कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पारनेर डेपोमध्ये चालक दिन साजरा..

 पारनेर / तालुक्यातील पारनेर परिवहन क्षेत्रात चालकांचे मोठे योगदान असल्याने जागतिक चालक दिन 17 सप्टेंबरला साजरा करण्यात आला.



यावेळी पारनेर तालुका शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियांका ताई खिल्लारी  यांनी शिवसेनेच्या माध्यमातून वाहन चालक यांना श्रीफळ व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, तर अहो रात्र कष्ट करून प्रवासांना सुखरूप पर्यंत घरी पोहोचवण्याचे हे काम चालक करत असतात. म्हणून आज पारनेर डेपो येथे चालक दिन साजरा करण्यात आला.

जगातील पहिला चालक म्हणजे श्रीकृष्ण जननी अर्जुनाच्या रथाचे सार्थ केले त्याचप्रमाणे वाहन चालक आपल्या कुटुंबाप्रमाणे प्रवाशांच्या जीवाची काळजी घेतात वाहनाची पुढची काच खूप मोठी असते आणि मागे कोण आहे हे बघण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो कारण भूतकाळाला फारच थोडे महत्त्व आहे मागे फक्त लक्षात ठेवा भविष्यकाळ महत्त्वाचा आहे भूतकाळातील गोष्टींचा विसर पडून भविष्य काळात आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवणे हेच प्रमुख ध्येय चालकाचे असते, तर आपल्या जीवाची परवा न करता प्रामाणिकपणे नोकरी करून आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह करत असतात त्यामुळे त्यांचा सत्कार करून त्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रियंका खिल्लारी

(तालुकाप्रमुख शिवसेना महिला आघाडी


तर यावेळी उपस्थित पारनेर डेपो मॅनेजर पराग भोपळे, इंद्रनील कुसकर महामंडळ कर्मचारी व चालक पोखरी महिला आघाडी प्रमुख जयश्री शिंदे, डोकी महिला आघाडी शाखाप्रमुख रिजवान पठाण, अर्चनाताई दिवेकर, प्रियांका शिंदे, युवा सेना उपतालुकाप्रमुख अमोल ठुबे, शिवसेना सचिव रामभाऊ मोरे, युवा सेना अध्यक्ष आदिनाथ कदम, शुभम पाडळे, राजू बोरुडे, शिवसेना युवा सेना महिला आघाडीच्या पदाधिकारी अधिकारी यांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु