कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर /(गणेश भोसले) तालुक्याच्या पठार भागातील घारगांव येथील रामदास भिकाजी पिसाळ यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरवारी दिनांक २२ सप्टेंबर रोजी रात्री दोन वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामदास भिकाजी पिसाळ हे घारगांव गावठाण लगत राहत असून त्यांनी दुग्ध व्यवसायासाठी गाई पाळल्या आहेत.गुरवारी रात्री दोन वाजेच्या दरम्यान पिसाळ यांच्या गाईच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करत एक वर्षाच्या कालवडीवर हल्ला करत ठार केले. दरम्यान पिसाळ यांचा मुलगा शंतनु हा घराबाहेर आला असताना त्याला बिबट्याचे दर्शन झाल्याने शंतनु हा पुरता घाबरून गेला व त्याने आरडाओरडा करताच घरातील सदस्यही बाहेर आले.व आरडाओरडा केल्याने बिबट्याने धुम ठोकली. मात्र त्याआधी बिबट्याने कालवडी वर ताव मारला होता.
पिसाळ हे गावठाण परीसरात राहत असून जंगल सोडून बिबटया गावात येऊन त्यांच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश केल्याने घारगांव गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परीसरात पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Comments
Post a Comment