कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

वाहनचालक देवी भक्तांना वार्यावर सोडून वाहण घेऊन पसार
देवीला चाललेल्या वाहणाचा अपघात होऊन राहूरी येथील देवीभक्त जखमी झाल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदुर गावालगत असणार्या ओढयातील रस्त्यावर शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,राजेश बर्डे( राहणार राहुरी) हे नवरात्र उत्सवा निमित्त त्यांच्या कुटुंबियांना व नातलगांना घेऊन अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील येडूबाईच्या दर्शनाला चालले होते तर त्यांनी गावातीलच रिक्षा भाड्याने घेतली होती. ते शुक्रवारी दुपारी नांदुर परीसरात आले असता वाहत चालकाचा वाहणावरील ताबा सुटला व रिक्षा पलटी झाली.रिक्षातील लहान मुले, महिला व राजेश बर्डे यांनाही मार लागला. रिक्षाचालकाने रिक्षा सरळ करुन तेथुन धुम ठोकली.हि घटना आजुबाजुच्या नागरीकांच्या लक्षात येताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तातडीने नांदूर येथील खाजगी रुग्णालयात नेऊन तेथे त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आले.
Comments
Post a Comment