कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

घारगावांत भुरट्या चोरांचा सुळसुळाट...

 


संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील घारगांव येथील गावठाण परीसरातील भुरट्या चोरांनी घरांना बाहेरील बाजूने कड्या लावून दुचाकींमधील पेट्रोलची चोरी केली आहे. हि घटना रवीवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,घारगांव गावठाण लगत कोठे बुद्रुक रोडला  विठ्ठल भिकाजी पिसाळ,मधे साहेब, अब्दुल हमीद शेख यांसह आदि चार ते पाच भाडेकरु राहायला आहेत रवीवारी रात्री जेवन केल्यानंतर सगळे गाढ झोपेत असल्याचा फायदा अज्ञात भुरट्या चोरांनी घेऊन परीसरातील सर्वच घरांना बाहेरुन कड्या लावल्या व बाहेर उभ्या असलेल्या दुचाकींचे पेट्रोल चोरुन धुम ठोकली.सकाळी हे रहीवासी उठल्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने बाहेरुन कड्या लावल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या नागरीकांना फोन केले .व ग्रामस्थ येऊन कड्या उघडल्यानंतर झालेला प्रकार सर्वांच्या लक्षात आला.

दरम्यान पठार भागात भुरटे चोर कायमच उच्छाद मांडत असून शेतकऱ्यांच्या मोटारी,केबल, शेती उपयोगी  साहित्य,शेतमाल चोरी,दुचाकी,घरफोडी, व्यावसायिकांच्या दुकानांतील सामानांची चोरी अश्या वेगवेगळ्या चोऱ्या हे चोरटे कायमच करत असतात त्यांना लगाम लावण्यास घारगांव पोलीस अपयशी ठरत असल्याची चर्चा सर्व सामान्यांमध्ये सुरु आहे. त्यामुळे घारगांव पोलिसांनी या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु