो. रूट कॅनॉल, दात काढणे, अक्कलदाढा काढणे, जबड्याच्या आणि हाडांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात; तसेच व्यसनांमुळे होणाऱ्या दातांच्या आजारावर देखील उपचार केले जात आहेत. वेडेवाकडे दात असणे किंवा दात एकमेकांत बंद न होणे. अशा दातांमुळे रुग्णाला ते साफ किंवा निरोगी ठेवणे अवघड होते. त्यामुळे दात किडण्याचे व हिरडयांचा त्रास होण्याचा धोका बळावतो.



विशेष म्हणजे, वेदना देणारी दातांची शसक्रिया आता लेझर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होत असून दातांच्या मुळाशी असणारा संसर्ग शंभर टक्के नष्ट करण्यात यश येत आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी दंत महाविद्यालय व दवाखान्यात रुग्णांचा तपासणीसाठी आणि शस्राक्रीयांसाठी कल वाढला आहे.


सर्वसामान्यांसाठी हक्काची दंतचिकित्सा


किडलेले, तुटलेले दात असतील, मुख दुर्गंधी जाणवत असेल, हिरड्यातून रक्त येत असेल, तोंडात जखमा आदी लक्षणे आढळल्यास त्वरित दंतवैद्यांचा सल्ला घ्यावा. दातांचे दुष्परिणाम चेहऱ्याच्या स्नायूंवर, जबड्यावर, डोकेदुखी, मानेचे आजार किंवा पाठदुखी यावरही दिसू शकतात. त्यामुळे दातांचे दुखणे अंगावर न काढता तात्काळ उपचार करून घ्यावेत. - डॉ किरण जगताप, अधिष्ठाता


अशी घ्या  दातांची  काळजी


* नियमित दंतवैद्यांकडून दातांची तपासणी करावी.


* तंबाखू, गुटखा आदी व्यसनांपासून दूर राहावे.


* चिकट, गोड आदी पदार्थ टाळावे.


* लहान मुलांना चॉकलेट, गोळ्या देऊ नयेत.


* दिवसातून दोन वेळा ब्रश करावा.


 


या समस्या होणार दूर


काळ्या झालेल्या हिरड्यांचा रंग नॅार्मल करता येतो


• गमी स्माईल (Gummy smile) म्हणजे हसल्यावर हिरड्या जास्त दिसणे व दातांची उंची वाढवणे यावर उपचार शक्य


• दातांना चकाकी आणता येणे शक्य


• टंग टायवर उपचार शक्य


• दातांना होणारी संवेदनशीलता दूर करण्यासाठी होतो लेझरचा वापर.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु