Posts

Showing posts from February, 2023

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी पार पडला आगळावेगळा कार्यक्रम ....

Image
    संगमनेर तालुक्यातील घारगांव येथे.19 फेब्रु.2023 रोजी एक आगळा वेगळा असा कार्यक्रम पार पडला. मरहूम (कै.) पापाभाई रसूल सय्यद यांचे  आंबी खालसा मध्ये वास्तव्यास असलेले कुटुंब  असून त्यांना एकूण दहा दापत्य आठ मुली व दोन मुले.  त्यांना 18 मुले व 20 मुली आहेत. थोरली मुलगी मरहूम बन्नोबी अब्दुलकरीम शेख हिला आंबीखालसा या ठिकाण मरहूम अब्दुलकरीम सुलेमान शेख यांच्या बरोबर विवाह झाला त्यांचे मागील वर्षी फेब्रु 2022 मध्ये निधन झाले त्याच्या मुलांने सदरभाई शेख यांनी सध्या त्यांचे मावस भाऊ मुंबई, पुणे. औरंगाबाद, गोनेगाव ता. श्रीरामपूर, निमगाव सावा ता. जुन्नर, कुरकुंडी ता. संगमनेर, पोखरी ता. पारनेर या  ठिकाणी वास्तव्यास असलेले भावांचे कुटुंब त्यांना व्हाट्सअप च्या माध्यमातून सर्वांना एकत्र करण्याचे काम केले.व आंबीखालसा येथे बोलावून  सर्वांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला. शिवाय  सर्वांसाठी खास जेवणाची मेजवानी ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमानंतर सर्वांची मिटिंग पार पडली त्या मध्ये कुणाच्या कुटुंबा मध्ये काही अडचण आहे का..? काही वादविवाद आहे का..? मुलां/मुलींच्य...

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू.

Image
  सतिश फापाळे /  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकुर येथे इमारतीवर काम करत असताना विजेचा धक्का बसल्याने इमारतीवरून डोक्यावर खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे.        बांधकाम व्यवसायिक मोहन भिवाजी मोरे( वय ३५) गुरवारी साकुर येथील वनवे नगर येथील जावेद अब्दुल शेख यांच्या इमारतीवर काम करत होते.काम करत असताना मेन लाईनच्या विजेचा त्यांना जोरदार धक्का बसला यात ते इमारतीवरुन खाली पडले.डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कॉटेज हॉस्पिटल संगमनेर येथे उपचारासाठी दाखल केले असता.त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.    मयत व्यक्तीचे भाऊ सुखदेव भिवाजी मोरे यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश लोंढे करत आहेत.

अरे देवा.. शेतकरी विहीरीवर गेला तर...

Image
  कुरकुटवाडीतून शेतकऱ्याची पानबुडी मोटर चोरी. पठार भागात भुरट्या चोरांमुळे शेतकरी हतबल. सतिश फापाळे/ बोटा       संगमनेर तालुक्यातील पठार भागात कुरकुटवाडी गावामधील शेतकऱ्याची बोटा गावच्या शिवारातील कच नदी तीरावर विहीर असून या विहिरीतून केबल व पाईप कापून पाणबुडी मोटर चोरी झाल्याची घटना गुरूवार दि १६ फेब्रुवारी रोजी सकाळी उपघडकिस आली आहे.        कुरकुटवाडी गावचे शेतकरी रघुनाथ गणपत कुरकुटे यांचे मालकीची बोटा गावच्या शिवारात कचनदी तीरावर विहीर असून बुधवार व गुरुवार दिवसाच्या यादरम्यान या विहिरीतील कृष्ण कंपनीची इले पानबुडी मोटर अज्ञात चोरट्याने मोटारीचा पाईप व केबल कापून लंपास केली आहे.शेतकरी रघुनाथ गणपत कुरकुटे यांची फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध घारगाव पोलीसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे. कॉ. कैलास देशमुख करत आहे. दरम्यान पठारभागात भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्याच्या शेती उपयोगी विविध वस्तू चोरी जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहे. या चोरांचा लवकरात लवकर तपास लावून त्यांचा बंदोबस्त करण्यात  यावा अशी मा...

पोल्ट्री फार्म मधून कोंबड्यांची चोरी.

Image
    संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा गावातील शेतकऱ्याच्या शेतातील पोल्ट्री फार्म मधून २५ कोंबड्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली आहे.     याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ईश्वर लक्ष्मण कान्होरे हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत आंबीखालसा येथे राहत आहेत व शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. त्यांच्या शेतात गट क्र.३६३ मध्ये त्यांनी  पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी पोल्ट्री फार्मचा लोखंडी दरवाजा उघडून आत प्रवेश केला.व पोल्ट्री फार्म मधून २५ कोंबड्या चोरून पोबारा केला आहे.    दरम्यान सकाळी कान्होरे हे पोल्ट्री फार्म मधे गेले असता. त्यांच्या ल‌क्षात ही गोष्ट आली. कान्होरे यांनी थेट घारगांव पोलीस ठाणे गाठत अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे करत आहे. दरम्यान पठार भागात भुरट्या चोरट्यांनी गेल्या काही दिवसांपास...

घारगावात साठ वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या.

Image
  संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील घारगांवातील गावठाण परीसरात राहत असलेल्या  साठ वर्षीय व्यक्तीने राहत्या भाडोत्री खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.         याबाबत घारगांव पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की  एकनाथ शंकर शिंदे (वय वर्ष ६०) हे घारगांवातील  गुलाब नबी शेख यांच्या भाडोत्री खोलीत  राहत होते. दुपारी त्यांच्या पत्नी जिजाबाई मेडीकलमधून गोळ्या औषधे आणण्यासाठी बस स्टॅण्डवरती गेल्या होत्या.त्या गोळ्या_औषधे घेऊन परत आल्या असता त्यांना घरात त्यांचे पती एकनाथ शिंदे यांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने सिलींग फॅनला गळफास घेतला असल्याचे चित्र दिसले. हे चित्र पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला.जिजाबाई यांचा रडण्याचा आवाज ऐकून आजुबाजुच्या नागरीकांनी घटना स्थळावर धाव घेतली. ग्रामस्थांनी या विषयीची माहिती घारगांव पोलिसांना दिली.मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, पो. हे. कॉ. राजेंद्र लांघे, संतोष खैरे, किशोर लाड आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करत मृतदेह उत्तरी...

पुणे_नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात.

Image
  भरधाव वाहणाने १८ महिलांना चिरडलं. ५ ठार तर १३ गंभीर सतिश फापाळे            पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला असून, एका भरधाव वाहणाने खरापुडी फाट्याजवळ महिलांच्या घोळक्याला उडवल आहे. तर या भीषण अपघातात ५ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, १३ महिला जखमी झाल्या आहेत.जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत.या घोळक्यात १८ महिला होत्या, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसंच या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवण्यात येत आ हे.     खरपुडी फाट्यावर असणाऱ्या मंगल कार्यालयात या १८ महिला लग्न कार्यक्रमात वाढपी आणि स्वयंपाक कामासाठी आल्या होत्या. पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून या महिला आल्या होत्या. मंगल कार्यालय दुसऱ्या महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला असल्याने त्या सर्वजणी रस्ता ओलांडत असताना पुण्याहून आलेल्या एका अज्ञात भरधाव  वाहनाने या १८ महिलांच्या घोळक्याला जोरात धडक दिली.                या भीषण अपघातात ५ महिलांचा जागीच ...

प्रशांत शिंगोटे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान

Image
  सतीश फापाळे            स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा २०२३ चा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार अकोले तालुक्यातील बदगी गावचे ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत शिंगोटे यांना अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला आहे.         अहमदनगर येथील माऊली सभागृहात आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून प्रशांत शिंगोटे यांचे नेहमीच सामाजिक व शैक्षणीक क्षेत्रात उत्तम कामगिरीतून मोठे योगदान राहिले आहे. याचं कार्याला मोठ्या स्वरूपात समाजापुढे आणण्यासाठी आणि आपण समाज्याचे काहितरी देणे लागतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी सन २०१७ रोजी ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ची स्थापना केली होती.      ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व  वह्या, पुस्तके वाटप, त्याच बरोबर तंत्रज्ञानाच्या व संगणकाच्या युगात नाविन्यपूर्ण शिक्षणं पद्धतीचा चालना मिळावी यासाठी शैक्षणिक संस्थांना LED टिव्ही संच वाटप...

बाळासाहेब थोरात यांचा या पदाचा राजीनामा ?

Image
  सध्या काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेस कमिटीमध्ये मोठी धुसफस सुरू होती. नाशिक मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची यावरून हा वाद सुरू झाला होता. काँग्रेसने सत्यजीत यांचे वडील डॉ सुधीर तांबे यांना तिकीट दिले होतं. पण त्यांनी फॉर्म भरलाच नाही. अखेर सत्यजीत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. सत्यजीत तांबे निवडून देखील आले आहेत. यानंतर थोरात विरुद्ध पटोले हा वाद समोर आला होता. पटोलेंबरोबर काम करणं शक्य नाही असे थोरात यांनी पत्र लिहून हायकमांडला कळवले होते. मात्र असे असताना आता थोरात यांनी  थेट विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेबांच्या राजीनाम्यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगितले आहे. आता त्यांच्या राजीनाम्यावर हायकमांड काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. मात्र काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ...

Image
  बोटा/ सतिश फापाळे  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा परीसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार झाल्याची घटना सोमवार दि.६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री  घडली आहे. याबाबत मिळालेल्या  माहितीनुसार पुणें नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारातील विद्यानिकेतन महाविद्यालय परीसरात भक्ष्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना दोन वर्षीय तरस मादीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने या झालेल्या  अपघातात तरस मादी जागीच ठार झाली आहे.     सदर घटना घारगांव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आदिनाथ गांधले यांच्या लक्षात येताच त्यांनी वनपरीमंडळ अधिकारी रामदास थेटे यांना याबाबतची माहिती दिली, माहिती समजताच ज्ञानदेव कोरडे, बाळासाहेब वैराळ,दिपक वायळ आदी  वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत तरस मादिस कोठे गावच्या रोपवाटीकेत नेले.       दरम्यान पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वनक्षेत्र असल्याने भक्ष्याच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना अनेक बिबटे,तरस, वन्य  प्राण्यांचा अपघात होऊन ठार झाल्याच्या अने...

माहुली घाटात मालवाहू कंटेनर पलटी : एकजण जखमी

Image
  संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात चालकाचे कंटेनरवरील  नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाल्याची घटना रवीवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे.           याबाबत अधिक माहिती अशी की, कंटेनर चालक वाजीद खान हा संगमनेर कडून पुण्याच्या दिशेने त्याच्या ताब्यातील कंटेनर क्रमांक एन एल ०१ ए एफ २९६६ हा घेऊन चालला होता दरम्यान तो माहुली परीसरातील घाटात आला असता त्याचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गालगत असणार्या साईड गटारीत पलटी झाला.यात कंटेनरचे नुकसान झाले तर वाजीद खान हा किरकोळ जखमी झाला. दरम्यान घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाफ व टोल प्रशासनाने धाव घेतली रुग्णवाहिका चालक नागेश भोर व प्रवाश्यांनी जखमी खान याला तातडीने मदत करत रुग्णालयात हलवीले.

चिखलठाण येथील नाथ म्हस्कोबा महाराजांचा यात्रा उत्सव थाटामाटात संपन्न

Image
    ‌ शेख युनुस /.  राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील पंचक्रोशीतील आराध्य दैवत असलेले श्री नाथ म्हस्कोबा नाथ महाराज यात्रा उत्सव हा दरसाल दरवर्षी सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात येतो,यावर्षी नाथ म्हस्कोबा महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटात भक्त भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदवला.        श्री नाथ म्हस्कोबा महाराजांची यात्रे ची सुरुवात ही आरतीने,पुजेने ढोल ताशेच्या गजरात आयोजित करण्यात आले.अहमदनगर जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्यातील भक्त भाविकांनी हजेरी लावली.    यावेळी प्रमुख उपस्थितीत           ‌महाराष्ट्र राज्याचे माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्तदादा तनपुरे,धनराज गाडे पाटील,भारतशेठ भुजाडी, व नाथ म्हस्कोबा महाराज मंदिराचे भक्त महाराज माने सतुजी भगत बाबा या मान्यवरांची घोड्यावर बसून भव्य दिव्य थाटामाटात, ताल सुरात मिरवणूक काढण्यात आली. शेरी चिखलठाण येथील लोकप्रिय कार्यसम्राट लोकनियुक्त सरपंच डॉ .सुभाष काकडे, किसन काळनर,विनोद काळनर,इसाक सय्यद राष्ट्रवा...

कर्मचारी ते कर्मयोगी; अरुण मामा शिंदे

Image
  ( पठार वार्ता/ नवनाथ गाडेकर ) जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या उक्तीप्रमाणे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव येथील ग्रामपंचायत कर्मचारी स्व.अरुण हरीभाऊ शिंदे यांचे शुक्रवार दिनांक २७ जानेवारी रोजी रात्री अकस्मात निधन झाले.आणि संपुर्ण घारगांव परीसर शोकसागरात बुडाला. स्व हरीभाऊ व गं.भा.सिताबाई शिंदे  यांच्या  संसारवेलीवर अरुण व बेंबीताई हे दोन फुले उमलली. अरुणमामा यांचा जन्म (.१/१/१९६८ ) रोजी सर्व सामान्य असणार्या शिंदे कुटूंबात झाला. व त्यानंतर बेबीताईंचा जन्म झाला.घरची परीस्थिती अत्यंत हलाखीची रोज काबाडकष्ट करायचे आणि दोन वेळच्या अन्नापाण्याची सोय करायची. सर्व  सुरू होते परंतु त्यात नियतीचा काही गोष्टी मान्य नसल्याने अरुण मामा लहान  असताना वडीलांचे निधन झाले.व कुटुंबाची जबाबदारी अंगावर येऊन पडली. त्यामुळे शिक्षणही घेता आले नाही .रोजच शेतीची मजूरीची,नाला बलडींग , विहीरी खोदाई ची अशी कष्टाची कामे करण्यास मामांनी सुरुवात केली.व कुटुंब चालवण्याचे काम केले मामांचा स्वभाव एकदम शांत,संयमी, मितभाषी,होता. व बुद्धी मात्र तल्लख होती. कष्टाच्या कामाबरोबरच इले...

माता पित्याच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ऋणनिर्देश

Image
    संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा येथील सेवानिवृत्त शिक्षक  पांडुरंग मारुती काळे व  चंद्रकला पांडुरंग काळे यांच्या शुभमंगल दिनाच्या ५० व्या वाढदिवसाची वर्षपुर्ती व अभिष्टचिंतन सोहळा नुकताच उत्साहात साजरा झाला. यानिमित्त सोमनाथ व साईनाथ या दोन बंधूंनी ऋणनिर्देश व्यक्त केला आहे. या निमित्ताने सकाळी विधीवत रुद्राभिषेक  त्यानंतर कार्यक्रमस्थळी भागवताचार्य ह.भ.प. परशुराम महाराज अनर्थे यांचे सुश्राव्य किर्तन झाले. तदनंतर उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अभिष्टचिंतन सोहळा केक कापून साजरा करण्यात आला . स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. तर यावेळी ऋण व्यक्त करताना सोमनाथ व साईनाथ काळे म्हणाले की, आमच्या या कौटुंबिक सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आमच्या विनंतीला मान दिला व उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमच्या काळे परिवारावर प्रेम करणारा मित्रपरिवार, पै-पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ठ तसेच पठारभागातील ग्रामस्थ यांची आवर्जुन उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभली. लोकनेते तथा पारनेरचे आमदार श्री. निलेश लंके यांचे पिताश्री श्री....

जांभळे गावात मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.

Image
  कै. तबाजी सबाजी गवांदे यांचे पुण्यस्मरणार्थ शिबिराचे आयोजन. सतिश फापाळे     अकोले तालुक्यातील पठार भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा जांभळे गावचे माजी सरपंच कै. तबाजी सबाजी गवांदे यांचे पुण्यस्मरण निमित्ताने शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन स्वर्गीय तबाजी सबाजी गवांदे सेवाभावी संस्था जांभळे यांनी केले आहे.       जांभळे गावच्या जडणघडणीत तसेच विकासात मोलाचे योगदान देऊन गावच्या विकासाचा पाया रोवणारे कै.तबाजी सबाजी गवांदे यांचे पुण्यस्मरण कार्यक्रम निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात शनिवारी सकाळी ९ वाजता प्रतिमापूजन,तर ९:३० वाजता अखंड महाराष्ट्रात प्रचलित असलेले ह.भ. प.अश्र्विनिताई म्हात्रे यांचे संगीत प्रवचन होणार आहे.तसेच ११ वाजता पासून एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय यांचे सौजन्याने तसेच डॉ बाळासाहेब ढोरे यांचे विशेष सहकार्याने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला सुरवात होणार आहे.     या शिबिरात सर्व वयोगटातील व्यक्तींची मोफत नेत्र तपासणी ...