कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो विक्रीसाठी गेलेल्या रणखांब येथील शेतकऱ्यास मारहाण झाल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी सुमारे अर्धा ते एक तास बाजार समितीचे गेट बंद आंदोलन केले. अखेर पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात पुन्हा दाखल केल्या नंतर सदरचे गेट बंद आंदोलन मागे घेण्यात आले.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील रणखांब येथील शेतकरी किरण शिवाजी बारवे हा आपल्या शेतातील टोमॅटो घेऊन बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयुब सय्यद या व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी घेऊन गेला होता. त्या ठिकाणी किरण बारवे यांची पिक-अप गाडी आणि आयुब पठाण यांची सुद्धा गाडी उभी होती. त्यावेळी तुमची गाडी थोडी पुढे घ्या, असे शेतकरी किरण बारवे म्हटल्याचा आयुब पठाणला राग आला. त्याने मागचा पुढचा विचार न करता शेतकऱ्यास शिवीगाळ केली. त्यानंतर जवळ असलेला त्याचा नातेवाईक अरबाल आयुब पठाण याने किरण यांची गच्ची पकडून लाथा बुक्यांनी मारहाण केली.
संगमनेर बाजार समितीच्या मार्केटमध्ये शेतकऱ्याला मारहाण झाल्याची माहिती मिळताच युवासेनेचे तालुका प्रमुख गुलाब भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद पवार, महिला तालुकाप्रमुख शितल हासे, पप्पू कानकाटे, साहेबराव हासे, रणजीत ढेरंगे यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने कृषी उत्पन्नबाजार समितीच्या गेटजवळ जमा झाले. तर युवासेनेचे तालुकाप्रमुख गुलाबराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी सुमारे अर्धा ते एक तास गेट बंद आंदोलन केले. जो पर्यंत मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल होत नाही, तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाही. तसेच गेट बंद आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता.
कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर या बाजार समितीला मागील महिन्यांतच जिल्ह्यात पहीला व राज्यात चौथा नंबर मिळाला आहे.आणि त्याच मार्केट मध्ये शेतकऱ्याला मारहाण होऊनही मार्केट कमीटीचा साधा एकही पदाधिकारी लक्ष देण्यासाठी आला नाही. शेतीमाल विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना मारहाण होते अतीशय निंदनीय बाब आहे.
गुलाबराजे भोसले
युवासेना तालुकाप्रमुख
या आंदोलनाची माहिती समजताच पोलीस उपाधीक्षक राहुल मदने आणि संगमनेर शहराचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले. त्या नंतर आंदोलनकर्त्यांनी गेट बंद आंदोलन मागे घेतले. याबाबत किरण बारवे यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आयुब पठाण व अरबल पठाण या दोघांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment