कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आपदा मित्र नोंदनी सुरू...

 

अहमदनगर जिल्हयातील नागरीकांना कळविणेत येते की, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर यांचे मार्फत अहमदनगर जिल्ह्यात आपदा मित्र योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हयात 500 स्वयंसेवकांची आपदा मित्र म्हणून निवड करण्यात येणार आहे. सदर आपदा मित्रांना 8-10 दिवसांचे निवासी आपत्कालीन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित आपदा मित्रांना ओळखपत्र, गणवेश तसेच प्रशिक्षित आपदा मित्र/ग्रामपंचायत यांना आपत्कालीन प्रतिसाद किट (Emergency Response Kit) देण्यात येणार आहे.


आवश्यक :

1. वयोगट-18 ते 40 वयोगटातील ( माजी सैनिक, सेवानिवृत्त वैद्यकीय व्यावसायिक, स्थापत्य अभियंते यांना वयाचे निकष शिथिल केले जाऊ शकतात).

2. जिल्हयातील स्थानिक रहिवासी असावे.

3. शिक्षण :- किमान ७ वी पास.

4. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य

5. आपत्ती प्रतिसाद कार्यात स्वयंसेवा करण्याचा पूर्वीचा अनुभव असेल त्यास प्रथम प्राधान्य. 6. आधारकार्ड अनिवार्य


6. एकूण 25% महिलांचा सहभाग असावा.

7. नेहरू युवा केंद्र, NCC, NSS, भारत स्काऊट गाईड यांच्यामधून 20% नोंदणी अपेक्षित सेवा निवृत्त सैनिक, अग्निशमन विभाग, होमगार्ड, सिव्हील डिफेन्स मध्ये कार्यरत व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.

8.  आधारकार्ड अनिवार्य 

तरी अहमदनगर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्वेच्छेने आपदा मित्र म्हणून आपली नोंदणी करण्यासाठी कृपया खालील लिंकव्दारे गुगल फॉर्म भरावा. तसेच सदर गुगल फॉर्मची लिंक ahmednagar.nic.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeGnjyOiiLEr2GrVRa76YS8FycPJ1NIw6nGpfDMHyeQQJdInQ/viewform




Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु