कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

आतुरता उद्धव साहेबांच्या गर्जनेची ; पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

 शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात शिंदे गटासह भाजपने सरकार स्थापन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात शाब्दिक संघर्ष सुरु झाल्याचे दिसून आले. शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनात देखील आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. आता दसरा मेळाव्यावावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले आहेत.

दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. शिंदे गट वारंवार आम्हीच शिवसेना आहोत असं सांगत आहे. अशात उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दसरा मेळाव्याची तयारी करण्याचे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांना काय आदेश देणार याकडे राज्यासह देशाचे देखील लक्ष लागले आहे. अशात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात आतुरता उद्धव साहेबांच्या गर्जनेची अशा आशयासह बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो पाहायला मिळत आहेत.

विशेष म्हणजे या पोस्टरवर शिवसेनेनेच निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण देखील टाकण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिंदे गटासह भाजपवर कशा प्रकारे तोफ डागणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यासोबतच आदित्य ठाकरे यांच्या बरोबरीने तेजस ठाकरे देखील व्यासपीठावर दिसणार का याची उत्सुकता देखील शिवसैनिकांना लागली आहे

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु